यावर्षी बॉलीवूडमध्ये रंगणार 'या' बिग फॅट वेडींगची चर्चा

यावर्षी बॉलीवूडमध्ये रंगणार 'या' बिग फॅट वेडींगची चर्चा

2018 मधली लग्नसराईची धूम यावर्षीही कायम असणार आहे. मागच्या वर्षी सोनम कपूर, दीपवीर, प्रियंका-निक लग्नबंधनात अडकले होते. यावर्षी अभिनेता प्रतिक बब्बरच्या लग्नसोहळ्याने या लग्नसराईला पुन्हा सुरूवात झालीय. आता बॉलीवूडमधील आणखी एक अभिनेता  लवकरच लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल लवकरच विवाहबद्ध होणार अशी चर्चा आहे. वरुण लवकरच त्याची बालमैत्रीण नताशा हिच्याशी लग्न करतोय. वरुण आणि नताशा नोव्हेंबरमध्ये लग्न करणार असल्याची चर्चा सुरू आहे. नताशा सध्या लग्नसोहळ्याच्या शॉपिंगमध्ये व्यस्त आहे. लग्नासंबधित छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ती बारकाईने लक्ष देत आहे. नताशा एक फॅशन डिझायनर असल्याने ती स्वतःच तिच्या लग्नाचे ड्रेस डिझाईन करणार आहे. शिवाय वरुणचा लुक कसा कसेल याबाबत तीने काहीतरी खास विचार केला आहे. नताशा वरुणची बालपणीची मैत्रीण आहे त्या दोघांचं अगदी लहानपणापासून एकमेकांवर प्रेम आहे. लग्नाच्या पवित्र बंधनामुळे आता दोघं कायमस्वरुपी एकत्र येणार आहेत. हे सेलिब्रेटी बिग फॅट वेडींग कुठे होणार इथपासून या लग्नात कोण-कोण पाहुणे असणार अशा अनेक प्रश्नांना उधाण आलं आहे. या लग्नात फक्त कुंटूंबिय आणि जवळच्या मित्रमंडळींना आमंत्रण असण्याची चर्चा आहे. कॉफी विथ करनमध्येदेखील वरुणने तो लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं उघड केलं होतं. आता खुद्द वरुणनेच त्याच्या लग्नाच्या बातमीचा खुलासा केल्याने आता बॉलीवूडमधील या बिग फॅट वेडींगविषयी अधिकच उत्सुकता वाढली आहे. वरुणचे वडील आणि प्रसिद्ध दिग्दर्शक डेविड धवन आणि आई लाली धवनदेखील सध्या विवाहाच्या तयारीमध्ये व्यस्त आहेत.


varun dhawan and natasha


एबीसीडी 3 मध्ये पुन्हा वरुण आणि श्रद्धाची जादू


वरुण लवकरच रेमो डिझूजाच्या एका नव्या चित्रपटातदेखील दिसणार आहे. कोरिओग्राफर रेमो डिझूजा च्या एबीसीडी आणि एबीसीडी 2 या दोन्ही चित्रपटांमध्ये वरुण धवन आणि श्रद्धा कपूर ही जोडी झळकली होती. खरंतर रेमोने दिग्दर्शित केलेला एबीसीडी हा पहिलाच थ्रीडी चित्रपट होता. आता एबीसीडी 3 मध्येही आता वरुण आणि श्रद्धा एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात वरुण एका पंजाबी तरुणाची भूमिका निभावणार आहे तर श्रद्धा कपूर पाकिस्तानी डान्सरच्या भूमिकेत असणार आहे. सध्या वरुण अमृतसर मध्ये एबीसीडी 3 चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यस्त आहे. हा नृत्य चित्रपट असल्याने वरुण आणि श्रद्धा नृत्याचे धडे गिरवत आहेत. एबीसीडी आणि एबीसीडी 2 या दोन्ही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळाले असल्याने आता एबीसीडी 3 बाबतदेखील प्रेक्षकांना प्रंचड उस्तुकता निर्माण झाली आहे. वरुण धवन चित्रपटसृष्टीत त्याच्या लुकमुळे बोना फाईड सूपरस्टार म्हणून प्रसिद्ध आहे. आता वरुण लवकरच विवाबबंधनात अडकणार असल्याने त्याच्या चाहत्यांमध्येे आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.

अधिक वाचा


अमित ठाकरे - मिताली बोरूडेच्या ग्रँड रिसेप्शनला सेलिब्रिटीजची मांदियाळी


दीपिका पदुकोण की प्रियांका चोप्रा, जाणून घ्या कोण ठरली बाॅलीवूडची सर्वात सुंदर नववधू


फोटोसौजन्य- इन्स्टाग्राम