ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
संजय लीला भन्साली आणि दीपिका पादुकोणमध्ये खरंच सुरू आहे का कोल्ड वॉर

संजय लीला भन्साली आणि दीपिका पादुकोणमध्ये खरंच सुरू आहे का कोल्ड वॉर

संजय लीला भन्सालीच्या रामलीला, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा सुपरहिट चित्रपटांमध्ये दीपिका पादुकोणने मुख्य भूमिका साकारल्या होत्या. असे एका पेक्षा एक चित्रपट एकत्र केल्यावस असं काय झालं की आता दीपिकाला संजय लीला भन्सालीसोबत काम करायचं नाही. निर्माता आणि अभिनेत्रीची ही जोडी चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. त्यामुळे या दोघांनी भविष्यातही अनेक चित्रपटात एकत्र काम करावं असं चाहत्यांना वाटत आहे. मात्र दीपिका सध्या संजय लीला भन्सालीच्या सर्वच ऑफर्स नाकारत आहे. ज्यामुळे त्या दोघांमध्य कोल्ड वॉर सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

काय आहे या कोल्ड वॉरचं कारण

रामलीला, पद्मावत आणि बाजीराव मस्तानीसारख्या हिट चित्रपटानंतर कोणतीही अभिनेत्री संजय लीला भन्सालीसोबत काम करण्यास नक्कीच तयार होईल. दीपिका तर संजयची आवडती अभिनेत्री आहे. रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणवर संजयचा विशेष जीव आहे. कारण त्याच्या प्रत्येक चित्रपटात सध्या ही जोडी असतेच. संजय लीला भन्साली सध्या आलिया भटसोबत गंगुबाई काठीयावाडीमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात दीपिकाचा एक डान्स नंबर असावा असं त्याला वाटत होतं. मात्र दीपिकाने या चित्रपटात डान्स करण्यास संजयला नकार दिला. त्यानंतर संजयने दीपिकाला त्याच्या हीरा मंडी या वेबसिरिजमध्ये एक विशेष डान्स नंबर ऑफर केला. दीपिकाने या प्रोजेक्टमध्ये काम करण्यासही संजयला नकार दिला. एका पाठोपाठ संजयच्या सर्व ऑफर नाकारण्यातून ती संजयसोबत नाराज असल्याचं दिसून येत आहे. खरंतर संजय त्याच्या आगामी चित्रपट बैजू बावरामध्येही रणवीर कपूर, आलिया भटसोबत दिपिकाला कास्ट करणार होता. मात्र त्याने त्याचा हा निर्णय आता होल्डवर ठेवला आहे. सध्या तरी संजय त्याच्या गंगूबाई काठियावाडीच्या कामात व्यस्त आहे. त्यामुळे त्याने त्याच्या आगामी चित्रपटाचे निर्णय काही काळासाठी पुढे ढकलले आहेत. त्यामुळे कदाचित हा चित्रपट पूर्ण झाल्यावर तो दीपिकाची मनधरणी करू शकतो अथवा तिचा गैरसमज दूर करू शकतो.

दीपिकाला नेमकं झालंय तरी काय –

हाती आलेल्या माहितीनुसार दीपिका पादुकोण आणि संजय लीला भन्साली मधील हा कोल्ड वॉंर आलिया भटमुळे सुरू झालं आहे. कारण जेव्हापासून हा चित्रपट संजयने जाहीर केला आहे तेव्हा पासून दीपिका त्याच्याशी असं वागत आहे. प्रियांका चोप्रा नंतर दीपिका पादुकोण संजय लीला भन्सालीची फस्ट चॉईस होती. त्यामुळे गंगूबाई काठियावाडी या महत्त्वकांक्षी चित्रपटासाठी  तिलाच साईन करायला हवं होतं. मात्र त्याने आलियाला या चित्रपटात संधी दिली. सलमानने इंशा अल्लाह करण्यास नकार दिल्यामुळे संजयने त्याच्या गंगूबाईमध्ये आलियाला  घेतलं. पण त्यामुळे त्याची इतर नाती आता धोक्यात आली आहेत. दीपिकाच्या मनात या गोष्टीची अढी बसल्यामुळे ती त्याच्यासोबत कोणत्याच चित्रपटात काम करण्यास तयार नाही. कदाचित दीपिका सध्या तिच्या इतर प्रोजेक्टमध्ये बिझी असू शकते. त्यामुळे तिने संजयच्या ऑफर्स नाकारल्या असू शकतात. असं असेल तर त्याच्या आगामी चित्रपटात पुन्हा एकदा दीपिका नक्कीच झळकू शकेल.

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम 

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

दीपिका पादुकोणच्या ‘द्रौपदी’नंतर रणवीर सिंह साकारणार आता सूर्यपुत्र ‘कर्ण’

परिणीतीआधी श्रद्धा कपूर साकारणार होती सायना, या कारणांमुळे सोडावी लागली संधी

‘अप्सरा आली’, साडीमधील सोनालीच्या मनमोहक अदा

ADVERTISEMENT
29 Mar 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT