अभिनेत्री वंदना गुप्ते गठबंधन मालिकेमध्ये एन्ट्री झाली आहे. गठबंधन मालिकेत सोनाली पंडीत सावित्रीबाई या डॉनची भूमिका साकारत आहे. आता अभिनेत्री वंदना गुप्ते यांची देखील एन्ट्री गठबंधनमध्ये झाली आहे. सावित्रीबाईच्या मैत्रिणीची म्हणजेच निलिमाची भूमिका वंदना गुप्ते साकारत आहे. सहाजिकच यामुळे गठबंधन मालिकेला एक वेगळेच वळण मिळणार आहे. गठबंधन मालिका हिंदी असली तरी या मालिकेला मराठी ठसका आहे. गठबंधन मालिकेतील मराठी पात्रांमुळे या मालिकेच गुढीपाडव्याचे आयोजन करण्यात आले होते. मराठी नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त महाराष्टरभर स्वागतयात्रा आयोजित केल्या जातात. महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. गुडीपाडव्याची पुजा सुरू असताना अचानक निलिमाची एन्ट्री झाली आहे. निलिमा पटवर्धन ही एका राजकारण्याची पत्नी आहे. सावित्रीबाईसोबत गुढीपाडव्याचं सेलिब्रेशन करण्यासाठी निलिमा आलेली आहे. गुढीपाडव्याच्या कार्यक्रमात झिंगाट या गाण्यावर नृत्य करत निलिमाची एन्ट्री मालिकेत झाली आहे. निलिमाच्या पात्राला निरनिराळ्या छटा आहेत. कारण निलिमामुळे धनकच्या आयुष्यात वादळं निर्माण होणार आहेत.
View this post on Instagram
गुंडगिरी करणारा सावित्रीबाईचा मुलगा ‘रघु’ आणि आयपीएस अधिकारी होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या महत्वकांक्षी ‘धनक’ची यांची गठबंधन ही एक प्रेमकथा आहे. आता धनकचे आयपीएस होण्याचे स्वप्न पूर्ण न होण्यासाठी मालिकेत निलिमाची एन्ट्री झालेली आहे. कारण निलिमा सावित्रीला धनकच्या विरोधात भडकविण्याचे काम करणार आहे.
View this post on InstagramCelebrating #GudiPadwa in #GathBandhan style! 😍 @abrarqazi47 @sonalijnaik
वंदना गुप्ते यांची प्रत्येक भूमिका नेहमीच असते हटके
सुंदर मी होणार, चारचौघी, गगनभेदी, अखेरचा सवाल, श्री तशी सौ,सेलिब्रेशन, चार दिवस प्रेमाचे, शू… कुठे बोलायचे नाही अशा अनेक लोकप्रिय नाटकांमध्ये वंदना गुप्ते यांनी काम केलं आहे. पछाडलेला, मातीच्या चुली, बकेटलिस्ट, लपंडाव, समांतर, बे दुणे चार ,टाईमप्लीज मध्ये भूमिका चांगल्या गाजल्या. फॅमिली कट्टा मधील वंदना गुप्ते यांच्या भूमिकेचे फार कौतुक झाले. अनेक मराठी मालिका आणि जाहीरातीमध्येही वंदना गुप्ते यांनी काम केलं आहे. सध्या 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' या मराठी मालिकेत वंदना गुप्ते यांची महत्तपूर्ण भूमिका साकारत आहेत. शिवाय आता गठबंधनमधील निलिमा पटवर्धनच्या भूमिकेत वंदना गुप्तेंना पाहण्यासाठी त्यांचे चाहते नक्कीच उत्सुक आहेत.
View this post on Instagram
टॉप 100 चित्रपटात 50 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या 'पडोसन'चा समावेश
परिणीतीही आता बहीण प्रियांका चोप्राच्या मार्गावर
हिंदी मीडियममध्ये इरफान खान आणि करिना कपूरच्या मुलीची भूमिका करणार ‘ही’ अभिनेत्री
फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम