ADVERTISEMENT
home / Hair Removal
‘तुम क्यो इतना रेझर घुमा रहे हो!’ जाड केस यायला नकोत तर हे वाचा

‘तुम क्यो इतना रेझर घुमा रहे हो!’ जाड केस यायला नकोत तर हे वाचा

एखाद्या जाहिरातीसारखे प्रत्येकतच तुम्हाला सिल्की, स्मुथचा फिल परत येतो. पण तो आनंद अगदी काहीच दिवसांचा असतो. कारण त्यानंतर तुम्हाला जाड केस येतात खरंतर केस जाड येत नाहीत. पण रेझर कसेही फिरवल्यामुळे तुमच्या केसांच्या वाढीची दिशा बदलते. त्यामुळे तुम्हाला ते जाड वाटत असतात.  रेझर वापरण्याचीही एक पद्धत आहे. माझ्यावर विश्वास ठेवा ती पद्धत फॉलो केली तर खरचं तुम्हाला हेअर रिमुव्हल संदर्भात कोणताही त्रास होणार नाही.

celluliteमुळे शॉर्ट कपडे घालणे टाळता? मग जाणून घ्या घरगुती इलाज

शेव्हिंग फोमचा वापर

शेव्हिंग फोमचा वापर केवळ पुरुष करतात असे नाही. मुळात शेव्हिंग फोम केस नरम करण्यासाठी वापरतात.  त्यामुळे तुम्ही कितीही घाईत असलात तरी तुम्हाला हात किंवा पाय, अंडरआर्म्स अगदीच व्हजायनावरील जरी केस काढायचे असतील तरी तुम्ही आधी त्यावर कमी केमिकल्स असलेले शेव्हिंग फोम वापरा मगच केसांना रेझरचा वापर करा.

ADVERTISEMENT

shaving foam

खालून वर फिरवा रेझर

कधीही रेझर फिरवताना खालून वरच्या दिशेला फिरवा.काहींना रेझर कसाही फिरवायची सवय असते.म्हणजे ते कसाही रेझर फिरवतात. शिवाय रेझर फिरवताना तुम्ही इतका जोर लावू नका की. तुम्हाला दुखापत होईल. अगदी अलगद हे रेझर फिरवा. विशेषत: अंडरआर्म्स आणि व्हजायनावर कारण हे भाग फार नाजूक असतात.

वजन कमी करण्यापासून केसगळती थांबण्यापर्यंत जास्वंदी बहुगुणी

ADVERTISEMENT

मॉश्चरायझर

रेझर फिरवल्यानंतर तुमची त्वचा ड्राय होतात हा गैरसमज आहे. पण तरीही शेव्हिंग केल्यानंतर तुमच्या त्वचेची छिद्र उघडतात.जर तुमची त्वचा नाजूक असेल तर मग तुमची त्वचा लाल दिसू लागते. रेडनेस येऊ नये. म्हणून चांगले मॉश्चरायझर लावा.

mositerizer

अॅलोवेरा जेल

ADVERTISEMENT

रेझर फिरवल्यानंतर तुमची त्वचा खूपच जळजळत असेल तर तुम्ही त्यावर अॅलोवेरा जेल लावली तरी चालू शकते कारण त्यामुळे तुमच्या रेझर केलेल्या भागाला थंडावा मिळेल.

प्रेग्नंसीनंतर असा मिळवा सुडौल बांधा

शेव्हिंगनंतर डिओचा वापर

अंडरआर्म्स शेव्ह केल्यानंतर तुम्ही थेट तुमच्या अंडरआर्म्समध्ये डिओ स्प्रे केला असेल तर तुमचं दु:ख आम्हाला माहीत आहे. तुमचे अंडरआर्म्स इतके झोंबायला लागतात की, विचारता सोय नाही. म्हणून शेव्ह केल्यानंतर आधी तुम्ही तुमच्या अंडरआर्म्सला अॅलोवेरा जेल  किंवा बर्फ लावा. तेथील पोअर्स बंद झाल्यानंतर तुम्ही काखेत बेबी पावडर लावा. त्याचाही सुगंध चांगला असतो.

ADVERTISEMENT

 जुन्या रेझरचा वापर टाळा

एखादे रेझर किती वापरायला हवे ? म्हणजे काही जणांनी मी एखादे रेझर महिनोनमहिने वापरताना पाहिले आहे.  शिवाय ते जो रेझर पायाला वापरतात तोच हाताला वापरतात. जर तुम्ही हातापायासाठी एकच रेझर वापरत असाल तर ते चांगल्या प्रतीचे वापरा. ब्लेड चेंज करणारे रेझर वापरत असाल तर एखादे ब्लेड तीन ते जास्तीत जास्त चारवेळा वापरा त्यावर नको. जर तुम्ही महागडे रेझर वापरत असाल तरी ते ७ ते ८ वेळा वापरा त्यावर नको. कारण त्यानंतर त्यांच्या पात्यांची घार कमी होते. मग असे रेझर जास्ती जोरात अंगावरुन फिरवले जातात तसे करु नका.

clean leg

चेहऱ्यावर रेझर वापरताना

ADVERTISEMENT

अनेकांना रेझर त्यांच्या फेसवरही वापरायचा असतो. पण चेहऱ्यावर रेझर वापरण्याचा सल्ला आम्ही देणार नाही. जर तुम्ही चेहऱ्यावर लेझर ट्रिटमेंट घेतली असेल तर तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक ग्रोथसाठी रेझर वापरण्याचा सल्ला दिला जातो. अशावेळी तुम्ही खास चेहऱ्यासाठी असलेले रेझर वापरायला हवेत कारण त्यांची धार कमी असते. कारण तुमचा चेहरा नाजूक असतो. कोणत्याही कारणाने तुमच्या चेहऱ्यावर जखमा करण्याचा रेझरचा उद्देश नसतो. म्हणून चेहऱ्यावर रेझर वापरताना सावधान. शक्यतो रेझर वापरणे टाळा.

face shaving

आता या टीप्स फॉलो करुन तुम्ही बिनधास्त शेव्ह करा तुमचे हात, पाय… आणि मस्त करा तुमचा स्पेशल दिवस एन्जॉय….

15 Mar 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT