वैभव तत्ववादी पडलाय 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात

वैभव तत्ववादी पडलाय 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सध्या अनेक तरूणींच्या मनावर राज्य करणारा वैभव तत्ववादी प्रेमात पडलाय. प्रश्न निर्माण झाला ना नक्की कोणाच्या? तुम्ही कोणताही तर्कवितर्क लावण्याच्या आधी वैभवनेच त्या अभिनेत्रीचं नाव जाहीर केलं आहे. वैभव सध्या नेटफ्लिक्स ओरिजनच्या ‘त्रिभंग’ या चित्रपटामध्ये काम करत आहे. प्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. तर वैभव पहिल्यांदाच काम करतोय ते बॉलीवूडची बबली गर्ल काजोलबरोबर. काजोलबरोबर काम करण्याचा अनुभव वैभवने नुकताच शेअर केला आहे. आपण कसे तिच्या प्रेमात आहोत हेदेखील त्याने सांगितलं आहे. 

‘Good Newwz’च्या टायटलमध्ये का वापरलं चुकीचं स्पेलिंग, करण जोहर म्हणाला…

काजोलच्या वॉईस मॉड्युलेशनच्या प्रेमात वैभव

वैभवने त्रिभंगाच्या वेळचे आपले अनुभव शेअर केले आहेत. वैभवने आतापर्यंत अनेक हिंदी चित्रपटातही काम केलं आहे. अगदी रणवीर दीपिकापासून ते कंगना राणौतपर्यंत काम करण्याचा त्याला चांगला अनुभव आहे. संजय लीला भन्सालीसारख्या कसदार दिग्दर्शकाबरोबरही वैभवने काम केलं आहे. मात्र हा अनुभव वेगळा असल्याचं त्याने सांगितलं.  तसंच निर्मात्यांना आपलं नाव सुचवल्याबद्दल त्याने रेणुका शहाणेचे आभारही मानले. एक अभिनेता म्हणून प्रत्येक भूमिकेमध्ये वेगळापणा देण्याचं काम आपण मनापासून करतो असंही त्यावेळी व्यक्त केलं. तर काजोल ज्याप्रकारे आवाजामध्ये मॉड्युलेशन आणते ते पाहून मी तिच्या प्रेमात आहे हे वैभवने कबूल केलं. इतकंच नाही तर चित्रपटाची स्क्रिप्ट वाचतानादेखील काजोल वेगळीच असते असंही वैभवने यावेळी मुलाखतीमध्ये सांगितलं. काजोल ही एक कसदार अभिनेत्री आहे. तिच्याबरोबर काम करण्यासाठी अनेक लोकांची इच्छा असते. वैभवही त्यापैकीच एक आहे. त्यामुळे तिच्याबरोबर काम करण्याचा अनुभव वेगळा असल्याचंही वैभवने सांगितलं आहे. 

रेडीमिक्स मधील वैभव आणि प्रार्थनाचं 'का मन हे' रोमॅंटिक गाणं प्रदर्शित

तीन पिढ्यांचा प्रवास ‘त्रिभंग’

‘त्रिभंग’ या चित्रपटामध्ये काजोल आणि वैभव तत्ववादी प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन रेणुका शहाणे करत असून यामध्ये मिथिला पालकर, कुणाल रॉय कपूर आणि तन्वी आझमी यांच्यादेखील मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटामध्ये 1980 पासून ते आतापर्यंतच्या अशा तीन पिढ्यांचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. नेटफ्लिक्सवर अनेक वेगवेगळे विषय हाताळले जातात. काजोल पहिल्यांदाच अशा स्वरूपाच्या चित्रपटामध्ये काम करणार असल्याचं म्हटलं जात आहे. शिवाय यामधील स्टारकास्ट तगडी असून वैभवला अजून एक चांगला चित्रपट मिळाला असल्याचा त्याच्या चाहत्यांना नक्कीच आनंद झाला आहे. दरम्यान काजोल आणि अजय देवगण यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘तान्हाजी’चं ट्रेलर नुकतंच प्रदर्शित झालं असून या ट्रेलरला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहेत. काजोल तान्हाजीच्या बायकोच्या भूमिकेत एका मराठमोळ्या अवतारात दिसली आहे. पुन्हा एकदा अजय देवगणचा हा चित्रपट दमदार असेल अशी चर्चा प्रेक्षकांमध्ये सुरू झाली आहे. 

वैभवला 'ऑटम ब्रीझ फिल्म' साठी शुभेच्छा

वैभव तत्ववादी मोस्ट डिझायरेबल मॅन

View this post on Instagram

I come with a lot of baggage 😎 #VTOfficial

A post shared by VAIBHAV TATWAWAADI (@vaibhav.tatwawaadi) on

वैभव तत्ववादी हा मराठीतील मोस्ट डिझायरेबल मॅन आहे असं म्हटलं जातं. इतकंच नाही त्याचं मराठी चित्रपटसृष्टीती हँडसम मॅनच्या यादीतदेखील नाव आहे. अभिनयाबरोबरच त्याच्या लुक्सवर अनेक तरूणी फिदा आहेत. वैभव सोशल मीडियावरही बराच अॅक्टिव्ह  असून नेहमी आपल्या आयुष्यातील आणि कामाविषयीच्या घडामोडी पोस्ट करत असतो. त्याचा चाहता वर्ग अफाट असून त्यामध्ये मुलींची संख्या अधिक प्रमाणात आहे. आता लवकरच वैभवचा अजून एक तगडा परफॉर्मन्स असलेला काजोलसहितचा हा चित्रपट येण्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असतील हे नक्की. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.