ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
#POPxoMarathiBappa : बाप्पा माझं सर्वात आवडतं दैवत आहे – विद्या बालन

#POPxoMarathiBappa : बाप्पा माझं सर्वात आवडतं दैवत आहे – विद्या बालन

तब्बल दीड वर्षांच्या कालावधीनंतर हरहुन्नरी अभिनेत्री विद्या बालन पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. तुम्हारी सुलू या चित्रपटातनंतर ती आता एका वैज्ञानिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. #MIssionMangal या तिच्या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने #POPxoमराठीने विद्या बालनशी मारल्या खास गप्पा. या गप्पांमध्ये कळलं विद्या आणि बाप्पाचं विशेष नातं.

विद्या आणि बाप्पाचं नातं

मंगल मिशनच्या प्रमोशनदरम्यान गणेशोत्सवाबाबत विचारलं असता विद्याने अगदी उत्साहीत होऊन सांगितलं की, गणपती आणि दुर्गापूजा हे दोन्ही सण मला आवडतात. पण गणपती बाप्पा माझं सर्वात आवडतं दैवत आहेत. मला मोदकही खूप आवडतात. पण गेली दोन वर्षं गणेशोत्सवाची धूम कमी झाली आहे. पूर्वी मनोरंजनाची साधनं कमी असल्याने गणेशोत्सवातील कार्यक्रमांच्या वेळी खूप मजा यायची. चेंबूरला माझ्या घरच्या इथे असणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवातल्या प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही आवर्जून जायचो. गणपतीच्या वेळी वाजणारा नाशिक ढोल मला खूप आवडतो.  नाशिक ढोलवर मी एकदा एवढा डान्स केला की, माझा पाय फ्रॅक्चर झाला होता. विद्याच्या आईबाबांकडे चेंबूरला दीड दिवसाचा गणपती बसवला जातो.  

विद्याचं मिशन मंगल

मिशन मंगल या भारताच्या यशस्वी अंतराळ मोहिमेवर आधारित चित्रपटात विद्या वैज्ञानिक तारा शिंदेची भूमिका करत आहे. हा मल्टीस्टारर चित्रपट असून येत्या 15 ऑगस्टला हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटांमध्ये ती एका सीनमध्ये देवाची पूजा करतानाही दाखवण्यात आली आहे. विद्याचा देवावर विश्वास आहे का, असं विचारलं असता विद्या म्हणाली की, जेव्हा विश्वासाची गोष्ट येते तेव्हा विद्या सायन्स आणि देव या दोन्हींना मानते. पण ती हेही म्हणते की, एक शक्ती आहे जी सायन्सपेक्षाही मोठी आहे.

ADVERTISEMENT

१२ वर्षांनंतर पुन्हा एकत्र

Instagram

हे बेबी आणि भुलभुलैय्यानंतर या चित्रपटात पुन्हा एकदा विद्या अभिनेता अक्षयकुमारसोबत दिसणार आहे. इतक्या वर्षानंतर तुमच्या दोघांमध्ये काय बदललं असं विद्याला विचारलं असता ती म्हणाली फक्त आमचं वय वाढलंय. बाकी काहीच नाही बदलंल. आम्ही मिशन मंगलच्या सेटवर खूप एन्जॉय केलं. कारण अक्षय नेहमीच काही ना काही प्रँक्स करत असतो. यावेळी त्याने बरेचदा माझ्या साडीला चमचे बांधून ठेवले. कधीच कोणाचा फोनच लपव. असं तो करत असतो. यावेळेला मीही त्याच्यासोबत असंच केलं आणि मज्जा आली. 

सशक्त स्त्रीचं प्रतीक होत्या सुषमा स्वराज

ADVERTISEMENT

Instagram

सुषमा स्वराज यांना मी व्यक्तीगतरित्या तर ओळखत नाही. पण मी त्यांना एकदा दिल्ली एअरपोर्टवर भेटले होते. त्या ज्या पद्धतीने बोलायच्या आणि त्यांची पर्सनलिटी होती. मला त्या खूप आवडायच्या. त्या आजच्या काळातील सशक्त स्त्रीचं प्रतीक होत्या. त्यांच्यावरील बायोपिकची ऑफर आल्यास करणार का, असं विचारल असता ती म्हणाली, “ जर मला सुषमा स्वराज यांचं बायोपिक ऑफर करण्यात आलं आणि स्क्रीप्ट चांगली असेल तर मी नक्कीच करेन.”

प्रादेशिक भाषांमध्ये काम

नॉन हिंदी चित्रपटमध्ये खूपच चांगलं कटेंट आहे. आताच्या काळात मराठी चित्रपट फक्त मराठी लोकंच नाही तर इतर भाषेतील लोकंही बघत आहेत. मराठी चित्रपटात पुन्हा काम करायला आवडेल का, असं विचारलं असता ती म्हणाली की, मला फक्त मराठीच नाहीतर प्रत्येक भाषेतील एका चित्रपटात काम करायला आवडेल.

लवकरच दिसणार विशेष भूमिकेत

सूत्रानुसार, मिशन मंगल यशस्वी झाल्यावर विद्या बालन दिसणार आहे ह्यूमन कंप्यूटर आणि गणितज्ञ शकुंतला देवी यांच्या भूमिकेत. या चित्रपटासाठी ती लंडनला जाणार असून तिने तयारीला सुरूवात केली आहे. तसंच विद्या इंदिरा गांधींवरही वेबसीरिज करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे येत्या काळात विद्याच्या चाहत्यांना तिला चांगल्या भूमिकांमध्ये पाहण्याची संधी मिळणार आहे. 

ADVERTISEMENT

हेही वाचा –

विद्या बालनला समुद्राच्या लाटांसोबत खेळताना पाहून ‘या’ अभिनेत्रीला आला राग

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली खिलाडी अक्षय कुमारची फिरकी

तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर गन उचलून बनणार ‘वुमनिया’

ADVERTISEMENT
08 Aug 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT