कंगनाच्या 'सॉफ्ट पॉर्न' म्हणण्यावर भडकली उर्मिला, दिले सडेतोड उत्तर

कंगनाच्या 'सॉफ्ट पॉर्न' म्हणण्यावर भडकली उर्मिला, दिले सडेतोड उत्तर

सध्या बॉलिवूडमध्ये काय सुरु आहे तर कंगना विरुद्ध उर्मिला मातोंडकर असा वाद. बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण पेटले असताना कंगनाने इंडस्ट्रीमधील आणखी काही अशा नावांचा खुलासा करण्याची धमकी ही दिली आहे. या प्रकरणामध्ये ज्यावेळी उर्मिला मातोंडकरने प्रतिक्रिया दिली त्यावेळी कंगनाने उत्तरदाखल तिला इंडस्ट्रीमधील ‘सॉफ्ट पॉर्न’ असल्याचे म्हटले आहे. अनेकांनी कंगनाच्या या विधानाचे समर्थन केले तर काहींनी याला कडकडून विरोध केला. लोकसभेमध्येही यासंदर्भात अनेक वादंग निर्माण झाले. पण आता ‘सॉफ्ट पॉर्न’ म्हणणाऱ्या कंगनाला उर्मिला मातोंडकरने सडेतोड उत्तर दिले आहे. जाणून घेऊया हे संपूर्ण प्रकरण आणि उर्मिलाने नेमके काय उत्तर दिले.

करण जोहरच्या घरात झालेल्या 'त्या'पार्टीची होणार चौकशी

अशी झाली सुरुवात

उर्मिला मातोंडकरने एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बॉलिवूडमध्ये सध्या सुरु असलेल्या कंगना विरुद्ध ड्रग्ज वॉर विरुद्ध आपले मत मांडले. उर्मिला म्हणाली की, कंगना बॉलिवूडमधील ड्रग्ज पेडलर्सना बाहेर काढू इच्छिते ही चांगली गोष्ट आहे. पण तिने सगळ्या पुराव्यानिशी या गोष्टी केल्या पाहिजेत. तिने ड्रग्ज घेणाऱ्यांची नाव घेऊन सगळ्यांवरच उपकार करावे. पुढे उर्मिला म्हणाली की, कंगनाला आतापर्यंत जे काही मिळाले आहे ते मुंबई आणि फिल्म इंडस्ट्रीमुळे मिळाले आहे. पैसा, प्रसिद्धी या सगळ्यांसाठी तिने इंडस्ट्रीचे आभार मानायला हवे. इंडस्ट्रीमध्ये सुरु असलेल्या या ड्रग्ज प्रकरणाबाबत ती साधारण एक महिन्याभरापासून बोलत आहे. पण आताच हा मुद्दा का? या आधी तिने या सगळ्याबाबत बोलणे का पसंत केले नाही. नेहमीच विक्टिम कार्डचा उपयोग कंगना का करते? असेही  सवालही तिने कंगनाला केले आहेत.

तुमचेच राज्य ड्रग्जच्या विळख्यात- उर्मिला

उर्मिलाने एका इंटरव्हयू दरम्यान आणखी एका मुद्द्यावर बोलणे पसंत केले. कंगना हिमाचल प्रदेशची आहे. या हिमाचल प्रदेशमध्येच मोठ्या प्रमाणात ड्रग्ज विकले जाते. कंगना जिथे राहते ते राज्यच ड्रग्जचा किल्ला आहे हे तिला माहीत आहे का ? असा सवालही तिने कंगनाला केला आहे. शिवाय सतत लाईमलाईटमध्ये राहून तिला भाजपकडून तिकिट मिळवायचे आहे,असेही उर्मिला म्हणाली आहे. 

Good News: गेल्या महिन्यात आई-वडील गमावलेल्या या अभिनेत्याने दिली मुलगा झाल्याची गोड बातमी

जया बच्चनही वादाच्या भोवऱ्यात

जया बच्चन यांच्या बोलण्याही अनेक गोष्टींवर वाद निर्माण झाले आहे. रवि किशन यांनी इंडस्ट्रीमधील ड्रग्जच्या आधीन गेलेल्या कलाकारांवर आणि इंडस्ट्रीवर टिप्पणी केली होती. त्यावर जया बच्चन यांनी रविकिशन यांना खडेबोल सुनावले. ‘जिस थाली मैं खाते हौ. उसी थाळी मै छेद करते हो’ अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे जया बच्चन यांच्या समर्थनार्थ जितकी लोक उभी राहिली तितकी त्यांच्या विरोधातच इंडस्ट्रीमधील लोकं उभी राहिली त्यामुळे यावर विधान करुन जया बच्चन यांनीही आपल्यावर हा वाद ओढावून घेतला आहे. शिवाय कंगना राजकारणात येण्यासाठी सतत या गोष्टी करत असल्याचा आरोपही जया बच्चन यांनी केला. 


उर्मिलाच्या विधानांवर कंगनाने उत्तर उत्तर तर दिले आहे. तिने यासगळ्यासाठी मला राजकारण करण्याची गरज नाही असे सांगितले. मला तिकिटही अगदी सहज मिळू शकते. त्यामुळे आता हा वाद किती ताणेल हे पाहावे लागेल.

आलिया भट आणि रणबीर कपूरच्या ब्रम्हास्त्रचं बजेट होणार कट