वैभवला 'ऑटम ब्रीझ फिल्म' साठी शुभेच्छा

वैभवला 'ऑटम ब्रीझ फिल्म' साठी शुभेच्छा

मराठी चित्रपटसृष्टीतील एक डॅशिंग आणि हॅंडसम अभिनेता ‘वैभव तत्ववादी’. आपल्या सक्षम आणि सतत नाविण्यपूर्ण अभिनयाने वैभवने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचं एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्याच्या ‘डॅशिंग लुक’ने तर अनेक तरुणींना भुरळच घातली. आता वैभव लवकरच एका वेगळ्या भूमिकेतून त्याच्या चाहत्यांसमोर येत आहे. मात्र ‘ही’ त्याची  भुमिका पडद्यामागची असणार आहे. वैभव आता ‘निर्मितीक्षेत्रात’ आपलं दमदार पाऊल रोवत आहे. त्याने ‘ऑटम ब्रीझ फिल्म्स’ नावाच्या निर्मिती संस्थेची स्थापना केली आहे.

मणिकर्णिकामध्ये वैभव साकारणार महत्वाची भूमिका


नववर्षातील आगामी हिंदी चित्रपट ‘मणिकर्णिकाः दी क्वीन ऑफ झांसी’ मध्ये देखील वैभवची एक खास भूमिका असणार आहे. मणिकर्णिका चित्रपट जानेवारी 2019 मध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटामध्ये वैभव ‘पूरणसिंग’ या योद्ध्याची भूमिका साकारत आहे. वैभवने या भूमिकेतील काही फोटोदेखील त्याच्या चाहत्यांसोबत इन्स्टावरुन शेअर केले आहेत. कंगना राणावत या चित्रपटात ‘राणी लक्ष्मीबाई’च्या प्रमुख भूमिकेत आहे. तर ‘झलकारी बाई’च्या भूमिकेत अंकीता लोखंडे झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा भव्य ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. वैभवने यापूर्वी ‘बाजीराव मस्तानी’ या ऐतिहासिक चित्रपटातदेखील काम केलं आहे.


47431522 212324399655481 893524355106387197 n %281%29


वैभवच्या ‘ऑटम ब्रीझ फिल्म्स’बाबत कुतूहल


‘फक्त लढ म्हणा’ या मराठी चित्रपटातून वैभवने त्याच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली.  'कॉफी आणि बरंच काही', 'Mr And Mrs सदाचारी' अशा अनेक मराठी चित्रपटातून वैभव लोकप्रिय झाला. 'हंटर', 'लिपस्टिक अंडर माय बुरखा' अशा चाकोरीबाहेरील हिंदी चित्रपटातील भूमिका साकारताना वैभवच्या अभिनयाचं कौतुकच झालं. आता वैभवला निर्मात्याच्या नव्या भूमिकेत पाहण्याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.


21827491 699601830239276 2255778641323491328 n


फोटोसौजन्य- इन्स्टाग्राम