वरूण धवनचा ‘स्ट्रीट डान्सर’ मधला फर्स्ट लुक रिलीज

वरूण धवनचा ‘स्ट्रीट डान्सर’ मधला फर्स्ट लुक रिलीज

रेमो डिसूझाच्या एबीसीडीच्या सिक्वलचा म्हणजेच 'स्ट्रीट डान्सर'चा फर्स्ट लुक समोर आला आहे. रेमोच्या 'एबीसीडी' या चित्रपटाचा हा तिसरा भाग आहे. यापूर्वी 'एबीसीडी' आणि 'एबीसीडी 2'  या चित्रपटांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. रेमोचे हे तिन्ही चित्रपट डान्स बेस्ड चित्रपट आहेत. एबीसीडी आणि एबीसीडी 2 या दोन्ही चित्रपटांमध्ये वरूण धवन आणि श्रद्धा कपूर ही जोडी झळकली होती. रेमोने दिग्दर्शित केलेला एबीसीडी हा पहिलाच थ्रीडी चित्रपट होता. आता स्ट्रिट डान्सर मध्येही आता वरूण आणि श्रद्धा ही लोकप्रिय जोडी एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाला #rulebreakers असं हॅशटॅग देण्यात आलं आहे. यावरून वरूण आणि श्रद्धा या चित्रपटात डान्स फ्लोअरवर रुल ब्रेक करताना दिसणार असण्याची शक्यता आहे. चित्रपटाच्या शिर्षकावरुन हा चित्रपट स्ट्रीट डान्सरच्या जीवनावर आधारित असणार असं वाटत आहे.  वरूणने त्याच्या इन्स्टा अंकाऊंट वरुन या चित्रपटाचा फर्स्ट लुक शेअर केला आहे. स्ट्रिट डान्सर या वर्षी 8 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. 

 

 


View this post on Instagram


 

 

#STREETDANCER3D why walk on the streets when you can dance on them. We dance to express not to impress #vdin3d


A post shared by Varun Dhawan (@varundvn) on
स्ट्रीट डान्सर्स करणार डान्स फ्लोअरवर मस्ती
स्ट्रीट डान्सरमध्ये वरूण एका पंजाबी तरुणाची भूमिका निभावणार आहे तर श्रद्धा कपूर पाकिस्तानी डान्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. शिवाय प्रभू देवा आणि नोरा फतेही यांच्यादेखी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. सध्या चित्रपटाची टीम अमृतसर मध्ये चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटातील एका गाण्याच्या शूटिंग दरम्यान वरूणच्या गुडघ्याला दुखापत झाल्याची चर्चा होती. अमृतसरमधील शूटिंग संपल्यावर चित्रपटाची टीम लंडनमध्ये पुढील शूटिंगसाठी रवाना होणार आहे. या चित्रपटात एबीसीडीमधील 'बेगुनाह' हे लोकप्रिय गाणं पुन्हा रिक्रिएट केलं जाणार असल्याची देखील चर्चा आहे. यापूर्वीच्या या दोन्ही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळालं असल्याने आता 'स्ट्रीट डान्सर' बाबतदेखील प्रेक्षकांच्या मनात प्रंचड उस्तुकता निर्माण झाली आहे.

वरूण धवन लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत


स्ट्रीट डान्सरचं शूटिंग संपल्यावर वरूणच्या जीवनात एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट घडणार आहे. कारण या वर्षी  वरूण धवन आणि नताशा दलाल विवाहबद्ध होणार आहेत. वरूण त्याची बालमैत्रीण नताशा दलाल हिच्याशी लग्न करतोय. वरूण आणि नताशा नोव्हेंबरमध्ये लग्न करणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. नताशा सध्या लग्नसोहळ्याच्या शॉपिंगमध्ये व्यस्त आहे. लग्नासंबधित छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ती बारकाईने लक्ष देत आहे. नताशा एक फॅशन डिझायनर असल्याने ती स्वतःच तिच्या लग्नाचे ड्रेस डिझाईन करणार आहे. शिवाय वरूणचा लुक कसा कसेल याबाबतही तीने खास विचार केला आहे. नताशा वरूणची बालपणीची मैत्रीण आहे आणि त्या दोघांचं अगदी लहानपणापासून एकमेकांवर अगदी खरं प्रेम आहे. आता लग्नाच्या प्रेमळ बंधनातून दोघं कायमस्वरुपी एकत्र येणार आहेत. हे सेलिब्रेटी वेडींग कुठे होणार इथपासून या लग्नात कोण-कोण पाहुणे असणार अशा अनेक गोष्टींबाबत त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. मात्र सध्या तरी वरूण स्ट्रीट डान्सरच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने या गोष्टींचा खुलासा तो लवकरच करेल.


varun dhawan and natasha


अधिक वाचा


सामान्य माणसाला पॉवर देणार ‘डोंबिवली रिटर्न्स’


 


फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम