‘नटसम्राट’ श्रीराम लागू काळाच्या पडद्याआड, सिनेसृष्टीवर पसरली शोककळा

‘नटसम्राट’ श्रीराम लागू काळाच्या पडद्याआड, सिनेसृष्टीवर पसरली शोककळा

ज्येष्ठ अभिनेता डॉ. श्रीराम लागू यांचे पुण्यामध्ये प्रदीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांंपासून श्रीराम लागू यांची तब्बेत बरी नव्हती. वयाच्या 92 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले असून सिनेसृष्टीतील खरा नटसम्राट हरवल्याची प्रतिक्रिया उमटली आहे. बुधवारी रात्री आठच्या सुमारास त्यांचे निधन झाले. दरम्यान गुरूवारी सकाळी बालगंधर्व रंगमंदिरात अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात येणार असून त्यानंतर अंंतिम संस्कार करण्यात येतील. केवळ मराठीतच नाही तर हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची छाप डॉ. श्रीराम लागू यांनी सोडली होती. केवळ उत्तम अभिनेता म्हणून नाही तर एक उत्तम दिग्दर्शक, विचारवंत आणि समाजसेवक म्हणूनही त्यांनी आपली ओळख निर्माण केली आणि ती अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जपली. ‘नटसम्राट’ या नाटकातील अप्पासाहेब बेलवकरांची भूमिका अजरामर करण्यात डॉ. श्रीराम लागूंचा हात होता आणि आजतागायत त्यांचा नटसम्राट हा अप्रतिमच आणि अजरामर राहिलेला आहे. 

पहिला आणि अजरामर नटसम्राट

डॉक्टर श्रीराम लागू यांनी खरं तर ईएनटी अर्थात नाक, कान आणि घसा यामध्ये मेडिकल पदवी मिळवली. पण कॉलेजपासूनच त्यांनी आपल्या अभिनयाच्या कारकीर्दीला सुरूवात केली. त्यांनी सुरुवातील सहा वर्ष पुण्यात डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस केली. पण त्यांच्यातील नटाने त्यांना स्वस्थ बसू दिले नाही आणि त्यानंतर त्यांनी मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं ते मागे न वळून बघण्यासाठीच. कॅनडा आणि इंग्लंडला जाऊन त्यांनी डॉक्टरकीचं पुढील शिक्षणही घेतलं होतं. असं असतानाही त्या काळात असं पाऊल उचलणं हे त्यांच्यासाठी आव्हानात्मकच होतं. पण आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनाचा नटसम्राट घडवणारा हा अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. इतकंच नाही तर नाट्य आणि चित्रपटक्षेत्रात काम करत असताना श्रीराम लागू यांनी पुरोगामी विचारांची नाट्यसंघटना सुरू केली आणि आपल्या विचारांना त्यांनी त्यातून पुढे आणलं. श्रीराम लागू हे नास्तिक होते आणि त्यांनी आपले विचार प्रखरपणे नेहमीच मांडले. 

अर्जुन कपूरनंच गर्लफ्रेंड मलायका अरोराला केलं ट्रोल, म्हणाला...

विविध पुरस्कारांनी सन्मानित

डॉक्टर श्रीराम लागू यांनी 100 पेक्षा अधिक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच 40 पेक्षा अधिक मराठी, हिंदी आणि गुजराती नाटकांमध्ये त्यांनी अभिनय केला. तसंच त्यांनी वीसपेक्षा अधिक नाटकांचं दिग्दर्शन केलं. पण त्यांचं सर्वात जास्त आणि प्रेक्षकांच्या लक्षात राहिलेलं नाटक म्हणजे नटसम्राट. ही भूमिका अक्षरशः श्रीराम लागू जगले असंं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वैयक्तिक आयुष्यात बोलायचं झाल्यास, त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी दीपा लागू असून त्यादेखील कलाकार आहेत. तसंच त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. लागू यांना आतापर्यंत फिल्मफेअर, कालिदास सन्मान, दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, पुण्यभूषण पुरस्कार, संगीत नाटक अकादमी अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. 

या कारणासाठी किआरा अडवाणीला व्हाचययं आहे प्रेग्नंट

श्रीराम लागू यांच्या निधनाने रंगभूमी पोरकी

श्रीराम लागू यांची नाटकं सर्वात जास्त गाजली. रंगभूमी आज पोरकी झाल्याच्या प्रतिक्रिया सध्या उमटल्या आहेत. सखाराम बाईंडर आणि घाशीराम कोतवाल सारख्या नाटकांना त्या काळी विरोध होत असताना श्रीराम लागू ठामपणाने उभे राहिले आणि त्यांनी ही नाटकंही गाजवून दाखवली. आपली मतं ठामपणे मांडून आपले विचार व्यक्त करणारा असा हा स्पष्टवक्ता अभिनेता होता. गेले कित्येक वर्ष डॉक्टर श्रीराम लागू यांंची तब्बेत जरा नाजूकच होती. पण वयाच्या 92 व्या वर्षी त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचं निधन झालं. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रॉडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रॉडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रॉडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूटही देत आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.