2019 मध्ये बॉलीवूडमधल्या 'नव्या' जोड्या प्रेक्षकांच्या भेटीला

2019 मध्ये बॉलीवूडमधल्या 'नव्या' जोड्या प्रेक्षकांच्या भेटीला

चित्रपटनगरी बॉलीवूड (Bollywood) मध्ये दरवर्षी छोट्या-मोठ्या असे कितीतरी चित्रपट बनतात, जे काही वेळ बॉक्स ऑफिस गाजवून मग आठवणी बनून जातात. याच चित्रपटांमध्ये काही नव्या-जुन्या जोड्याही पाहायला मिळतात, ज्यांची जादू ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन अशी दोन्ही प्रकारे प्रेक्षकांवर मोहिनी करते. बॉलीवूडसाठी 2019 हे वर्ष खूपच खास ठरणार आहे, कारण या वर्षी काही मोठे आणि चांगली स्क्रीप्ट असलेले चित्रपट रिलीज होणार आहेत आणि या चित्रपटांमधल्या जोड्याही खास आहेत. जाणून घेऊया, अशाच काही सिनेमाजबद्दल ज्यांची स्टार कास्ट पहिल्यांद्याच एकमेकांबरोबर काम करणार आहे.   


रणबीर कपूर- आलिया भट्ट
साल 2018 मध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या अफेयरची बरीच चर्चा होती. या दोघांनी अनेक फंक्शन्सना एकत्र हजेरीदेखील लावली. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट पहिल्यांदाच चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहेत. या दोघांचा ब्रम्हास्त्र हा सिनेमा येणार असून या चित्रपटात अभिनेते अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय हेही असणार आहेत. हा चित्रपट 2019 च्या ख्रिसमसमध्ये रिलीज होणार आहे.


राजकुमार राव- मौनी रॉय


made-in-china-rajkummar-rao-mouni-kapoor
साल 2018 मध्ये राजकुमार राव याचे बरेच चित्रपट आले तर आणि मौनी रॉयचा अक्षय कुमारबरोबरचा गोल्ड हा चित्रपट आला होता. एकीकडे राजकुमार रावने स्त्री चित्रपटात श्रद्धा कपूरबरोबर हॉरर-कॉमेडी केली तर मौनी रॉयने 'गोल्ड'मध्ये अक्षयकुमारच्या बायकोचा रोल केला होता. आता हे दोघंही मेड इन चायना चित्रपटात धम्माल करणार आहेत. राजकुमार रावची गणती ही बॉलीवूडच्या टॉप स्टार्समध्ये होते तर मौनी ही सध्या टेलीव्हीजननंतर आता बॉलीवूडमध्ये स्थिरावू पाहतेय.


रणवीर सिंग- आलिया भट्ट


gully-boy-ranveer-singh-alia-bhatt
साल 2018 मध्ये रणवीर सिंग (Ranveer Singh) ने दीपिका पदुकोण (Deepika Padukone) बरोबर लग्न केलं तर दुसरीकडे आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या अफेयर ही बरीच चर्चा झाली. 2018 मध्ये आलिया आणि रणवीर यांनी आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवल्यावर आता हे दोघंही पहिल्यांदाच स्क्रीन स्पेस शेअर करण्यासाठी सज्ज आहेत. रणवीर सिंग आणि आलिया भट्ट स्टारर फिल्म 'गली बॉय' 2019 मध्ये व्हॅलेंटाईन्स डे ला रिलीज होणार आहे.


सिम्बा’नंतर रणवीर ‘गल्ली बॉय’ लुकमध्ये येत आहे प्रेक्षकांच्या भेटीला


कंगना राणावत - जस्सी गिल


panga-kangana-ranaut-jassie-gill
बॉलीवूड (Bollywood) ची ‘क्वीन’ कंगना राणावतसाठी हे वर्ष खूपच खास आहे. ‘मणिकर्णिका’ चित्रपटात राणी लक्ष्मी बाईची भूमिका ती करत आहे. तसंच ‘पंगा’ चित्रपटात ती एका राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूच्या भूमिकेत ती दिसणार आहे. या बॉलीवूड स्पोर्ट्स (sport) ड्रामा चित्रपटात तिच्या बरोबर दिसणार आहे जस्सी गिल. अभिनेता जस्सी गिल हा पंजाबी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय नाव आहे. आता पाहावं लागेल पडद्यावर या दोघांची केमिस्ट्री कशी दिसते.  


‘पंगा’साठी कंगनाचा कबड्डीशी ‘पंगा’


नवाज़ुद्दीन सिद्दीकी- अथिया शेट्टी


FI-2019-best-bollywood-pairs
सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी या वर्षी बॉलीवूडमध्ये आपले पाय रोवण्यासाठी तयार आहे. मोठ्या पडद्यावर ‘मंटो’ नवाज़ुद्दीन सिद्दीकीसोबत ती ‘मोतीचूर चकनाचूर’ हा चित्रपट करत आहे. 2018 मध्ये नवाज़ुद्दीनने वेब सीरीज ‘सेक्रेड गेम्स’ आणि बॉलीवूडमधील ‘मंटो’ चित्रपटाने खूप वाहवा मिळवली. या दोन्ही स्टार्सनी रोमँटीक कॉमेडी असलेल्या चित्रपटाच्या शूटींगला सुरूवात केली आहे.


प्रभास- श्रद्धा कपूर


saho-shraddha-kapoor-prabhas
‘बाहुबली’ चित्रपट सुपर- डुपर हिट झाल्यानंतर अभिनेता प्रभासच्या फॅन फॉलोइंगमध्ये कमालीची वाढ झाली आहे. तर 2018 मध्ये श्रद्धा कपूरने ‘स्त्री’ चित्रपटांमधील रहस्यमयी भूमिकेमुळे फारच चर्चेत राहिली. याशिवाय ‘बत्ती गुल मीटर चालू’ या चित्रपटातही ती दिसली होती. आता हे दोन्ही स्टार्स ‘साहो’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. हा एक अॅक्शन चित्रपट असून 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे.


दीपिका पदुकोण- विक्रांत मेसी


chhapak-deepika-padukone-vikrant-massey
बॉलीवूडच्या हिट अभिनेत्रीपैकी एक असणारी दीपिका पदुकोण (Deepika Padukone) साठी 2018 हे वर्ष फारच खास होतं. वर्षाच्या सुरूवातीलाच तिचा वादग्रस्त चित्रपट पद्मावत’ आला होता तर रणवीरशी लग्न करून त्यांनी 2018 ला बायबाय केलं. आता ती गुणी अभिनेता विक्रांत मेसीसोबत ‘छपाक’ चित्रपटात दिसणार आहे. जी अॅसिड पीडितेच्या आयुष्यावर आधारित आहे. 2018 मध्ये विक्रांतने ‘ब्रोकन बट ब्यूटिफुल’ आणि ‘मिर्झापूर’ यासारख्या लोकप्रिय वेबसीरीजमध्ये काम केलं होतं.


सुशांत सिंह राजपूत- श्रद्धा कपूर


chhichhore-sushant-singh-rajput-shraddha-kapoor
साल 2019 मध्ये श्रद्धा कपूर दोन मोठ्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. एकीकडे साहो ही या वर्षातील मोस्ट अवटेड फिल्म आहे तर दुसरीकडे तिचा ‘छिछोरे’ हा चित्रपट तेवढाच महत्वाचा आहे. ‘दंगल’ चित्रपटाचा दिग्दर्शक नितेश तिवारी या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून ही मल्टी स्टारर कॉमेडी फिल्म आहे. ‘छिछोरे’ मध्ये पहिल्यांदाच श्रद्धा कपूर आणि सुशांत सिंह राजपूत ही जोडी दिसणार आहे.


शाहीद कपूर- कियारा अडवाणी


kabir-singh-shahid-kapoor-kiara-advani
साल 2018 मध्ये शाहीद कपूर ‘बत्ती गुल मीटर चालू’ मध्ये एका चलाख वकीलाच्या भूमिकेत दिसला होता आणि खाजगी आयुष्याबाबत बोलायचं झाल्यास तो एका गोड मुलाचा पिता ही झाला. तर कियारा अडवाणी वेब सीरीज ‘लस्ट स्टोरीज’ मध्ये विकी कौशलसोबत दिसली होती. आता शाहीद कपूर आणि कियारा अडवणी ‘कबीर सिंह’ या चित्रपटात रोमान्स करताना दिसणार आहे. हा चित्रपट दाक्षिणात्य सुपरहीट चित्रपट ‘विक्रम वेधा’ चा रीमेक आहे.


सुशांत सिंग राजपूत- भूमी पेडणेकर


son-chidiya-sushant-singh-rajput-bhumi-pednekar
साल 2018 मध्ये सारा अली खान सोबत ‘केदारनाथ’ या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत सशक्त अभिनय करताना दिसला होता. या वर्षी सुशांतकडे दोन चित्रपट आहेत. तो ‘सोनचिडिया’ या चित्रपटात भूमी पेडणेकरसोबत चंबलच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये दरोडेखोरी करताना दिसणार आहे. हा चित्रपट चंबलच्या दरोडेखोरांवर आधारित असून यामध्ये सुशांत आणि भूमी दरोडेखोरांच्या भूमिकेत दिसणार आहेत.


'सोनचिडिया’मध्ये अनुभवता येणार दरोडेखोरांचा थरार


तुम्ही यापैकी कोणती जोडी बघण्यासाठी उत्सुक आहात?