म्हातारपणातही बॉलीवूड स्टार्स दिसत आहेत ‘हॉट’, फोटो झाले व्हायरल

म्हातारपणातही बॉलीवूड स्टार्स दिसत आहेत ‘हॉट’, फोटो झाले व्हायरल

बॉलीवूडमधील सगळेच स्टार सोशल मीडियावर थोड्याअधिक प्रमाणात अॅक्टिव्ह असतात. त्यातही सोनम कपूर, रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, वरूण धवन, अर्जुन कपूर, प्रियांका चोप्रा हे स्टार्स तर सतत काही ना काही पोस्ट करत आपल्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतात. शिवाय सोशल मीडियावर सतत काही ना काही ट्रेंडही चालू असतो आणि हे ट्रेंड्स आणि चॅलेंज स्वीकारायला बॉलीवूडमधील हे स्टार्स अजिबातच घाबरत नाहीत. असाच एक ओल्ड एज लुक पोस्ट करण्याचा ट्रेंड बॉलीवूड कलाकारांमध्ये चालू आहे. सोनम कपूरने सर्वात पहिले जेव्हा आपला फोटो पोस्ट केला त्यानंतर आता अनेक सेलिब्रिटीजने आपले ओल्ड एज लुकमधील फोटो अपलोड केले असून त्यांच्या चाहत्यांचा तुफान प्रतिसाद सोशल मीडियावर मिळत आहे. या लुकमध्येही हे सेलिब्रिटी हॉट दिसत आहेत. नुकताच यामध्ये वरूण धवन आणि अर्जुन कपूरनेही फोटो पोस्ट केला असून या फोटोंना फारच कमी वेळात जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. 

अर्जुन दिसतोय स्मार्ट तर वरूण दिसतोय अनिल कपूरसारखा

View this post on Instagram

Old age hit me like .. 👀

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) on

सोनम कपूरच्या म्हातारपणातील फोटो तिच्या फॅन पेजवरून शेअर करण्यात आला होता. त्यानंतर आता अर्जुननेही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पांढऱ्या शर्टमधील एक ओल्ड एज लुक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये अर्जुन कपूर अतिशय स्मार्ट दिसत आहे. पांढऱ्या शर्टासह दाढी आणि डोक्यावरील केसांचा रंगही पांढरा झाला असला तरीही अर्जुन अगदी हॉट हंक दिसत आहे. तर वरूण धवननेही आपल्या ओल्ड एज लुकमधील दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्यांदा हे फोटो पाहताना बऱ्याच जणांना अनिल कपूरचा भास होत आहे. पण नीट फोटो पाहिल्यावर वरूणचा फिटनेस यात दिसून येत आहे. त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या असूनही त्याचा हा लुक त्याला सुंदर दिसत आहे. यामधील त्याचे अॅब्सदेखील स्पष्ट दिसत आहेत. याशिवाय भारताचा धुरंधर खेळाडू शिखर धवननेही आपला ओल्ड एज लुक फोटो पोस्ट केला आहे. 

दीपिका आणि रणवीरचाही फोटो व्हायरल

Instagram

याआधी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाच्या रिसेप्शनमधील ओल्ड एज लुक फॅन पेजवर शेअर करण्यात आला होता. यामध्ये दोघेही म्हातारपणी तितकेच सुंदर दिसत आहेत. दोघांच्याही चेहऱ्यावर सुरकुत्या असल्या तरीही दोघेही तितकेच एलिगंट दिसत आहेत. हा फोटोदेखील व्हायरल झाला असून त्यांच्या चाहत्यांना त्यांचा हा लुकदेखील आवडत आहे. 

सोनम कपूरच्या फोटोनंतर आलाय हा ट्रेंड

सोनम कपूरच्या फॅन पेजने तिचा हा लुक पोस्ट केल्यानंतर हा ट्रेंड सुरु झाला आहे. ती या फोटोमध्ये साधारण 70 ते 80 वर्षांची दाखवण्यात आली आहे. त्यानंतरच हा लुक अधिक व्हायरल झाला आणि इतर सेलिब्रिटीजनादेखील या लुकमध्ये स्वत:चे फोटो पोस्ट करण्याचं वेड लागलं आहे. दरम्यान सध्या अर्जुन आपल्या पानिपत या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. तर वरूण धवनही नुकतानाच स्ट्रीट डान्सर या चित्रपटाचं चित्रीकरण संपवून भारतात आला आहे. तर रणवीर आणि दीपिका सध्या 1983 च्या वर्ल्डकपवर आधारित चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये लंडनमध्ये व्यस्त आहेत. तर सोनम सध्या आपल्या विविध प्रोजेक्टवर काम करत असून आपला पती आनंदलाही त्याच्या व्यवसायात मदत करत आहे. सोनम बॉलीवूडमधील फॅशनिस्टा असून अजूनही तिच्यासारखा फॅशन सेन्स बॉलीवूडमध्ये कोणालाही नाही असं म्हटलं जातं.