अभिनेता विकी कौशल सिंगल नाही, या अभिनेत्रीला करत आहे डेट

अभिनेता विकी कौशल सिंगल नाही, या अभिनेत्रीला करत आहे डेट

हो...अभिनेता विकी कौशल सिंगल नाही. आम्हाला माहित्येय त्याच्या गर्ल फॅन्ससाठी ही खूपच दुःखद बातमी आहे. पण एवढा छान आणि हँडसम अभिनेता म्हंटल्यावर किती दिवस सिंगल राहणार नाही का?


46561896 527171471082191 1160792956407519233 n
मसान, राजी, संजू आणि मनमर्जिया यासारख्या एकसेएक चित्रपटातून आपल्या अभिनयाची चमक दाखवणाऱ्या विकी कौशलने अखेर मान्य केलंच की, तो सिंगल नसून नवीन आणि सीरियस रिलेशनशिपमध्ये आहे. नुकत्याच एका प्रसिद्ध शोमध्ये त्याने मुलीचं नाव न घेता याची कबुली दिली. पण सूत्रांनुसार, विकी कौशल मॉडेल हरलीन सेठीला डेट करत आहे. तसं तर विकी नेहमीच आपल्या खाजगी आयुष्याबद्दल भरभरून सांगतो. पण प्रेमाच्याबाबतीत मात्र त्याने अजूनही जास्त काही भाष्य केलेलं नाही.कोण आहे हरलीन सेठी


विकीची कथित गर्लफ्रेंड हरलीन सेठी आत्तापर्यंत अनेक वेबसीरीजमध्ये काम केलं आहे.


vicky-harleen-3


सध्या ती अल्ट बालाजीच्या वेबसीरीज ब्रोकनमध्ये दिसत आहे. हरलीनच्या इन्स्टापेजवर तुम्ही गेलात तर सध्या या शोसंबंधित सर्व व्हिडीओज दिसतील.

हरलीन दिसायला खूपच सुंदर आहे. तिच्या स्टायलिश अंदाजामुळेच विकीने तिला पसंत केलं.


vicky-harleen-sethi
वेबसीरीजशिवाय हरलीनने अनेक जाहिरातींमध्येही काम केलं आहे.


प्रेमाची कबुली


विकीबरोबरच्या अफेयरबाबत हरलीननेही अजून स्वीकार केलेला नाही. पण विकीने तरी सोशल मीडियावर त्याच्या कथित लव्ह स्टोरीबद्दल नक्कीच सांगितलं आहे. विकीची आणि हरलीनची भेट एका कॉमन फ्रेंडमुळे आनंद तिवारीमुळे झाली होती. या आधीसुद्धा एका चॅट शोमध्ये त्याने प्रेमाची कबुली नाही पण थोडी हिंट दिली होती.

तसंच ब्रोकन या हरलीन काम करत असलेल्या वेबसीरीजमधला विक्रांत मस्सीसोबतचा फोटो विकीने इन्स्टावर शेअर करून त्यावर ‘मेरे दो अनमोल रतन’ अशी कमेंट केली होती.


41870616 1894185547557339 8166776447752227999 n
सध्या विकी त्याच्या आगामी ऊरी-द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाबाबत उत्सुक असून या चित्रपटांमध्ये तो कमांडोची भूमिका करत आहे.


फोटो सौजन्य - Instagram