‘युवा सिंगर एक नंबर’मध्ये वैभव मांगले परिक्षकाच्या भूमिकेत

‘युवा सिंगर एक नंबर’मध्ये वैभव मांगले परिक्षकाच्या भूमिकेत

टेलिव्हिजन माध्यमावर सतत नवनवीन टॅलेंट शो प्रदर्शित होत असतात. असाच नवा गाण्याच्या रिअॅलिटी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'युवा सिंगर, एक नंबर' हा संगीत कार्यक्रम लवकरच टेलिव्हिजनवर दिसणार आहे. हा कार्यक्रम जसा हटके आणि निराळा असणार आहे, तसंच या कार्यक्रमातील परीक्षकही नेहमीपेक्षा वेगळे आहेत. या कार्यक्रमात वैभव मांगले परिक्षकाची भूमिका सांभाळणार आहे. वैभव मांगलेला मुळातच गायनाची आवड आहे शिवाय वैभवने रितसर गाण्याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. अनेक लोकप्रिय विनोदी व्यक्तिरेखा साकारणारा वैभव हा एक उत्तम गायक देखील आहे. युवा सिंगर एक नंबर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आता वैभवच्या गायनकौशल्याचा आणखी एक नवा प्रेक्षकांना पाहायला मिळेल. शिवाय वैभवला गाण्यातील समज असल्यामुळे या शोच्या स्पर्धकांनादेखील चांगला फायदा होऊ शकतो. हा कार्यक्रम 7 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. 

वैभवचं एक नवं रूप येणार प्रेक्षकांसमोर

या कार्यक्रमात वैभव तरुण स्पर्धकांना संगीताचे मार्गदर्शन करताना दिसणार आहे. त्यामुळे वैभवला एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहता येणार आहे. कदाचित तुम्हाला हे ठाऊक नसेल की, अभिनय क्षेत्रात आपली खास छाप पाडणारा वैभवला खरंतर गायकच व्हायचे होतं. त्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून वैभवचं एक मोठं स्वप्न पूर्ण होणार आहे. वैभवचा स्पष्टवक्तेपणा त्याच्या चाहत्यांना माहितच आहे शिवाय त्याच्या चटपटीत कॉमेंट्समुळे या कार्यक्रमाची रंगात अजून वाढणार यात शंकाच नाही. यामुळे कार्यक्रमातून प्रेक्षकांना मनोरंजन आणि संगीत मेजवानी मिळणार आहे. 

Instagram

वैभव मांगले निरनिराळ्या भूमिका साकारणारा अभिनेता

कोकणातील रत्नागिरीत जन्माला आलेल्या वैभव मांगलेला मराठीतील विविध बोलीभाषातून अभिनय करण्याचं कौशल्य अवगत आहे. कोकणी, मालवणी, वऱ्हाडी अशा विविध बोलीभाषा तो सफाईदारपणे बोलू शकतो. वैभवने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमातून काम केलं आहे. एक डाव भुताचा, करून गेलो गाव, मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी, वाडा चिरेबंदी, वासूची सासू, व्यक्ती आणि वल्ली, अलबत्या गलबत्या, संगीत सौभद्र अशा नाटकांमधून वैभवच्या अभिनयाचे  कौशल तुम्ही नक्कीच पाहिलं असेल. कुंकू, घडलंय बिघडलंय, फू बाई फू, शेजारी शेजारी पक्के शेजारी अशा अनेक मालिकांमधून वैभवच्या कामाचं कौतुक झालं आहे. तसंच काकस्पर्श, कोकणस्थ, टाईमपास, टाईमपास 2, दुनियादारी, शहापण देगा देवा, शिक्षणाच्या आयचा घो, हरिश्चंद्राची फॅक्टरी अशा अनेक चित्रपटांमधून वैभवने विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. संगीत सौभद्र या नाटकात आणि माझे पती सौभाग्यवती या मालिकेत वैभव मांगलेने स्त्री भूमिकादेखील साकारल्या होत्या. टाईमपासमधील कडक बापाची भूमिका अनेकांच्या लक्षात राहिली होती. अशा विविध भूमिका साकारणारा वैभव एका नव्या भूमिकेतून  आता प्रेक्षकांसमोर येत आहे. शिवाय एका रिअॅलिटी शोचा जज असण्याची त्याची ही पहिलीच वेळ आहे. ज्यामुळे त्याचे चाहते या नव्या शोमधील त्याला परिक्षकाच्या भूमिकेत वैभवला पाहण्यास नक्कीच उत्सुक आहेत यात शंकाच नाही.

 

फोटोसौजन्य - इन्साग्राम

अधिक वाचा

आता भारती सिंह बनणार कपिल शर्माची 'कम्मो बुवा' पाहा तिचा नवा लुक

अनिकेत विश्वासरावच्या 'सासूचा डान्स' व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबईत राहणाऱ्या bollywood सेलिब्रिटींची ही घरं तुम्हाला माहीत आहेत का