कोरोनामध्येही उर्वशी रौटेलाचा हॉट व्हिडिओ होतोय व्हायरल

कोरोनामध्येही उर्वशी रौटेलाचा हॉट व्हिडिओ होतोय व्हायरल

कोरोना व्हायरसच्या वाढत्या सावटाखाली सध्या प्रत्येक जण घरात लॉक आहे. ज्याला सेलिब्रिटीही अपवाद नाहीत. प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने स्वतःचा वेळ घालवत आहे. याच दरम्यान बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय जो इतर सेलेब्सपेक्षा वेगळा आहे. एकीकडे सेलिब्रिटीज भांडी घासताना, लादी पुसताना आणि वर्कआऊट करताना दिसत आहेत तर उर्वशी घरात नाहीतर समुद्रात मस्त एन्जॉय करताना दिसतेय.

उर्वशीच्या व्हायरल व्हिडिओमागचं सत्य

उर्वशीने नुकताच हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामुध्ये ती समुद्रात असून मस्तपैकी पाण्यात खेळताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये उर्वशीने बिकीनी घातली असून ती पाण्यात मनसोक्त डुंबत आहे. उर्वशी या व्हिडिओत फारच बोल्ड लुकमध्ये दिसतेय. हा व्हिडिओ पाहून आधी सगळेच अचंबित झाले पण नंतर कॅप्शन पाहताच खुलासा झाला. उर्वशीने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, मी क्वारंटाईनमध्ये अशी आंघोळ करते. तसंच तिने शेअर केलेला हा व्हिडिओ जुना आहे. हा व्हिडिओ ती जाऊन आलेल्या मालदीव्ह व्हेकेशनमधला आहे. तर तिने लोकेशनमध्येही लिहीलं आहे की, बेडवर पडल्या पडल्या दिसणारी स्वप्नं. खरंय सध्या सगळेच घरी आहेत त्यामुळे आंघोळीलाही भरपूर वेळ मिळतोय आणि स्वप्नं पाहण्यासाठीही फुरसतच आहे. 

उर्वशीसोबतच इतर स्टार्ससुद्धा घरी आहेत आणि कोरोनाबाबतची जागरूकता करतच काही मजेशीर व्हिडिओही पोस्ट करत आहेत. उर्वशीसुद्धा इतर सेलेब्सप्रमाणे सतत सोशल मीडियावर एक्टीव्ह असतेच.

काही दिवसांपूर्वीच तिने घरात योगा करत असतानाचा व्हिडिओही शेअर केला होता.

पण उर्वशीचा हॉट बीच व्हिडिओ पाहून आपणही प्रार्थना करूया की, तिचं हे स्वप्न खरं होऊ दे आणि आपल्या सगळ्यांची कोरोनातून सुटका होऊ दे. तोपर्यंत लॉकडाऊन फॉलो करा आणि घरात राहा, सुरक्षित राहा.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.