तमन्नाला भेटस्वरूपात मिळाला जगातील मौल्यवान ‘हिरा’

तमन्नाला भेटस्वरूपात मिळाला जगातील मौल्यवान ‘हिरा’

अभिनेत्री तमन्ना भाटियाचे चाहते अनेक आहेत. बॉलीवूड आणि टॉलीवूडमध्ये तमन्नाने विशेष लोकप्रियता मिळवलेली आहे. बाहुबलीतील तिच्या सौंदर्य आणि अभिनयाने  अनेकांना भुरळ घालती होती. सध्या तिच्या ‘SyeraaNarashimaReddy’ या चित्रपटाची सगळीकडे चर्चा सुरू आहे. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं कौतुक करण्यासाठी अभिनेते चिरंजीवी यांची सून उपासना कोनीडेलाने तमन्नाला चक्क एक मौल्यवान हिरा गिफ्ट केला आहे.तमन्नाला मिळालेला हा हिरा जगातील पाचव्या क्रमांकाचा मौल्यवान हिरा आहे. या हिऱ्याची किंमत जवळजवळ दोन कोटी असल्याचा अंदाज आहे.  हा मौल्यवान हिरा तमन्नाला भेट दिल्याची बातमी स्वतः उपासना कोनीडेलाने तिच्या सोशल मीडियावरून शेअर केली आहे. तमन्ना सध्या एकाच वेळी अनेक चित्रपटांमध्ये काम करत आहे. शिवाय आता तिच्या कामासोबत तिला मिळालेल्या या महागड्या भेटवस्तूमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

तमन्नाला मिळाला जगातील सर्वात मौल्यवान हिरा

तमन्ना भाटियाने या ‘SyeraaNarashimaReddy’ या चित्रपटात लक्ष्मी ही भूमिका साकारली आहे. हा चित्रपट मागील आठवड्यात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट सध्या फारच गाजत आहे. राम चरण यांच्या कोनीडेला प्रॉडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. राम चरण यांची पत्नी उपासना कोनीडेलाला या चित्रपटातील तमन्नाचा अभिनय प्रंचड आवडला आहे. ज्यामुळे प्रभावित होऊन तिने तमन्नाला हा मौल्यवान हिरा भेट दिला आहे. तिने हा हिरा तमन्नाला दिल्याची बातमी स्वतःच सोशल मीडियावर शेअर केली आणि त्यासोबत लिहीलं आहे की, "मिसेस प्रॉड्यूसर कडून सूपर तमन्नाला ही भेट, तुझी खूप आठवण येत आहे लवकरच भेटू" उपासनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तमन्ना भाटिया तिच्या बोटातील तो मौल्यवान हिरा दाखवताना दिसत आहे. 

तमन्नासोबत या कलाकारांच्या आहे प्रमुख भूमिका

तमन्नासोबतच या चित्रपटात साऊथचा अभिनेता चिंरजीवी आणि बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन प्रमूख भूमिकेत आहेत. या चित्रपटात चिरंजिवी यांनी आंध्र प्रदेशचे स्वतंत्रता सेनानी उयालवाडा नरसिंहा रेड्डी ही भूमिका साकारली आहे. तर महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांचे गुरू आणि अध्यात्मिक नेता गोसाई वेंकन्ना ही भूमिका साकारली आहे. हा चित्रपट भारताच्या स्वातंत्र्य लढ्यावर आधआरित आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात नरसिंहा रेड्डी आणि लक्ष्मी यांची महत्त्वाची भूमिका निभावली होती.  या चित्रपटाला लोकांकडून अतिशय सुंदर प्रतिसाद सध्या मिळत आहे. चित्रपटाच्या यशासोबतच तमन्नाला जगातील हा महागडी हिरादेखील भेट स्वरूपात मिळाल्यामुळे तिचा आनंद नक्कीच द्विगुणित झाला आहे. 

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम 

हे ही वाचा -

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा - 

प्रियंकाने बेबी प्लानिंगबाबत केला आहे ‘हा’ खुलासा

भल्लालदेव राणा दग्गुबतीचे हे फोटो पाहून फॅन्सना बसला धक्का

शाहिदची बायको Mira Rajput पण करणार का बॉलीवूडमध्ये एंट्री?