बॉलीवूडमध्ये 'नंबर वन' विकी कौशल

बॉलीवूडमध्ये 'नंबर वन' विकी कौशल

बॉलीवूडमध्ये दरवर्षी नवे चेहरे येतात. काही प्रेक्षकांच्या मनात घर करतात तर काही विस्मृतीत जातात. आधी राजी आणि मग उरी - द सर्जिकल स्ट्राईक या दोन्ही चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करण्यात अभिनेता विकी कौशल यशस्वी झाला. थोड्याच काळात त्याला भरपूर लोकप्रियता आणि यश मिळालं. त्यानंतर बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा तो दिसला ‘भूत - द हाँटेड शिप’ चित्रपटात. नुकत्याच रिलीज झालेल्या या भयपटानंतर बॉलीवूड अभिनेता विकी कौशल पुन्हा एकदा सर्वाधिक लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता बनला आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या व्हायरल न्यूज श्रेणीत बाकी बॉलीवूड अभिनेत्यांना मागे टाकत विकी कौशल लोकप्रियतेच्या शिखरावर चढलेला दिसून आलेला आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे.

View this post on Instagram

Fifty shades of green.

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

या आकडेवारीनुसार, व्हायरल न्यूज सेक्शनमध्ये विकी कौशलने 100 गुणांसह लोकप्रियतेत प्रथम स्थान पटकावले आहे. विकीचा नुकताच रिलीज झालेला चित्रपट ‘भूत’मूळे आणि कतरिना कैफसोबत असलेल्या त्याच्या घनिष्ट मैत्रीमुळे व्हायरल न्यूजमध्ये तो सतत चर्चेत राहिलेला आहे आणि यामुळेच तो नंबर वन स्थानी पोहोचल्याचं दिसतंय.

लवकरच तो उधम सिंग यांच्यावरील बायोपिकमध्ये दिसणार आहे. ज्याचं दिग्दर्शन शूजीत सरकार करत आहे. हा चित्रपट ऑक्टोबर 2020 मध्ये रिलीज होईल. त्यासोबतच विकीकडे करण जोहरच्या मल्टीस्टारर तख्तमध्येही दिसणार आहे. जो डिसेंबर 2021 मध्ये रिलीज होईल.

बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर 46 गुणांसह दुस-या स्थानी आहे. शाहिदचा त्याच्या चित्रपटाच्या सेटवर झालेला अपघात, त्यानंतर त्याने चित्रीकरण पून्हा सुरू करणे आणि त्यानंतर त्याची पत्नी मीरासोबत शाहिदने साजरा केलेला वाढदिवस या सगळ्या कारणांमुळे तो गेले काही दिवस सतत चर्चेत होता आणि म्हणूनच तो बाकी बॉलीवूड स्टार्सना मागे टाकून दूस-या स्थानी पोहोचला आहे.

View this post on Instagram

Aapka #Guddu ❤️ #1yearOfLukaChuppi 🙏🏻

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on

व्हॅलेंटाईन्स डे ला कार्तिक आणि साराचा लव आज कल 2 रिलीज झाला. ज्याची खूप दिवसांपासून प्रतीक्षा होती. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास करू शकला नाही. कार्तिक आर्यनचा चित्रपट ‘लव आज कल 2’ बॉक्स ऑफिसवर जरी चांगली चालली नसला तरीही त्याच्या लोकप्रियतेत घट झालेली नाही. आजही कार्तिक युवावर्गात खूप लोकप्रिय आहे. म्हणूनच तो 41 गुणांसह तिस-या स्थानी आहे. आता उत्सुकता आहे ती त्याच्या आगामी भूलभुलैय्या 2 ची.

View this post on Instagram

💙

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff) on

टायगर श्रॉफचा सिनेमा ‘बागी 3’ रिलीज झाल्यानंतर तो लोकप्रियतेची शिखरे पादाक्रांत करताना दिसतोय. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या आकडेवारीनुसार, टायगर 38 गुणांसह चौथ्या स्थानी आहे. बॉक्स ऑफिसवर 280 कोटी पार केलेली फिल्म तान्हाजीमुळे सुपरस्टार अजय देवगण लोकप्रियतेत अजूनही दिसतोय. 36 गुणांसह अजय पाचव्या स्थानी आहे.

स्कोर ट्रेंड्स इंडियाचे सह-संस्थापक अश्विन कौल म्हणतात, "आम्ही मीडिया विश्लेषणासाठी 14 भाषांमध्ये 600 पेक्षा जास्त बातम्यांमधून डेटा संग्रहित करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, प्रिंट प्रकाशन, सोशल मीडिया, व्हायरल न्यूज, प्रकाशने आणि डिजीटल प्लेटफॉर्म समाविष्ट आहेत. विविध अत्याधुनिक अल्गोरिदममुळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंगपर्यंत पोहोचू शकतो.”

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.