वरूणची गर्लफ्रेंड नताशाला चाहत्याची विचित्र धमकी

वरूणची गर्लफ्रेंड नताशाला चाहत्याची विचित्र धमकी

वरूण धवनचे अनेक चाहते आहेत. स्टुंडंट ऑफ द ईअर चित्रपटाने आपल्या करिअरला सुरुवात करणाऱ्या वरूणने अगदी कमी कालावधीमध्ये आपला असा चाहतावर्ग निर्माण केला आहे. गेल्या सहा वर्षात वरूणने विविध चित्रपटांमध्ये काम करून विविध भूमिका साकारल्या आणि चाहत्यांचं मनही जिंकून घेतलं. पण बऱ्याचदा सेलिब्रिटी असण्याची किंमत त्यांच्या आजूबाजूच्या व्यक्तींनाही चुकवावी लागते हे दिसून आलं आहे. वरूण सध्या ‘कलंक’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. इतकंच नाही तर वरूण यावर्षी आपली गर्लफ्रेंड नताशाबरोबर लग्नबंधनात अडकणार अशीही चर्चा आहे. पण वरूणच्या एका चाहत्याने गर्लफ्रेंड नताशाला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.


महिला चाहती वरूणवर नाराज


varun


वरूणची एक चाहती त्याला भेटण्यासाठी त्याच्या घराबाहेर वाट पाहात होती. पण वरूण व्यस्त असल्यामुळे घराबाहेर येऊ शकला नाही. त्यामुळे वरूणची ही चाहती खूपच रागावली. तिने त्याच्या घराबाहेरच अव्यवहारी वागण्याला सुरुवात केली आणि ‘मी नताशाला मारून टाकेन’ अशी धमकीही दिली. मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा या चाहतीला नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षारक्षक आले तेव्हा त्यांनादेखील ती बोलली. त्यावेळी तिला सांभाळणं कठीण होतं. त्यामुळे याबाबत स्थानिक पोलीस स्टेशनला सूचना देण्यात येईपर्यंत प्रकरण गेलं.


पोलीस हे प्रकरण बघत आहेत - वरूण


या प्रकरणासंदर्भात वरूण धवनला विचारलं असता, ‘मी याबाबत काहीही बोलू इच्छित नाही. पोलीस या प्रकरणामध्ये लक्ष देत आहेत. मला याबाबत काहीही बोलण्याची इच्छा नसून मी यापासून दूरच राहीन. फक्त एकच गोष्ट सांगू शकतो की, ही गोष्ट चुकीची आहे. मी सेलिब्रिटी आहे तर त्याची किंमत माझ्या प्रियजनांना चुकवावी लागू नये असं मला वाटतं.’ हे स्पष्ट केलं आहे. शिवाय वरूण असंही म्हणाला ‘जेव्हा माझे चाहते मला भेटतात तेव्हा मी कधीही त्यांना नकार देत नाही. मी वेळ काढून त्यांना भेटतो. मीदेखील माझ्या चाहत्यांवर तितकंच प्रेम करतो, जितकं ते माझ्यावर करतात. पण म्हणून कोणती वाईट घटना घडावी अथवा वाईट तऱ्हेने वागावं हे चुकीचं आहे.’


वरूण सध्या व्यग्र


varun 1


वरूण सध्या ‘कलंक’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. हा चित्रपट 17 एप्रिलला प्रदर्शित होत असून यामध्ये त्याच्याबरोबर संजय दत्त, माधुरी दीक्षित, आलिया भट, सोनाक्षी सिन्हा आणि आदित्य रॉय कपूर अशी तगडी स्टारकास्ट आहे. शिवाय रेमो डिसुझाच्या ‘स्ट्रीट डान्सर’ या चित्रपटाचं चित्रीकरणही वरूण करत आहे. वरूणकडे सध्या बरेच चित्रपट असून त्याच्या चाहत्यांसाठी त्याला पाहणं ही नेहमीच पर्वणी असते. शिवाय यावर्षी नताशा आणि वरूण विवाहबद्ध होणार अशीही चर्चा आहे. त्यामुळे यावर्षाच्या शेवटी वरूणदेखील विवाहबद्ध होईल असं त्याच्या चाहत्यांना वाटत आहे. नताशा आणि वरूण सध्या बऱ्याच ठिकाणी एकत्र दिसत असून हे दोघेही बरेच वर्ष एकमेकांबरोबर आहेत. शिवाय वरूणच्या आई वडिलांचीही या लग्नाला परवानगी असल्याचं त्याच्या बऱ्याच फोटोवरून कळत आहे. नुकतंच नताशाला माझ्या आई - वडिलांनी दत्तक घेतलं आहे असा फोटो वरूणने शेअर करून त्यांच्यातील बाँडिंग दाखवून दिलं आहे.


फोटो सौजन्य - Instagram 


हेदेखील वाचा - 


‘कलंक’ ट्रेलर प्रदर्शित, गुंतागुंतीच्या नात्याची कहाणी


वरूण धवनचा ‘स्ट्रीट डान्सर’ मधला फर्स्ट लुक रिलीज


पुन्हा एकदा ‘अंदाज अपना अपना’