बर्थ डे बॉय वरूणला चाहत्यांनी दिल्या सोशल मीडियावर शुभेच्छा

बर्थ डे बॉय वरूणला चाहत्यांनी दिल्या सोशल मीडियावर शुभेच्छा

अभिनेता वरूण धवनने बॉलीवूडमध्ये स्वतःची एक हटके ओळख निर्माण केली आहे. दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा असूनही मेहनत करून त्याने स्वतःची ही एक वेगळी ओळख निर्माण केली. वरूण धवनचा आज वाढदिवस आहे. वरूण आज बत्तीस वर्षांचा झाला आहे. 2012 साली 'स्टुडंट ऑफ दी इअर' या चित्रपटातून वरूणने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. वडील दिग्दर्शक असूनही वरूणने धर्मा प्रॉडक्शनमधून त्याच्या  अभिनय कारकिर्दीला सुरूवात केली होती. बत्तीस वर्षांच्या वरूणचा आतापर्यंतचा करिअरचा प्रवास अतिशय उत्साहवर्धक आहे. तो सतत वेगवेगळ्या भूमिका साकारण्याचा प्रयत्न करतो. शिवाय वरूण गोंविदाचा फॅन असल्यामुळे त्याच्या अभिनयात गोंविदाची छलक पाहायला मिळते. वरूणने बिझनेस मॅनेजमेंट केलेलं आहे.अभिनयासोबत तो कुटुंबवत्सल असल्याचं देखील नेहमीच दिसून येतं. वरूनचा चाहता वर्ग फार मोठा असल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून वरूणवर आज शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.  


अभिनेता अर्जुन कपूरने दिल्या शुभेच्छा...

मनिष मल्होत्राने दिल्या शुभेच्छा...

कोरिओग्राफर राहुल शेट्टीने दिल्या शुभेच्छा...
वरूणचा अभिनय प्रवास


वरूणने 'स्टुडंट ऑफ दी इअर' या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. त्याआधी त्याने शाहरूखच्या माय नेम इज खान या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शकाचे काम केलं होतं. में तेरा हिरो, हम्टी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, एबीसीडी 2, दिलवाले, डिश्यूम, बद्रिनाथ की दुल्हनिया, जुडवा 2 अशा अनेक चित्रपटातून वरूणने काम केलं आहे. नुकताच 'कलंक' चित्रपटातील त्याच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. चित्रपटाला विशेष यश मिळालं नसलं तरी वरूणने साकारलेला झफरचं नक्कीच सर्वांच्या लक्षात राहणार आहे. सध्या वरूण 'स्ट्रीट डान्सर'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. लवकरच तो सारा अली खानसोबत 'कुली नं 1' च्या सिक्वलमध्ये दिसणार आहे. त्यामुळे या आगामी चित्रपटांंमधील वरूणच्या भूमिकांसाठी चाहते फारच उत्सुक आहेत. 


कुली नं. 1' च्या रिमेकमध्ये वरूण आणि सारा


वरूण धवनचा ‘स्ट्रीट डान्सर’ मधला फर्स्ट लुक रिलीज
 

 

 


View this post on Instagram


 

 

Kicking in the bday. Thank u for all the wishes🤙🏼


A post shared by Varun Dhawan (@varundvn) on
वरूण लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत


वरुण धवन आणि नताशा दलाल लवकरच विवाहबद्ध होणार अशी चर्चा आहे. वरुण लवकरच त्याची बालमैत्रीण नताशा हिच्याशी लग्न करतोय. वरुण आणि नताशा नोव्हेंबरमध्ये लग्न करणार असल्याची चर्चा सुरू आहे. नताशा वरुणची बालपणीची मैत्रीण आहे त्या दोघांचं अगदी लहानपणापासून एकमेकांवर प्रेम आहे. हे सेलिब्रेटी बिग फॅट वेडींग कुठे होणार इथपासून या लग्नात कोण-कोण पाहुणे असणार अशा अनेक प्रश्नांना उधाण आलं आहे. या लग्नात फक्त कुंटूंबिय आणि जवळच्या मित्रमंडळींना आमंत्रण असण्याची चर्चा आहे. कॉफी विथ करनमध्येदेखील वरुणने तो लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं उघड केलं होतं. आता खुद्द वरुणनेच त्याच्या लग्नाच्या बातमीचा खुलासा केल्याने आता बॉलीवूडमधील या बिग फॅट वेडींगविषयी अधिकच उत्सुकता वाढली आहे.


 


फोटोसौैजन्य - इन्स्टाग्राम