‘प्यार किया तो डरना क्या',मधुबालाविषयी तुम्हाला हे माहीत आहे का?

‘प्यार किया तो डरना क्या',मधुबालाविषयी तुम्हाला हे माहीत आहे का?

मधुबालाचे सौंदर्य आजही कित्येकांनी डोळ्यात साठवून ठेवले आहे. ती जाऊन अनेक वर्षे झाली तरी तिच्या सौंदर्याविषयी किती बोलू आणि किती नाही, असे होते. आजही मधुबाला म्हटले की, की तिची कितीतरी गाणी लगेच डोळ्यासमोर येतात.   ‘अच्छा जी मे हारी तुम मान जाओ ना’, ‘आईये मेहरबान’, ‘एक लडकी भिगी भागी सी’, बाबू समझो ईशारे, ‘प्यार किया तो डरना क्या’ ही तिची काही गाणी..चित्रपटात जशी एक कथा असते तशीच कथा प्रत्येकाच्या आयुष्याची असते. मधुबालाची सुरुवात कशी झाली हे तुम्हाला माहीत आहे का?तिचा अभिनेत्रीचा प्रवास आणि तिच्याविषयी माहीत नसलेल्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या आहेत का? आज मधुबालाची ६७ वी जयंती. या निमित्ताने गुगलने ही मधुबालाचे खास डुडल तयार केले आहे तर मग जाणून घ्या मधुबालाविषयी अधिक


google doodle madhubala


अर्थाजनासाठी चित्रपटात काम करण्याचा निर्णय


चित्रपटात येणे अनेकांचे स्वप्न असते कारण त्यांना प्रसिद्धी हवी असते. पण मधुबालाचे चित्रपटात येण्याचे कारण मात्र वेगळे होते. मधुबाला ९ वर्षांची असताना तिच्या वडिलांची नोकरी सुटली. त्यानंतर घर चालवायचे कसे असा प्रश्न होता. पाच भावंडावर घराची जबाबदारी येऊन पडली. ती चांगली दिसते. अभिनय केला तर चित्रपटात काम मिळेल असे तिच्या वडिलांना सांगण्यात आले. तिच्यातील ओतप्रोत भरलेले सौंदर्य पाहून तिला वयाच्या १४ वर्षी  ‘नीलकमल’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. १९४७ साली आलेल्या या चित्रपटात तिने राज कपूर यांच्यासोबत काम केले.


अंबानीच्या घरात पुन्हा बँड,बाजा, वरात... पत्रिका झाली व्हायरल


म्हणून मुमताजची झाली मधुबाला


मधुबालाचे खरे नाव मुमताज हे आता अनेकांना माहीत आहे. हिंदी चित्रपटातील तो असा काळ होता.ज्यावेळी लोकांना आपलेसे वाटेल असे नाव नट-नटींना दिले जायचे आणि त्याच नावाने त्यांना प्रसिद्धी मिळत होती. नीलकमल या चित्रपटाच्या प्रसिद्धीनंतर मुमताजचे दिग्दर्शक केदार शर्मा यांनी नामकरण केले. आणि तिला मधुबाला हे नवे नाव दिले.


madhubala 2


प्रचंड मेहनत


घरातील परिस्थिती पाहता मधुबालाला काम करणे  गरजेचे होते. त्यामुळे कामाच्या वेळा ती नेहमी पाळायची.  कितीही कामाची तिची तयारी असायची. तहान भूक सारे विसरुन ती काम करायची.लहान वयातच तिला परिस्थतिची जाणीव झाल्यामुळेच तिच्यामध्ये प्रचंड उर्जा होती हे सांगितले जायचे. शाळेत जाणे शिक्षण घेणे तिला दिवसेंदिवस कठीण जात होते. पण तरीही तिने शिक्षण पूर्ण केले. वयाच्या १७ वर्षी ती न चुकता इंग्रजी बोलू शकत होती.


विकी कौशल तुमचा बॉयफ्रेंड असता तर


प्रेम केले दिलीप कुमारसोबत पण लग्न किशोर कुमारशी


प्रसिद्धीच्या पायऱ्या चढत असताना ही अल्लड मुलगी अनेकांच्या प्रेमात पडत होती.पण तिचे दिलीप कुमारांशी असलेले नाते हे त्यावेळचा गॉसिपचा विषय होते.  ‘ज्वार भाटा’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्या दोघांची ओळख झाली आणि ‘तराना’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दिलीप कुमार यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर त्यांच्या प्रेमाची कबुली दिली. दोन सुपरस्टार एकमेकांच्या प्रेमात होते याचा आनंद सगळ्यांनाच होता. त्यावेळी वर्तमानपत्रातील रकानेच्या रकाने त्यांच्यावर छापून येत. पण मधुबालाच्या वडिलांना हे पसंत नव्हते. त्यांनी दिलीप कुमारशी संबंध ठेवण्यास मनाई केली. ते नाते तुटल्यानंतर मधुबाला खचून गेली. तिच्यावर तिच्या वडिलांची सतत सक्ती होती. तिच्या वडिलांनी दिलीप कुरमार यांनी फसवणुकीचा आरोप करत त्यांना कोर्टातही खेचले होते. कोर्टातही दिलीप कुमारांनी प्रेमाची साक्ष दिली होती. पण त्यांच्या प्रेमाचा तिथेच दी एंड झाला. शेवटी मधुबालाने दोनदा घटस्फोट झालेल्या किशोर कुमारांशी लग्न केले.


सिद्धार्थ मितालीच्या खास क्षणांनी सजला आहे व्हेलेंटाईन

प्रेम होते आणि ते दिसले ही


तुमच्या पैकी किती जणांनी मुगल -ए- आझम हा चित्रपट पाहिला आहे. जरी पाहिला नसेल तरी कुटुंबाकडून चित्रपटातील दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्या केमिस्ट्रीविषयी नक्कीच ऐकले असेल. तर सांगायची गोष्ट अशी की, हा चित्रपट मधुबाला आणि दिलीप कुमार यांनी त्यांच्या ब्रेकअपनंतर चित्रीत केला आहे. पण त्या ब्रेकअपनंतरही त्यांनी चित्रपटातून असा अभिनय केला की, त्यांचे प्रेम होते आहे आणि कायम राहिल असेच होते.


वडिलांची सक्ती


असं म्हणतात प्रसिद्धी आली की, बंधने येतातच. मधुबालाच्या बाबतीतही अगदी तसेच काहीसे झाले कारण तिच्या प्रसिद्धीनंतर घरात भरपूर पैसा येत होता. तिचे वडील तिच्यासोबत कायम सेटवर असायचे. शूट झाल्यानंतर ते तिला थेट घरी घेऊन यायचे तिला घरी आलेल्या पाहुण्यांसोबतही बोलण्यास दिले जायचे नाही. तिच्या वडिलांनीच तिला कैद करुन ठेवले असे म्हटले जायचे.


madhubala 3


 चित्रपटाचे काम राहिले अर्धवट


छलक या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असतानाच मधुबालाची तब्येत खालावली होती. राज कपूरसोबत मधुबाला हा चित्रपट करत होती. या चित्रपटाचे काही दिवस शुटींग झाले. त्यावेळी चित्रपटासाठी मधुबालाने लावलेला शेवटचा मेकअप होता. वयाच्या ३६ व्या वर्षी तिचे निधन झाले.