ADVERTISEMENT
home / मनोरंजन
फोटोग्राफर तेजस नेरुरकरच्या संकल्पनेतील कॅलेंडर ‘वंदे मातरम् 2019’

फोटोग्राफर तेजस नेरुरकरच्या संकल्पनेतील कॅलेंडर ‘वंदे मातरम् 2019’

दरवर्षी वेगवेगळ्या रूपातील कॅलेंडर आपल्याला पाहायला मिळत असतात. पण फोटोग्राफर तेजस नेरूरकरने यावर्षी त्याच्या संकल्पनेतील एक वेगळं ‘वंदे मातरम् 2019’ हे कॅलेंडर साकारलं आहे. “कॅलेंडर” च्या माध्यमातून नवनवीन विषय साकारायला मिळतात , वेगळं असं काहीतरी चाचपण्याची संधी मिळते. त्यामुळे यावर्षीदेखील त्याने आगळंवेगळं असं कॅलेंडर आणलं आहे. सुप्रसिद्ध छायाचित्रकार अविनाश गोवारीकर यांच्या हस्ते फोटोग्राफर तेजस नेरुरकरच्या ‘वंदे मातरम् 2019’ कॅलेंडरचे लाँच करण्यात आले. याप्रसंगी अविनाश गोवारीकर ह्यांनी तेजसच्या या संकल्पनेचे भरभरून कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शिवाय यावेळी कॅलेंडरमध्ये समावेश असलेले कलाकार अर्थात पूजा सावंत, सौरभ गोखले, उमेश कामत, प्रिया बापट, शरद केळकर, आदिनाथ कोठारे हेदेखील यावेळी उपस्थित होते. अविनाश गोवारीकर यांच्या हस्ते कॅलेंडर लाँच करण्यात आल्यानंतर या सर्वांनीदेखील आपली उपस्थिती दर्शवत कॅलेंडर लाँच केले.

sai as savitrabai

काय आहे संकल्पना?

ह्या देशात आपण मुक्तपणे श्वास घेऊ शकतो , स्वतंत्र राहू शकतो, त्या देशाचा प्रत्येक कोपरानकोपरा हा स्वातंत्र्यवीरांच्या त्यागातून आपल्याला परत मिळाला आहे.. त्यांच्या त्या त्यागाची परतफेड आपल्याकडून होणं केवळ अशक्यच.  पण त्यांची आठवण अंतर्मनात कुठल्या ना कुठल्यतरी रूपात पक्की असावी ह्या धारणेतून कॅलेंडरची संकल्पना रुजली आणि ती प्रत्यक्षात आली. ‘केवळ १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी असे दिवस सोडल्यास त्या हुतात्म्यांची आठवण क्वचितच होते, अथवा होते का ? हा मी मलाच विचारलेला प्रश्न!  ह्याच प्रश्नाला उत्तर म्हणून , त्या स्वातंत्र्यवीरांना मानवंदना आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी म्हणून ह्या वर्षीच म्हणजेच २०१९ चे कॅलेंडर ‘वंदे मातरम् 2019’ ची फोटोग्राफी आणि निर्मिती करण्यात आल्याचं तेजसनं सांगितलं आहे.

ADVERTISEMENT

saurabh gokhle
कॅलेंडरवर जवळपास 26 कलाकारांचा समावेश

मराठी चित्रपटसृष्टीतील जवळपास 26 कलाकारांचा सहभाग यंदाच्या या कॅलेंडरमध्ये करण्यात आला आहे. शरद केळकर, उमेश कामत, सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, प्रवीण तरडे, सुनील बर्वे,  सागर देशमुख, डॉ. अमोल कोल्हे, आदिनाथ कोठारे, प्रियदर्शन जाधव, अमेय वाघ, ललित प्रभाकर, अक्षय टांकसाळे, सोनाली कुलकर्णी (jr) , प्रिया बापट, श्रिया पिळगावकर , प्राजक्ता माळी, सई ताम्हणकर, नेहा महाजन , प्रियांका बर्वे , पूजा सावंत, उर्मिला कानिटकर, श्रेया बुगडे , ऋता दुर्गुळे, तेजश्री प्रधान, स्पृहा जोशी या सर्व कलाकारांचं  स्वातंत्र्यवीरांच्या भूमिकेत फोटोशूट करण्यात आलं आहे. यातील बरेच कलाकार असे आहेत, जे या फोटोमध्ये अगदी ओळखूही येत नाहीत. तर बरेच कलाकार हे तंतोतंत स्वातंत्र्यवीरांप्रमाणेच दिसत आहेत. त्यामुळे तेजसने केलेली फोटोग्राफी ही अप्रतिम आहे असं म्हणावं लागेल. सावरकरांच्या वेशभूषेतील सौरभ गोखले तर तंतोतंत सावरकरांसारखाच दिसत असून सावित्रीबाई फुलेंच्या अवतारातील सईनेदेखील लक्ष वेधून घेतलं आहे. विवेकानंदाच्या अवतारातील उमेश कामत आणि ए. व्ही. कुट्टीमलू अम्माच्या अवतारातील प्रिया बापटदेखील या फोटोंमध्येही अप्रतिम दिसत असून इतर कलाकारांनाही लक्ष वेधून घेतलं आहे. शिवाय अमेय वाघ, प्रियदर्शन जाधव यांना तर ओळखताही येत नाही. इतके त्यांना दिलेल्या वेशभूषेत काही कलाकार पूर्णतः समरसून गेले आहेत. 

priya as zanshi rani

18 Jan 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT