'फर्जंद'नंतर निर्माते अनिरबान सरकार घेऊन येताहेत 'ऋणानुबंध'

'फर्जंद'नंतर निर्माते अनिरबान सरकार घेऊन येताहेत 'ऋणानुबंध'

'फर्जंद' या सुपरहिट चित्रपटाचे निर्माते अनिरबान सरकार, स्वप्निल पोतदार, महेश जाउरकर आणि अभिनेता-दिग्दर्शक लोकेश गुप्ते 'ऋणानुबंध'च्या निमित्ताने एकत्र आले आहेत. लोकेश गुप्ते दिग्दर्शित 'ऋणानुबंध' या नव्या चित्रपटाची निर्मिती स्वामी समर्थ मुव्हीज क्रिएशन्स एल.एल.पी. करत आहेत. यानिमित्तानं वेगळ्या आशय-विषयावरील चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नुकतंच या चित्रपटाचा मुहूर्त पुणे येथे सुनील आंबेकर (पूर्व राष्ट्रीय संघटनमंत्री , अ. भा. वि.प.) तसेच वैभव डांगे, चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ मंडळी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. 'एक सांगायचंय...' या चित्रपटाद्वारे लोकेश गुप्ते यांनी आपली दिग्दर्शकीय कारकीर्द सुरू केली होती. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांची दाद मिळाली होती. आजच्या तरुणांशी संबंधित गंभीर विषय 'लोकेशन' या चित्रपटात हाताळला होता. आता 'ऋणानुबंध' ही एक वेगळी गोष्ट घेऊन लोकेश पुन्हा एकदा सज्ज आहे.

(वाचा : नवाजुद्दीन सिद्दकीने पहिल्यांदा शेअर केला खऱ्या आयुष्यातील गुरूजींचा फोटो)

अभिनेता- दिग्दर्शक लोकेश आणि 'फर्जंद' चित्रपटाचे निर्माते या दोघांनीही आपापल्या पहिल्या चित्रपटातून ठसा उमटवणारी कामगिरी केली होती. या चित्रपटातील कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. 'ऋणानुबंध' या नव्या चित्रपटातून ते कोणता विषय आणि गोष्ट घेऊन येतात याची नक्कीच उत्सुकता आहे.

(वाचा : कार्तिकनं सारासोबतचा 'हा' व्हिडीओ केला शेअर, कॅप्शन पाहून चढला पारा)

नवीन वर्षात हे सिनेमे येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेते गिरीश कुलकर्णी आणि सयाजी शिंदे पहिल्यांदाच एकाच चित्रपटात काम करणार आहे. प्रसाद नामजोशी आणि सागर वंजारी दिग्दर्शित ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ या चित्रपटात हा योग जुळून आला आहे. त्यांच्या अभिनयाची जुगलबंदी या चित्रपटात रंगणार आहे. ‘फटमार फिल्म्स एलएलपी’ या निर्मिती संस्थेकडून ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ची निर्मिती करण्यात येत आहे. हा सिनेमा 3 एप्रिल 2020 ला बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.

(वाचा : डान्स दिवाचा संघर्ष! कधीकाळी लॉटरी विकायची नोरा फतेही)

‘चंद्रमुखी’
मराठीमध्ये ‘चंद्रमुखी’ हे नाव सर्वप्रथम वाचलं गेलं, ऐकलं गेलं ते सुप्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांच्या लेखणीतून आणि आता ‘चंद्रमुखी’ नाव मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात एका नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली आणि त्या सिनेमाचे नाव आहे ‘चंद्रमुखी’. आपल्या रपाने आणि घुंगराच्या ठेक्यांनी अनेकांना मोहीत करणारी सौंदयवती, ‘चंद्रमुखी’ हे विश्वास पाटील यांच्या कादंबरीतलं एक महत्त्वाचं पात्रं. त्यांच्या कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ या मराठी सिनेमाचे टीझर पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अभिनेते-दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी सांभाळली आहे. लेखकाचं मनोगत पडद्यावर मांडण्याचं प्रसाद ओक यांचं कौशल्य अनेकांनी त्यांच्या ‘हिरकणी’ या सिनेमात अनुभवलं आहे. ‘चंद्रमुखी’ सिनेमाचे पटकथा- संवाद चिन्मय मांडलेकर यांनी लिहिलेले आहे. ‘हिरकणी’ची लेखक-दिग्दर्शक जोडी ‘चंद्रमुखी’साठी पुन्हा एकदा एकत्र आली आहे.

हे देखील वाचा :
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.