एकीकडे बिग बॉस मराठी सिझन 2 (#bbm2) ला सुरूवात झाली आहे तर दुसरीकडे बिग बॉस 13 हिंदीच्या बाबतीत गरमागरम चर्चा आहे. जेव्हापासून सलमान खान (Salman Khan) ने या शोच्या तेराव्या सिझनबाबत बोलायला सुरूवात केली आहे. तेव्हापासून या शोमध्ये यंदा कोणते सेलिब्रिटी दिसणार याबाबतत चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच रश्मी देसाई (Rashami Desai) ही उतरन फेम अभिनेत्री यामध्ये भाग घेऊ शकते, अशी अफवा आहे.
View this post on Instagram
खरंतर रश्मी बिग बॉसमध्ये भाग घेणार असल्याचं कळल्यावर तिच्या फॅन्समध्ये आनंदाचं वातावरण होतं पण सूत्रानुसार मिळालेल्या बातमीने फॅन्सच्या आनंदावर विरजण पडू शकतं. सूत्रानुसार रश्मी या शोमध्ये भाग घेणार नाहीयं. कारण तिला अजून या शोची ऑफरच आलेली नाही.
खरंतर रश्मी बऱ्याच दिवसांपासून छोट्या पडद्यापासूनही लांब आहे. कारण ती सध्या एका त्वचा आजाराचा सामना करतेय. या आजारांमुळे तिचं वजन वाढल्याचंही आढळून आलं आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत बिग बॉस 13 मध्ये भाग घेणं जरा कठीणच आहे.
मागच्या वर्षीही रश्मीबाबत बिग बॉसमध्ये भाग घेण्यावरून अशीच अफवा आली होती. त्यावेळीही रश्मीने बिग बॉस 12 मध्ये ती नाहीयं असं सांगितलं होतं. पण तेव्हाही जोरदार अफवा होत्याच.
View this post on Instagram📸 - @suryachaturvedi #AboutLastNight #Shimmy #Tassels #VintageFeels #Delhi #ZareenKhan
बॉलीवूड अभिनेत्री जरीन खानबाबतही बातमी आहे की, ती सलमानच्या या शोमध्ये भाग घेऊ शकते. पण तिनेही ट्विटरवर याबाबत खुलास करून ती या शोमध्ये नसल्याचं सांगितलंय.
आत्तापर्यंत या शोसाठी मेघना मलिक, दयानंद शेट्टी, करण वोहरा, अंकिता लोखंडे, देबोलीना भट्टाचार्य आणि करण पटेल यांची नाव समोर आली आहेत. पण असं वाटतं की, या शोमध्ये रश्मी देसाईला पाहण्यासाठी तिच्या फॅन्सना अजून वाट पाहावी लागेल. दुसरीकडे नेहा कक्करचा एक्स बॉयफ्रेंड हिमांश कोहली आणि टीव्ही अभिनेत्री वाहबिज दोराबजीही बिग बॉस 13 मध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे.
बिग बॉसचा सिझन 12 काही खास चालला नव्हता. त्यामुळे यंदा बिग बॉस मेकर्स या शोमध्ये बदल करण्याची शक्यता आहे. तसंच यंदा या शोमध्ये फक्त सेलिब्रिटीजच दिसतील. दुसरीकडे मराठी बिग बॉस सिझन 2 ला मात्र जोरदार सुरूवात झाली असून पहिल्या सिझनपेक्षा चांगला रिस्पॉन्स मिळत असल्याचं चित्र आहे.