शुभमंगल सावधान! वरूण धवन-नताशाचं मे महिन्यात होणार धुमधडाक्यात लग्न

शुभमंगल सावधान! वरूण धवन-नताशाचं मे महिन्यात होणार धुमधडाक्यात लग्न

बॉलिवूडमधील स्टार वरूण धवनच्या चाहत्यांना सुखद धक्का देणारी बातमी आहे. वरूण धवन लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे. वरूण धवन आणि नताशा दलाल गेल्या बऱ्याच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. बॉलिवूडच्या प्रत्येक इव्हेंटमध्येही हल्ली दोघंही एकत्र दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी वरूणनं गर्लफ्रेंड नताशासोबत लग्न करण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे. तसंच या दोघांच्या लग्नाच्या जोरदार चर्चाही बी-टाऊनमध्ये सुरू आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा मे महिन्यात वरूण आणि नताशाचा विवाह सोहळा थाटामाटात उरकला जाणार आहे. तशी योजना दोघांकडूनही आखली जात आहे. मेहंदी, संगीत आणि रिसेप्शन असे विविध कार्यक्रम आठवडाभर चालणार आहेत. वरूण-नताशाचं लग्न गोव्यातील एखाद्या बीच रिसॉर्ट किंवा आलिशान हॉटेलमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बॉलिवूडमधील कित्येक मोठमोठे स्टार या शाही विवाहसोहळ्यात सहभागी होणार आहेत. 

(वाचा : सिद्धार्थ मल्होत्राच्या वाढदिवशी 'शेरशाह'चा फर्स्ट लुक रिलीज)

24 एप्रिलला होणार लग्नाच्या तारखेची घोषणा?

वरूण आणि नताशाच्या कुटुंबीयांनी लग्नाच्या तारखेबाबत बरीच गुप्तता पाळली आहे. दुसरीकडे 1 मे रोजी वरूण धवनचा 'कुली नंबर 1' सिनेमा देखील रिलीज होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 24 एप्रिलला वरूणचा वाढदिवस आहे आणि कदाचित याच दिवशी कुटुंबीय त्याच्या लग्नाच्या तारखेची घोषणा करतील. वरूण आणि नताशाचं लग्न हे हाय प्रोफाईल इव्हेंट असल्यांचही म्हटलं जात आहे. या दोघांचं डेस्टिनेशन वेडिंग होणार असून या सोहळ्यात अगदी जवळच्या नातेवाईकांना आमंत्रण दिलं जाणार आहे. पण रिसेप्शनमध्ये संपूर्ण बॉलिवूडला निमंत्रण देण्यात येईल असंही म्हटलं जात आहे. दोन्ही घरांमध्ये लग्नाची तयारी सुरू झाली आहे. यापूर्वी देखील याबाबत डेव्हिड धवन यांना विचारलं असता वरूणचं लग्न दणक्यात होईल, असं त्यांनी सांगितलं होतं. 

(वाचा : मुंबईची माफिया क्वीन 'गंगूबाई काठियावाडी', आलिया भटचा फर्स्ट लुक रिलीज)

वडिलांनी वरूणच्या लग्नाबद्दलच्या बातमीवर केलं शिक्कामोर्तब

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक डेव्हीड धवन यांनी मुलगा वरूणच्या लग्नाबाबतच्या बातमीवर काही दिवसांपूर्वीच शिक्कामोर्तब केलं होतं. एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत डेव्हीड धवन म्हणाले होते की, 2020 मध्ये वरूण आणि नताशाचं लग्न होईल. मी त्यांच्या या निर्णयाने खूश आहे. एका पित्याला आणखी काय हवे असतं', अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

(वाचा : ‘हिरकणी’नंतर प्रसाद ओक करणार विश्वास पाटलांच्या ‘चंद्रमुखी’चं दिग्दर्शन)

View this post on Instagram

follow me here @realdaviddhawan

A post shared by David Dhawan (@realdaviddhawan) on

वरूण आणि नताशाची लव्ह स्टोरी

वरुण धवन आणि नताशा दलाल लहानपणापासूनच मित्र आहेत. दोघांमधील मैत्रीचं रुपांतर प्रेमाच्या नात्यात झालं. या दोघांनीही  आपलं नातं लपवण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. वरुण बऱ्याच सेलिब्रिटी इव्हेंट्सना नताशासोबत दिसतो. वरूणच्या करिअरबाबत सांगायचं झालं तर तो 'स्ट्रीट डान्सर 3D'आणि 'कुली नंबर 1' या आगामी सिनेमांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. 

हे देखील वाचा :

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.