‘वर्जिन भानुप्रिया’ नावाचा चित्रपट घेऊन येत आहे उर्वशी रौतेला

‘वर्जिन भानुप्रिया’ नावाचा चित्रपट घेऊन येत आहे उर्वशी रौतेला

अभिनेत्री उर्वशी रौतेलाला आतापर्यंत आपण हॉट, सिझलींग अशाच रुपात पाहिले आहे. पण आता थोड्याशा वेगळ्या भूमिकेत ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिचा नवा कोरा चित्रपट ‘वर्जिन भानुप्रिया’ लवकरच सोशल प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. आता कोरोनामुळे याचे प्रमोशन करणे आता शक्य नसल्यामुळे तिने यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. तिचा हा चित्रपट येणार हे अनेकांना माहीत होते. कारण काहीच दिवसांपूर्वी तिच्या या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. पण आता या चित्रपटाच्या रिलीजसाठी आपल्याला 14 जुलैपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. हा  चित्रपटही सध्याची परिस्थिती पाहता रिलीज होणार आहे.

इश्क सुभान अल्लाह’मध्ये ईशा सिंगचा कमबॅक, जुनीच झारा आता नव्या अवतारात

बॉयफ्रेंडच्या नावाचा घेतला आधार

सेलिब्रिटींच्या रिलेशनशीपबद्दल अनेकांना कायमच उत्सुकता असते. बी टाऊनमधील कोणाचे कोणासोबत रिलेशनशीप आहे. हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. या उत्सुकतेचा पब्लिसिटीसाठी आधार घेत उर्वशीने तिच्या बॉयफ्रेंडचे नाव सांगण्याची एक पोस्ट शेअर केली खरी पण त्यानंतर तिची ही पोस्ट पब्लिसिटी स्टंट असल्याचे कळले. तिने त्या पोस्टमध्ये म्हटले होते की, माझा बॉयफ्रेंड हा 30 फेब्रुवारीप्रमाणे आहे. तो अस्तित्वातच नाही. पण त्यामध्ये तिने तिच्या नव्या चित्रपटाचा उल्लेख केल्यामुळे अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या. हा एकूणच प्रमोशनचा भाग होता हे ही अनेकांना कळलेच असेल.

उर्वशीचा हा चित्रपट सिंगल असणाऱ्यांसाठी

जर तुम्ही सिंगल असाल तर तुमच्यासाठी व्हर्जिन भानुप्रिया हा चित्रपट एकदम परफेक्ट आहे.  उर्वशी या चित्रपटात भानुप्रिया नावाच्या मुलीची भूमिका साकारत आहे.  भानुप्रिया एक अशी मुलगी आहे जिच्या आयुष्यात प्रेम नाही. म्हणजे ती सिंगल आहे. आता तरी तिने काही तरी करायला हवे. म्हणून तिच्या सगळ्या मैत्रीणी तिला प्रोत्साहन देतात. पण तरीही तिच्या आयुष्यात फार काही बदल घडत नाही. पण हा सगळा घाट चित्रपटात कॉमेडीच्या रुपात मांडला आहे. त्यामुळे हा चित्रपट फुल टू धम्माल असणार आहे. हा चित्रपट या काळात थिएटरमध्ये रिलीज करता येणार नाही. म्हणूनच हा चित्रपट झी5 वर रिलीज केला जाणार आहे. ऑनलाईन रिलीज होणाऱ्या चित्रपटाच्या यादीमध्ये आता आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे. 

स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेत येणार छोटे शिवबा!

नुकतेच झाले 27 मिलियन फॉलोअर्स

उर्वशीने आतापर्यंत अनेक चित्रपटामध्ये काम केलेले नाही. पण तिने जितक्या काही चित्रपटांमध्ये काम केलेले आहे .त्यामध्ये तिच्या मादक अदांनी तिने सगळ्यांना घायाळ केले आहे. तिचे इन्स्टाग्रामवर अनेक फॉलोअर्स आहेत. तिने नुकताच 27 मिलियनचा टप्पा पार केला आहे. यासाठी  तिने तिच्या फॉलोअर्सचे आधार मानले आहे.  त्यासाठी तिने एक खास व्हिडिओही पोस्ट केला आहे. 

सोशल मीडियावर असते काय अॅक्विटिव्ह

उर्वशी रौतेला तिच्या सोशल मीडियावर कायम अॅक्टिव्ह असते.  लॉकडाऊनमध्ये तिने तिचे अनेक फोटो शेअर केले आहेत. इतरांप्रमाणे तिही तिच्या घरात असून तिच्या कुटुंबासोबत ती आपला वेळ घालवत आहे. 


तर आता तुम्हाला काहीतरी हलकं फुलकं पाहायचं असेल तर 14 जुलैला उर्वशीचा चित्रपट पाहता येईल.

अचानक जॅकलिनने सोडले सलमान खानचे फार्महाऊस, काय आहे नक्की कारण