‘उरी’ सिनेमामुळे विकी कौशलच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ

‘उरी’ सिनेमामुळे विकी कौशलच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ

2019 हे साल विकी कौशलचं आहे, असं म्हणायला हरकत नाही. ‘उरी - द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटातल्या विकी कौशलच्या ‘हाउज द जोश’ या डायलॉगमुळे फक्त बॉक्स ऑफिसवरच नाहीतर त्याच्या फॅनफॉलोइंगमध्येही वाढता जोश दिसून येतोय. 2018 मध्ये संजू, मनमर्जिया आणि राजी फिल्म्सच्या यशामुळे अभिनेता विकी कौशल लोकप्रियतेच्या प्रकाशझोतात आला. पण 2019 मधल्या ‘उरी’ चित्रपटाने तर कमालच केली आणि विकी कौशल रातोरात स्टार झाला.
 

 

 


View this post on Instagram


 

 

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on
11 जानेवारीला रिलीज झालेला बॉलीवूडचा ‘उरी- द सर्जिकल स्ट्राइक’ हा चित्रपट या वर्षीचा बॉक्स ऑफिसवर झळकलेला पहिला सिनेमा, पण या सिनेमाने संपूर्ण महिना बॉक्स ऑफिसवर आपली चांगलीच कमाई केली.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Thank You India! 🇮🇳🙏🤗


A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on
निश्चितच याचा फायदा विकीच्या लोकप्रियतेला झाला. 2019 च्या सुरूवातीला लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत 34 व्या स्थानी असलेला विकी आता 6 व्या स्थानावर पोहोचलाय.


Vicky Kaushal Score Trends Ranking


स्कोर टेंड्स इंडियाच्या गेल्या 45 दिवसांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येतं की, 3 जानेवारी 2019 ला विकी कौशल 34 व्या स्थानावर होता. तर ‘उरी’ चित्रपटाच्या रिलीजच्या आठवड्यात म्हणजेच 10 जानेवरी ते 17 जानेवारीच्या आठवड्यात पाचव्या स्थानावर पोहोचला. ज्यानंतर त्याच्या लोकप्रियतेत बरेच उतार-चढाव दिसले. त्यानंतर पुन्हा 14 फेब्रुवारीच्या आठवड्यात उरी सिनेमाला मिळालेल्या बॉक्स ऑफिस रिस्पॉन्समुळे विकी लोकप्रियतेत 6 व्या स्थानावर आला.
 

 

 


View this post on Instagram


 

 

It’s not just a line anymore... I get so many “How’s the Josh?!” videos from you all everyday, each one made with so much love and passion, from schools, colleges, cafes, work places... from people fighting the cold in minus temperatures to people sweating it out in the gym... from conference meetings to marriage ceremonies... from a 92 years old grandmother to a 2 years old kid... from even our Jawaans in the armed forces. It’s not just a line anymore, you all have turned it into an emotion... an emotion so strong and special, I’m going to cherish for life. Thank You everyone. इस प्यार और सम्मान के लिए तहे दिल से शुक्रिया। ❤️🙏


A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on
स्कोर ट्रेंड्स इंडियाचे सहसंस्थापक अश्वनी कौल सांगतात, “विकीच्या नुकत्याच रिलीज झालेल्या उरी चित्रपटामूळे त्याच्या यशात आणि चाहत्यांच्या प्रेमात एवढी वाढ झाली की, त्याच्याविषयी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, डिजीटल न्यूज आणि प्रिंट न्यूजमध्ये खूप लिहीलं आणि चर्चिलं जातं होतं. गेल्यावर्षी आलेल्या सिनेमांमुळे विकी कौशल एक चांगला अभिनेता आहे, हे सिध्द झालंच होतं. पण 2019 वर्षाने विकीला स्टारपण बहाल केलं, असं म्हणावं लागेल.“
 

 

 


View this post on Instagram


 

 

Humbled in the presence of Honourable PM @narendramodi ji 🇮🇳🙏


A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on
अश्वनी कौल पूढे सांगतात की, "आम्ही 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजीटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक अल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग मिळवतो.”


हेही वाचा -


Valentine Day : जर विकी कौशल तुमचा बॉयफ्रेंड असता तर...


राकेश शर्मा बायोपिकसाठी विकी कौशलची वर्णी


अभिनेता विकी कौशल या अभिनेत्रीला करत आहे डेट