कलर्स चॅनलवर बराच काळ चाललेली 'उतरन' सीरियल तुम्हाला लक्षात असेलच ना. या सीरियलने तब्बल 7 वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. या सीरियलमधील इच्छा आणि तपस्याच्या भूमिकेतील टीना दत्ता आणि रश्मी देसाई घराघरात पोचल्या होत्या.
View this post on Instagram
View this post on Instagram
या दोन्ही बहिणींमधलं आंबट-गोड रिलेशनशिप सीरियलच्या फॅन्सना खूपच आवडलं होतं. असं म्हणतात की, सेटवरसुद्धा रश्मी देसाई आणि टीना दत्ता यांचं रिलेशनशिप असंच होतं. पण या बातम्या आल्यानंतरही त्यांनी पब्लिकली आपलं रिलेशनशिप नेहमी मेेंटेन केलं. काही दिवसांपूर्वी इच्छा आणि तपस्याची जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली. जेव्हा या दोघींना गोव्यात एकत्र एन्जॉय करताना पाहण्यात आलं.
कोमोलिकाच्या अवतारात आता 'ही' अभिनेत्री देणार अनुराग- प्रेरणाला त्रास
'उतरन'चा पार्ट- 2 येणार का?
आता या गोष्टीला योगायोग म्हणावा की, इच्छा आणि तपस्यामधील प्रेम, ज्यामुळे या ऑनस्क्रीन बहिणी गोव्यात भेटल्या. या दोघींच्या एकत्र येण्याने तुम्हाला वाटेल की, ‘उतरन’ सीरियलचा पार्ट-2 येणार की काय , पण असं काहीच नाही. खरंतर एका कामानिमित्त टीना गोव्यात होती, जिथे रश्मीही एका लग्नासाठी गेली होती. हे कळताच टीनाने तिचं काम लवकर संपवलं आणि ती रश्मी असलेल्या वेडींग व्हेन्यूवर पोचली.
या एकेकाळी ऑनस्क्रीन बहिणी असलेल्या या दोघी एकमेंकीना भेटून फारच आनंदी झालेल्या दिसल्या.
रश्मी देसाई आणि टीना दत्ता यांच्या गोव्यातील फोटोजमुळे प्रेक्षकांच्या मनातील उतरन सीरियलच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या.
‘कसौटी जिंदगी की’ फेम प्रेरणा आणि कोमोलिकाचं झालं सेटवर भांडण
सोशल मीडियावर व्हायरल झाली पुर्नभेट
गोव्यातल्या भेटीदरम्यान रश्मी देसाई आणि टीना दत्ता या दोघीही फारच सुंदर दिसत होत्या. दोघींनी या भेटीदरम्यान स्टनिंग आऊटफिट्स घातले होते. रश्मी देसाईने व्हाईट गाऊन घातलेला तर टीनाने पीच कलरची सुंदर लेहंगा-चोली घातली होती. या दोघींचीही भेट एखाद्या री-युनियनपेक्षा कमी नव्हती. रश्मी देसाई आणि टीना दत्ताने एकत्रितपणे अनेक पोज दिल्या. सोशल मीडियावर ही पुर्नभेट फारच व्हायरल झाली.
या गोव्यातील भेटीबाबत अभिनेत्री टीना दत्ताने सांगितलं की, ‘मी एका इव्हेटंसाठी गोव्याला गेले होते. जिथे माझी बऱ्याच काळानंतर रश्मी देसाईशी भेट झाली. रशु (रश्मी देसाई)ला एवढ्या दिवसानंतर भेटून मला खूप चांगलं वाटलं. आम्ही दोघींनी खूप एन्जॉय केलं. फ्लाईटमध्येही आम्ही दोघींनी खूप गप्पा मारल्या. खरं सांगायचं तर आमच्याकडे बोलण्यासाठी बरंच काही होतं. मग आम्ही एकत्र डीनरही केला.’
फोटो सौजन्य : Instagram
हेही वाचा -