बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ही तिच्या बोल्ड अंदाज आणि डान्ससाठी नेहमीच चर्चेत असते. ती सोशल मीडियावरही सतत एक्टिव्ह असते. सध्या देश जरी कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनमध्ये असला तरी उर्वशी मात्र चर्चेत आहेच. पुन्हा एकदा चर्चेत राहण्यासाठी उर्वशीला लागला बिजली की तार चा झटका. नाही... उर्वशीला खरोखरचा विजेचा शॉक वगैरे लागेलाला नाही. तर हा आहे उर्वशीचा नवा डान्स व्हिडिओ पाहा.
उर्वशीचा हा डान्स व्हिडिओ फॅन्सना खूपच आवडला असून त्यावर असंख्य प्रतिक्रियाही येत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना उर्वशीने लिहीलेलं कॅप्शनही मजेदार आहे.
या डान्स व्हिडिओ आधी उर्वशीचं कंगना विलायती हे गाणंसुद्धा रिलीज झालं आहे. या गाण्यानेही युट्यूबवर कमाल केली आहे. या गाण्यातही उर्वशीने डान्सचा जबरदस्त तडका लावला आहे.
उर्वशीचे आता इन्स्टाग्रामवर तब्बल 25 मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. आपल्या चाहत्यांसाठी उर्वशीने काही बोल्ड फोटोजही तिच्या इन्स्टा अकाउंटवर शेअर केले आहेत. पाहा उर्वशीचा हा बोल्ड अंदाज. या बोल्ड लुकमध्ये उर्वशीने ब्लॅक रंगाची मोनोकिनी घातली आहे आणि त्यावर रेड हॉट लिपस्टीक आणि कर्ल हेअरस्टाईल केलेला लुक ती फ्लाँट करत आहे. या आऊटफिटमध्ये तिने खूपच ग्लॅमरस पोज दिल्या आहेत.
या आधीही उर्वशीचे ब्लॅक बिकीनीमधले फोटोज व्हायरल झाले होते. तसंच तिने शेअर केलेला पूलमध्ये एन्जॉय करतानाचा व्हिडिओही फॅन्सनी पसंत केला होता.
लॉकडाऊनमुळे इतर स्टार्सप्रमाणे उर्वशीही सध्या घरातच आहे. पण तरीही ती सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत चर्चेत असून तिचे जुने फोटोज आणि व्हिडिओज शेअर करत आहे.
अभिनेत्री उर्वशी रौतेलाने सनी देओल सोबतच्या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये एंट्री केली होती. तिचा पहिला चित्रपट सिंह साहेब द ग्रेट हा होता. या चित्रपटात तिने सनी देओलच्या बायकोची भूमिका साकारली होती. त्यानंतर ती ग्रेट ग्रँड मस्ती या चित्रपटात दिसली होती. उर्वशी रौतेला हेट स्टोरी 4 या बोल्ड चित्रपटाने खूप चर्चेत आली होती.