‘उतरन’फेम श्रीजिता डे चा बर्फाळ प्रदेशात हॉट अवतार

‘उतरन’फेम श्रीजिता डे चा बर्फाळ प्रदेशात हॉट अवतार

काही अभिनेत्री या टेलिव्हिजनवर अगदी संस्कारी बहू अर्थात सुनांच्या भूमिका साकारत असतात. त्यामुळे त्यांची इमेज प्रेक्षकांच्या मनातही तशीच असते. पण आता टेलिव्हिजनवरची अजून एक सून आपला संस्कारी लुक सोडून पुन्हा एकदा बोल्ड आणि हॉट अवतारात दिसली आहे. इतकंच नाही तर अगदी बर्फाळ प्रदेशात या अभिनेत्रीने 10 अंश सेल्सिअस तापमानामध्ये हे बोल्ड शूट केलं आहे. या तापमानात हॉट बिकिनी घालून ‘उतरन’फेम श्रीजिता डे ने फोटोशूट केलं आहे. हे फोटोशूट पाहून तिच्या चाहत्यांनाच नाही तर प्रेक्षकांनाही धक्का बसला नाही तर नवल. पण सर्वांना नवल या गोष्टीचं वाटत आहे की, इतक्या थंडीत बिकीनीमध्ये श्रीजिताने शूट केलं कसं? सध्या श्रीजिताने हे हॉट फोटो व्हायरल झाले असून या फोटोजना नेटीझन्सने चांगलंच लाईक केलं आहे.


Shrijeeta


श्रीजिताने दाखवला आपल्या हॉटनेसचा जलवा


श्रीजिता हे नाव हिंदी मालिकेमध्ये नक्कीच नवं नाही. ‘उतरन’फेम श्रीजिता डे चे बरेच चाहते आहेत. श्रीजिता सध्या आपली सुट्टी काश्मीरमध्ये घालवत आहे. काश्मीरच्या बर्फाळ प्रदेशात सध्या 10 अंश सेल्सिअस इतकं थंंड वातावरण आहे. पण श्रीजिताने मात्र या थंडीमध्ये केलं आहे हॉट फोटोशूट. या फोटोशूटमुळे श्रीजिता चांगलीच चर्चेत आली आहे. इतक्या बोल्डनेसने श्रीजिताने हे फोटोशूट केलं आहे की, सध्या सोशल मीडियावर तिच्याच नावाची चर्चा आहे. श्रीजिताने आपल्या हॉटनेसचा जलवाच एकप्रकारे आपल्या चाहत्यांना दाखवला आहे असं म्हणायला हरकत नाही. तिने तिचे अनेक फोटो अधिकृत अकाऊंटवरून शेअर केले आहेत.


shri
या फोटोमध्ये श्रीजिता गोल्डन अर्थात सोनेरी रंगाच्या टू पीस बिकिनीमध्ये दिसत आहे. तिने हा फोटो शेअर करून त्यावर कॅप्शन लिहिले, ‘अबाऊंडिंग चॅलेंज - 10 डिग्री, बघायचं आहे की, कसं वाटतं’


shri in bikini
हे हॉट फोटोशूट तिने काश्मीरमधील गुलमर्गच्या बर्फाळ आणि अतिशय थंड वातारवणामध्ये केलं आहे. त्यामुळे तिचे हे फोटो सध्या खूपच व्हायरल होत आहेत.


श्रीजिताने आपल्या करिअरची सुरुवात प्रसिद्ध मालिका 'कसौटी जिंदगी की' पासून केली होती. त्यानंतर तिने 'अन्नू की हो गई वाह भाई वाह','पिया रंगरेज', 'कोई लौट के आया हैं' आणि 'करम अपना- अपना' सारख्या टीव्ही मालिकांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. पण तिला खरी ओळख मिळाली ती ‘उतरन’ या प्रसिद्ध मालिकेमुळे. श्रीजिता अभिनेत्री तर आहेच पण त्यापूर्वी ती एक प्रसिद्ध मॉडेलही आहे. तिने अनेक मॉडेलिंगचे असाईनमेंट्स केले असून तिचा चेहरा फोटोजेनिक आहे.


shri at sea
काही दिवसांपूर्वी श्रीजिताने समुद्र किनारी काढलेला बिकिनीमधील एक फोटो इन्स्टावर शेअर केला होता. पण त्यावेळी ती खूपच ट्रोल झाली होती. पण असं असतानाही आता पुन्हा एखदा तिने बिकिनीमधला आपला हॉट अवतार प्रेक्षकांना दाखवला आहे. पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांच्या आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया काय असतील याची तिने जराही तमा न बाळगता जे आपल्याला आवडतं तेच केलं आहे. तिच्या या फोटोशूटमध्ये ती अतिशय सुंदर दिसत असून तिने आपली परफेक्ट फिगरदेखील यामधून दाखवून दिली आहे.


hot shri


श्रीजिता ही केवळ मालिकांमध्येच नाही तर मोठ्या पडद्यावरही दिसली आहे. अक्षय कुमार आणि करीना कपूरच्या ‘टशन’ या चित्रपटामध्ये अक्षय कुमारबरोबरही श्रीजिताने काम केलं आहे. तर टीव्ही क्वीन म्हणून ओळखली जाणारी निर्माती एकता कपूरच्या कँपमधील एक श्रीजितादेखील असल्याचं म्हटलं जातं. श्रीजिता हीदेखील एकताच्या जवळच्या असणाऱ्या लोकांपैकी एक आहे.


फोटो सौजन्य - Instagram


हेदेखील वाचा - 


जय मल्हारफेम ‘म्हाळसा’ अडकली लग्नाच्या बेडीत


सई ताम्हणकर करतेय डिजीटल डिटॉक्स


जेव्हा माधुरीने सांगितल्या श्रीदेवीसोबतच्या आठवणी