'वाजवूया बँड बाजा'मध्ये चिन्मय उदगीरकर-प्रीतम कागनेची लव्हेबल केमिस्ट्री

'वाजवूया बँड बाजा'मध्ये चिन्मय उदगीरकर-प्रीतम कागनेची लव्हेबल केमिस्ट्री

टॉल, हँडसम आणि साध्या सरळ लूकने आजही तरुणींच्या हृदयावर राज्य करणारा चिन्मय उदगीरकर त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या नेहमीच पसंतीस पडतो. तर आपल्या सौंदर्य आणि दिलखेचक अदांनी सर्वच प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री प्रीतम कांगणे तिच्या दिलखेचक अदा घेऊन लवकरच 'वाजवूया बँड बाजा' या चित्रपटातून अभिनेता चिन्मयसोबत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात चिन्मय आणि प्रीतमची लव्हेबल केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. चिन्मय आणि प्रीतम हे दोघेही 'वाजवूया बँड बाजा' या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटात दोघांच्या लव्हस्टोरीसह हास्यकल्लोळही पाहायला मिळणार आहे.

(वाचा : 'बस्ता'तील अजयनं गायलेलं 'फुल झुलत्या येलीचं' गाणं रिलीज)

या चित्रपटातील संजूची भूमिका चिन्मय साकारणार असून दिव्याच्या भूमिकेत प्रीतम दिसणार आहे. या चित्रपटात दोघांच्या जगण्याच्या वाटा वेगळ्या आहेत आणि याच वाटा वेगळ्या असल्याचे भान जेव्हा येते तेव्हा त्यांना प्रेमाचा खरा अर्थ समजतो आणि एका मर्यादेनंतर खरा अर्थ समजल्यानंतर त्या प्रेमाचे नक्की काय होते? याबद्दलची उत्सुकता सर्वच प्रेक्षकांना लागून राहिली आहे. शिवाय हे सर्व घडत असताना चिन्मय आणि प्रीतमच्या आयुष्यात नेमके काय बदल होतात हे ही जाणून घेणे तितकेच रंजक ठरेल. 

(वाचा : फॉरेनची फॅन ! माधव देवचकेला कुवेतवरून भेटायला आली चाहती)

अमोल लक्ष्मण कागणे प्रस्तुत राष्ट्रीय पुरस्कार विजेते लक्ष्मण एकनाथराव कागणे, अमोल कागणे निर्मित आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित हा बहुचर्चित 'वाजवूया बँड बाजा' चित्रपट प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यासाठी येत्या 20 मार्च 2020 ला सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. तीन भावांच्या आयुष्यातल्या गमती जमती आणि हास्याचा विस्फोट घडवून आणणारा हा प्रेमकथेवर आधारित असलेला हा 'वाजवूया बँड बाजा' चित्रपट येत्या 20 मार्चला जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की पाहा.

(वाचा : ‘देवाक काळजी रे’ गाणं ठरलं 100 मिलियन व्ह्यूजचं मानकरी)

चिन्मयच्या गाजलेल्या मालिका  

चिन्मयने यापूर्वी अनेक मराठी मालिका आणि नाटकांमधून काम केले आहे. सध्या ‘घाडगे अँड सून’ मधील चिन्मयची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या मालिकेत चिन्मय ‘अक्षय घाडगे’ ही भूमिका साकारत आहे. तसंच काही महिन्यांपूर्वी संपलेल्या ‘स्वप्नांच्या पलीकडे’ आणि ‘नांदा सौख्यभरे’मध्ये या मालिकांमधून चिन्मयला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. प्रेमवारीमध्ये अभिनेता अभिजीत चव्हाणदेखील एका महत्त्वाच्या भूमिकेतून दिसणार आहे. 

(वाचा : आरजे सुमित आणि अभिनेत्री मयुरी घाडगे थिरकणार 'सांज' गाण्यात)

(वाचा : 'दाह' सिनेमा 'व्हॅलेंटाईन डे'ला होणार प्रदर्शित,सुहृद वार्डेकर-सायली मुख्य भूमिकेत)

हे देखील वाचा :
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.