वरूण धवन नोव्हेंबरमध्ये करणार डेस्टिनेशन वेडिंग

वरूण धवन नोव्हेंबरमध्ये करणार डेस्टिनेशन वेडिंग

बॉलीवूडमध्ये गेल्या वर्षीपासून लग्नाचा सीझन चालू आहे. अनुष्का शर्मा, सोनम कपूर, दीपिका पादुकोण, प्रियांका चोप्रा यांनी लग्न केल्यानंतर बऱ्याच टीव्ही सेलिब्रिटीजच्या लग्नाच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या. नुकतंच या यादीत आदित्य रॉय कपूरचंही नाव समाविष्ट झालं आहे. आदित्य रॉय कपूर लवकर प्रसिद्ध मॉडेल दिवा धवनशी लग्न करणार आहे. तर गेल्या कित्येक महिन्यापासून वरूण धवन आणि नताशादेखील बोहल्यावर चढण्यासाठी तयार असल्याचं म्हटलं जात आहे. बरेचदा वरूण आणि डेव्हिड धवनने या गोष्टी नाकारल्या असल्या तरीही मिळालेल्या माहितीनुसार वरूण आणि नताशा यावर्षी नोव्हेंबरमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याचं म्हटलं जात आहे. यापूर्वी ही जोडी डिसेंबरमध्ये लग्न करणार होती. पण आता नोव्हेंबरमध्ये लग्न करणार असून दोन्ही घरातून तयारी सुरु झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. 

वरूणची गर्लफ्रेंड नताशाला चाहत्याची विचित्र धमकी

वरूणचं लग्न हाय प्रोफाईल इव्हेंट

Instagram

वरूण आणि नताशाचा घरच्या घरीच साखरपुडा झाला असल्याचंही काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालं होतं. पण यावर कोणीही स्पष्टीकरण दिलेलं नाही. वरूण नताशावर खूपच प्रेम करतो आणि गेले कित्येक वर्ष हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. तसंच वरूण आणि नताशाचं लग्न हे हाय प्रोफाईल इव्हेंट असल्यांचही म्हटलं जात आहे. वरूण आणि नताशाचा डेस्टिनेशन वेडिंग होणार असून या लग्नात अगदी जवळच्या माणसांना आमंत्रण असणार आहे. पण लग्नानंतर होणाऱ्या रिसेप्शनमध्ये संपूर्ण बॉलीवूडला आमंत्रण देण्यात येईल असंही म्हटलं जात आहे. दोन्ही घरांमध्ये तयारी सुरु झाली असून लवकरच याची घोषणा वरूण करेल असंही सांगण्यात येत आहे. यापूर्वीदेखील याबाबत डेव्हिड धवन यांना विचारलं असता वरूणचं लग्न दणक्यात होईल असं त्यांनी सांगितलं होतं. वरूण आणि नताशा याबाबत कधीही काही बोलत नाही. पण प्रत्येक कार्यक्रमात दोघंही एकत्र दिसतात. बऱ्याच पार्टी आणि इतर ठिकाणीही हे दोघं एकत्रच फिरताना दिसतात. 

वरूण धवनचा ‘स्ट्रीट डान्सर’ मधला फर्स्ट लुक रिलीज

वरूण सध्या व्यग्र

वरूण सध्या कामामध्ये व्यग्र आहे. रेमो डिसुझा दिग्दर्शित ‘स्ट्रीट डान्सर’चं चित्रीकरण संपवून वरूणने आता सारा अली खानबरोबर ‘कुली नंबर 1’ च्या रिमेकच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन डेव्हिड धवन करत आहेत. यावर्षी प्रदर्शित झालेला ‘कलंक’ बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. त्यामुळे वरूणच्या करिअरमध्ये हा पहिलाच चित्रपट फ्लॉप ठरला. त्यानंतर वरूणने उदास झाला होता. पण पुन्हा एकदा त्याच जोमाने वरूणने कामाला सुरुवात केली. वरूण सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव्ह असतो. तसंच त्याला अनेक फॉलोअर्स आणि चाहते आहेत. वरूण आपल्या चित्रीकरणाचे व्हिडिओ पोस्ट करत असतो. त्याचप्रमाणे वरूण सध्या त्याच्या पुतणीबरोबरच व्हिडिओदेखील पोस्ट करत असतो. वरूणचं त्याच्या पुतणीवर खूप प्रेम आहे आणि तो ते नेहमी सोशल मीडियावरही व्यक्त करत असतो. त्याच्या चाहत्यांनाही आता वरूणने सेटल व्हावं असंच वाटत आहे. तसंच वरूण आता लग्नाची कधी बातमी देत आहे याची सर्वजण वाट पाहात आहेत. अजूनही वरूणने ही गोष्ट अधिकृतरित्या सांगितली नसली तरी सुत्रांनी दिलेल्या बातमीनुसार वरूण आणि नताशा याचवर्षी बोहल्यावर चढणार आहेत. आता सगळेच त्याच्याकडून या गोड बातमीच्या घोषणेची वाट पाहत आहेत.

'कुली नं. 1' च्या रिमेकमध्ये वरूण आणि सारा