विकी कौशल आणि कतरिना करणार लव्ह ड्रामा

विकी कौशल आणि कतरिना करणार लव्ह ड्रामा

सध्या बॉलीवूडमध्ये विकी कौशल आणि कतरिना कैफ जवळ येत असल्याच्या बऱ्याच चर्चा आहेत. या चर्चा कितपत खऱ्या आहेत हे माहीत नाही पण आता लेटेस्ट आलेल्या माहितीनुसार, विकी कौशल आणि कतरिना कैफ लवकरच एका लव्ह ड्रामामध्ये दिसणार आहेत. विकी आणि कतरिना नक्कीच बी-टाऊच्या हॉट जोडीपैकी एक आहेत यात काहीच शंका नाही. पण पडद्यावर ही जोडी आता नक्की कशी दिसेल आणि प्रेक्षकांच्या कशी पसंतीला उतरेल हे पाहणं नक्कीच औत्सुक्याचं आहे.


विकी आणि कतरिना करणार रोमान्स


vicky 1


सध्या चर्चेत असलेल्या माहितीनुसार, विकी आणि कतरिना ज्या चित्रपटात एकत्र काम करणार आहेत, त्या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला करणार आहे. रॉनीने याआधी बरेच हिट चित्रपटांची निर्मिती केली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ‘उरी - द सर्जिकल स्ट्राईक’नंतर पुन्हा एकदा विकी कौशल, दिग्दर्शक आदित्य धर आणि निर्माता रॉनी हे तिघं एकत्र येणर आहेत. पण वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटामध्ये विकी आणि कतरिना एकत्र दिसणार आहेत. इतकंच नाही तर या चित्रपटात हे दोघं रोमान्स करताना दिसणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण हे संपूर्ण देशभरात करण्यात येणार आहे आणि हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित करण्यात येईल.


रॉनी स्क्रूवाला बनवत आहे लव्ह ड्रामा


Bollywood celebs at deepveer reception - katrina kaif %281%29


विकी आणि कतरिनासाठी एक इंटेन्स लव्ह स्टोरी बनवण्यात येत असल्याची चर्चा आहे. ही कथा वास्तविक जीवनावर आधारित असून केदारनाथ या चित्रपटाप्रमाणेच लव्ह ड्रामा असेल असं सांगण्यात येत आहे. कतरिना आणि विकीमध्ये कमालीची केमिस्ट्री आहे. काही दिवसांपूर्वीच विकी आणि कॅट एका टेलिव्हिजन शो मध्ये आले होते. तेव्हा या दोघांमध्ये चांगलीच केमिस्ट्री दिसली होती. दरम्यान या दोघांमध्ये मैत्रीपेक्षा अधिक काहीतरी नातं निर्माण होत असल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे ऑनस्क्रिन या दोघांची केमिस्ट्री कशी दिसेल याची सर्वांना उत्सुकता आहे. सध्या या चित्रपटाबद्दल काही बोलणं हे जास्त योग्य नाही. कारण अजूनपर्यंत या चित्रपटाची कोणतीही स्टारकास्ट अथवा डेट्स याबद्दल माहिती मिळालेली नाही.


विकी आणि कतरिना वाढती जवळीक


katrina


काही दिवसांपूर्वी विकी कौशल आणि हरलीन सेठीचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा होत्या. पण आता विकी आणि कतरिनाची जवळीक वाढत आहे अशा चर्चा आहेत. ‘कॉफी विथ करण’मध्ये कतरिनाने आपल्याला विकीबरोबर काम करायला आवडेल असं म्हटलं होतं. कारण ते दोघं एकत्र चांगले दिसतील असं तिने म्हटलं होतं. त्यानंतर विकीदेखील या शो मध्ये आला होता तेव्हा कतरिनाची इच्छा त्याने विकीला सांगितली तेव्हा विकीने अक्षरशः बेशुद्ध झाल्याचा अभिनय केला होता. त्यानंतर एका पुरस्कार सोहळ्यातही हे दोघं एकत्र दिसले होते. त्याचवेळी विकीने कतरिनाला ‘माझ्याशी लग्न करणार का?’ असा प्रश्नही विचारला होता आणि कतरिना त्यावेळी खूपच लाजली होती. कतरिनाचा ‘भारत’ हा सलमानबरोबर चित्रपट पुढच्याच महिन्यात प्रदर्शित होत आहे. तर सध्या ती अक्षयकुमारबरोबर पुन्हा एकदा रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’मध्ये दिसणार आहे. दरम्यान पी. टी. उषावरील बायोपिकमध्येही कतरिना काम करणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर विकीदेखी सध्या उधम सिंह आणि एका हॉरर चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.


फोटो सौजन्य - Instagram


हेदेखील वाचा - 


विकी कौशलला झाली हॉरर फिल्मच्या चित्रीकरणादरम्यान गंभीर दुखापत


विकी कौशल करणार कतरिनाच्या बहिणीसोबत रोमान्स


सुर्यवंशीमध्ये कतरिना कैफची वर्णी