विद्या बालनला समुद्राच्या लाटांसोबत खेळताना पाहून ‘या’ अभिनेत्रीला आला राग

विद्या बालनला समुद्राच्या लाटांसोबत खेळताना पाहून ‘या’ अभिनेत्रीला आला राग

अभिनेत्री विद्या बालन सध्या बालीला व्हेकेशनवर गेली आहे. बालीला समुद्र किनारी मौज करताना तिने काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती समुद्राच्या लाटांसोबत खेळताना दिसत आहे. विद्या या फोटोंमध्ये फारच हॉट आणि सेक्सी दिसत  आहे. या फोटोंमध्ये तिने गुलाबी रंगाचा आणि फ्लॉवर प्रिंटिंगचा ड्रेस घातला आहे. मोकळे केस आणि दिलखेचक अदांमुळे तिने अनेकांना या लुकने घायाळ  केलं आहे. या फोटो आणि व्हिडिओवर तिच्या चाहत्यांनी आणि बॉलीवूड सेलिब्रेटीजनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र एक बॉलीवूड अभिनेत्री तर चक्क यासाठी तिच्यावर रागावली आहे. विद्याच्या फोटोवर प्रतिक्रिया देताना तिने तिच्या मनातील राग व्यक्त केला आहे.


सोनाक्षी का  रागावली विद्यावर


विद्याचे बाली मधील समुद्रात खेळताना फोटो पाहून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला देखील हॉलिडेला जाण्याची इच्छा झाली. म्हणून सोनाक्षीने विद्याच्या फोटोंवर प्रतिक्रिया देताना “तू मला का सोबत घेऊन गेली नाहीस” अशी प्रतिक्रिया दिली आहे. सोनाक्षीची ही प्रतिक्रिया  विद्याला एक लाडीक राग देणारी आहे. ज्यामुळे तिचे विद्यावरील प्रेम आणि हक्क दिसून येत आहे.

विद्याच्या फोटोवर सेलिब्रेटीजच्या प्रतिक्रिया


विद्याला सोनाक्षीसोबतच आणखी काही सेलिब्रेटीजनीं देखील प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. अभिनेत्री प्रियंका चोप्राने विद्याला प्रतिक्रिया देताना  स्टनर असं म्हटलं आहे. तर अभिनेत्री अदिती राव हैदरीने विद्याला फायर इमोजी पाठवल्या आहेत. ज्यातून ती या लुकमध्ये हॉट आणि सेक्सी दिसत आहे असं तिला सांगायचं आहे. टेलीव्हिजन डेलीसोप क्वीन एकता कपूरने विद्याला ‘सुंदर’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. सेलिब्रेटीज व्यतिरिक्त विद्याच्या अनेक चाहत्यांनी तिला या फोटोजसाठी लाईक्स आणि कंमेट्स दिल्या आहेत.


 vidya balan


विद्या बालनचे  चित्रपट


विद्या बालनने भुलभुलैया, परिनिता, सलाम-ए- इश्क, गुरू, पा, कहानी, नो वन किल्ड जेसिका, किस्मत कनेक्शन, इश्किया, घनचक्कर, डर्टी, हमारी अधूरी कहानी, तुम्हारी प्यारी सुलू आणि बेगम जान या चित्रपटातून काम केलं आहे. या सर्वच चित्रपटातून विद्याने विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. बेगम जान नंतर ती कोणत्याच चित्रपटात दिसली नाही. म ात्र ती सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह आहे. 


अधिक वाचा


#BBM2 : बिग बॉसच्या घरात भरलीयं शाळा


ये है मोहबतें' फेम विवेक दहिया झळकणार नागिन 4 च्या प्रमुख भूमिकेत


अर्थच्या रिमेकमध्ये स्मिता पाटील यांची भूमिका साकारणार ‘ही’ अभिनेत्री


 


फोटोसौैजन्य - इन्स्टाग्राम