विकीने तीन महिन्यात कमी केलं तब्बल 13 किलो वजन

विकीने तीन महिन्यात कमी केलं तब्बल 13 किलो वजन

गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडचा हार्टथ्रोब विकी कौशल काहीशा वेगळ्या लुकमध्ये दिसत आहे. त्याच्या या नवीन लुकबद्दल POPxoMarathi ने माहिती काढली असता असं कळलं की, विकीने फक्त तीन महिन्यांच्या आत तब्बल 13 किलो वजन कमी केलं आहे. या नवीन लुकमागील कारण आहे, विकीचा आगामी बायोपिक उधम सिंग ज्यामध्ये त्याला 20 वर्ष यंग दिसायचं आहे.

विकीच्या मेहनतीने दिग्दर्शक खूष

सूत्रांनुसार दिग्दर्शक शूजित सरकारच्या आगामी चित्रपट उधम सिंगमध्ये विकी युवा भूमिका निभावण्यासाठी तयारी करत आहे. यासाठी त्याने खूप वजन कमी केलं आहे. या चित्रपटात त्याला 20 वर्षांच्या तरूणाच्या भूमिकेत दिसण्यासाठी तो सध्या वजन कमी करतोय. त्याच्या या कमिटमेंटमुळे चित्रपटाचा दिग्दर्शक शूजित खूप प्रभावित आहे. 

ऑक्टोबरमध्ये होणार सुरूवात

विकीचे जर तुम्ही हार्डकोअर फॅन असाल तर तुम्हाला माहीत असेलच की, विकी किती फूडी आहे. पण तरीही त्याने त्याच्या डाएटवर पूर्ण कंट्रोल ठेवत तीन महिन्यात हा लुक मिळवला आहे. त्याला लुकबाबतीत कोणतीही तडजोड करायची नाही. त्यामुळे तो ट्रेनरच्या सर्व सूचनाचं काटेकोर पालन करत आहे. चित्रपटाचं पुढचं शेड्यूल अमृतसरमधील पंजाबमध्ये ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होतंय.

आधी कमी मग जास्त

एकीकडे विकी उधमसिंगसाठी वजन कमी करण्यासाठी मेहनत घेतो तर आहे. पण हा चित्रपट होताच त्याला पुन्हा वजन वाढवावं लागणार आहे. सूत्रानुसार उधम सिंग हा चित्रपट पूर्ण होताच निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या आगामी तख्तसाठी त्याला परत वजन वाढवावं लागेल. कारण तख्त या चित्रपटात विकी मुघल शासक औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहे. तख्तचं शूटींग हे फेब्रुवारी 2020 मध्ये सुरू होणार आहे.

विकीपाठोपाठ भाऊसुद्धा बॉलीवूड

विकी कौशलने आता बॉलीवूडमध्ये चांगलाच जम बसवला आहे. विकीपाठोपाठ त्याचा छोटा भाऊ सनीसुद्धा बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. लवकरच सनीचा भंगडा पा ले हा चित्रपट येत आहे. या चित्रपटात सनी मुख्य भूमिकेत दिसणार असून त्याच्यासोबत रूख्सार ढिल्लो आणि मराठमोळी श्रिया पिळगांवकर दिसणार आहे. हा चित्रपट पंजाबी डान्स फॉर्म भांगडावर बेतलेला आहे. ज्यातील हिरो हा डान्स स्पर्धेत भाग घेण्यासाठी लंडनला जातो. मग पुढे काय होतं ते या चित्रपटात दिसेल. विकी कौशलच्या अभिनयाने त्याचे फॅन्स प्रभावित आहेत. आता पाहूया सनीचा अभिनय प्रेक्षकांना आवडतो का?

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.