उर्वशी रौतेलाने मित्राच्या लग्नात नेसली लाखोंची साडी, किंमत ऐकून व्हाल थक्क

उर्वशी रौतेलाने मित्राच्या लग्नात नेसली लाखोंची साडी, किंमत ऐकून व्हाल थक्क

उर्वशी रौतेला बॉलीवूडची एक अशी अभिनेत्री आहे जी तिच्या अभिनयापेक्षा स्टायलिश लुकसाठी जास्त लोकप्रिय आहे. उर्वशी जेव्हा एखाद्या समारंभासाठी  जाते तेव्हा तिथल्या सर्वांच्या नजऱ्या तिच्या लुकवर खिळून राहतात. बऱ्याचदा तिचे कपडे आणि ज्वैलरी खूप महाग आणि युनिक असतात. काही दिवसांपूर्वीच ती तिच्या एका खास मित्राच्या लग्नसमारंभात सहभागी झाली होती. तिचा या लग्नातील लुक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उर्वशीचे सध्या सोशल मीडियावर 33 मिलिअन्स फॉलोव्हर्स आहेत, आणि तिच्या या फोटोंना साडे सात लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळालेले आहेत. एवढंच नाही तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नुकतंच तिच्या या लुकबाबत तिच्या एका स्टायलिशने एक गुपित उघड केलं आहे.  या माहितीनुसार उर्वशीच्या या साडी आणि दागिन्यांची किंमत ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.

उर्वशीची ही साडी आहे तरी किती किंमतीची-

उर्वशी रौतेलाच्या स्टायलिश सांचीच्या सांगण्यानुसार, उर्वशी तिचा मित्र विक्रम सिंह यांच्या लग्नात सहभागी झाली होती. हे लग्न पंजाबमध्ये पार पडलं. या लग्नासाठी तिने उर्वशीला खास ‘चेरी दी मिंट रेनबो’ नेसण्याचा सल्ला दिला  होती. ही साडी या ब्रॅंडची एक खास साडी आहे. या साडीची किंमत पाच लाखांची होती तर यासोबत उर्वशीने रोहीत इचपिलानीने डिझाइन केलेली ज्वैलरी कॅरी केले होते त्यांची किंमत पंधरा लाख रूपयांच्या घरात होती. हा सर्व गोष्टींची किंमत पाहता उर्वशीचा हा लग्नातील खास लुक जवळजवळ वीस लाखांपेक्षा जास्त किंमतीचा होचा. उर्वशी या लुक मध्ये अगदी परफेक्ट दिसत होती. नेहमीप्रमाणे तिचा हा लुकदेखील चाहत्यांना घायाळ करणारा होता. उर्वशीने या लग्नात ही साडी नेसून खास भांगडा डान्सही केला. एवढंच नाही तर काही दिवसांपूर्वीच उर्वशी नेहा कक्करच्या लग्नातदेखील दिसली होती. त्या लग्नातही तिने तिच्या लुकने सर्वांना आकर्षित केलं होतं. उर्वशीने नेहाच्या लग्नात हिरव्या रंगाचा लेंगा परिधान केला होता. तिचा लेंगा डिझायनर रेनू टंडनने डिझाईन केला होता. उर्वशीने नेहाच्या लग्नात घातलेल्या लेग्यांची किंमतदेखील 55 लाख होती. थोडक्यात उर्वशीचे लुक हे लाखोंच्या घरात जाणारेच असतात. ज्यामुळे तिच्या लुकची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगते. तुम्हाला उर्वशीचा हा लुक कसा वाटला आणि या साडीची किंमत पाहून आश्चर्य वाटलं का हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा. 

उर्वशी लवकरच दिसणार या चित्रपटात

उर्वशी रौतेला या वर्षी  ओटीपी माध्यमावर प्रदर्शित झालेल्या ‘वर्जिन भानूप्रिया’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आली होती. त्यानंतर लगेचच तिचा म्युजिक व्हिडिओ ‘वो चांद कहा से लाओगी’ प्रदर्शित झाला होता. आता लवकरच ती पुन्हा एकदा ‘तेरी लोड वे’ या म्युजिक अल्बममधून झळकणार आहे. या अल्बमचं टीझर नुकतंच प्रदर्शित झालं आहे. यासोबतच ती नवीन वर्षी एका तेलूगू आणि हिंदी थ्रीलर चित्रपट ‘ब्लॅक रोझ’मधून दिसणार आहे. या चित्रपटांचं शूटिंग काही दिवसांपूर्वीच पूर्ण झालं असून ती आता हे चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहे.