'अरे ओ सांबा कितने आदमी थे…. सरकार दो...' या डायलॉगने शोले चित्रपटात भाव खाल्ला होता. हा डायलॉग होता ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचा. आजही शोले चित्रपट म्हटले की, विजू खोटे यांचे नाव घेतले जाते.कालिया या त्यांच्या भूमिकेतून प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे सोमवारी सकाळी राहत्या घरी निधन झाले आहे. ते 78 वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
विजू खोटे यांची तब्येत गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. तब्येतीच्या कुरबुरीमुळेच त्यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. मुंंबईतील गावदेवी परीसरातील त्यांच्या घरात अखेरचा श्वास घेतला. सकाळी 11 दरम्यान त्यांच्या पार्थिवावर अत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
विजू खोटे यांनी जवळ जवळ 250 हून अधिक चित्रपटांमध्ये कामं केली आहेत. त्यांनी चित्रपटांमध्ये जरी लहान लहान भूमिका केल्या असल्या तरी त्यांची प्रत्येक भूमिका ही लक्षात राहण्याजोगी होती. ‘शोले’ या चित्रपटाला आता चार दशक होऊन गेली. पण त्यांचा डायलॉग आजही लोकांच्या लक्षात आहे. त्यांनी अनेक चित्रपटात विलनच्या भूमिका केल्या आहेत. ‘अंदाज अपना अपना’ हा देखील 90 च्या दशकातला गाजलेला चित्रपट या चित्रपटात त्यांनी साकारलेला रॉबर्टही फार गाजला. मराठी चित्रपटांचे नाव घ्यायचे झाले तर ‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटातील त्यांची भूमिका अगदी लहान असेल पण तरी ही भूमिका अनेकांच्या लक्षात राहिली. अनेक मोठ्या चित्रपटांचा ते भाग होते.
विजू खोटे यांनी विलनच्या भूमिका साकारतानाही त्यातून घडणारा विनोद हा अनेकांच्या लक्षात असेल. त्यांच्या विनोदाचे टायमिंग हेच त्यांच्या अभिनयाचे गमक होते. म्हणूनच त्यांच्या सगळ्या भूमिका आजही अनेकांच्या लक्षात आहे.
विजू खोटे यांची बहीण शोभा खोटे या देखील याच क्षेत्रात आहेत. त्यांनी बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली. बहीण- भावाची ही जोडी चांगलीच प्रसिद्ध होती. शोभा खोटे हे विजू खोटेच्या मोठ्या बहीण.
आज विजू खोटे यांच्या जाण्याने सगळ्या इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.