जंगलातील अद्भूत विश्व उलगडणाऱ्या ‘जंगली’ चित्रपटाचं ट्रेलर प्रदर्शित

जंगलातील अद्भूत विश्व उलगडणाऱ्या ‘जंगली’ चित्रपटाचं ट्रेलर प्रदर्शित

विद्युत जामवाल च्या आगामी 'जंगली' चित्रपटाचं ट्रेलर बुधवारी प्रदर्शित करण्यात आलं. ट्रेलरच्या आधी या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. चाहते अनेक दिवसांपासून या चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहत होते. मात्र काही कारणांमुळे या ट्रेलरच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात येत होती. अखेर चाहत्यांना या चित्रपटाचा ट्रेलर आता सोशल मीडियावर पाहता येणार आहे. 'जंगली' चित्रपट 5 एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. या ट्रेलरमधून जंगलातील अनोखं विश्व प्रेक्षकांना पाहता येईल. प्राणी मित्रांसाठी ही एक चांगली संधीच आहे. माणूस आणि प्राण्यांच्या अतूट मैत्रीचं दर्शन या चित्रपटाच्या माध्यमातून होणार आहे. या चित्रपटात राज आणि भोला या दोघांच्या मैत्रीची कहाणी असणार आहे. जंगली पिक्चर्सची निर्मिती असलेल्या जंगली चित्रपट चक रसेल यांनी दिग्दर्शित केला आहे. तर विनित जैन आणि प्रिती सहानी या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. जंगली चित्रपटातून एप्रिल महिन्यात संपूर्ण जंगलविश्वच चित्रपटगृहात अवतणार आहे.

Subscribe to POPxoTV

विद्युत जामवाल साकारणार प्राणीमित्राची भूमिका


जंगली चित्रपटात विद्युत जामवाल प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. विद्युत या चित्रपटामध्ये राज नावाच्या पशुचिकित्सकाची भूमिका साकारणार आहे. राजचे वडील जंगलात हत्तीचे अभयारण्य निर्माण करतात. तरुणपणी राजची पुन्हा एकदा त्याच्या लहाणपणीचा मित्र 'भोला' हत्तीशी भेट होते अशी ही कहाणी आहे. या चित्रपटातून जंगल विश्वात होणारी प्राण्यांची अवैध शिकार, तस्करी अशा अनेक गोष्टीबाबत होणारा संघर्ष दाखविण्यात येणार आहे. शिवाय या चित्रपटात विद्युत असल्यामुळे भरपूर अॅक्शन ड्रामा असणार आहे. विद्युत जामवालच्या अॅक्शनमूव्हचे अनेक चाहते आहेत. विद्युत जंगली सोबतच कंमाडो 3 साठी देखील सज्ज झाला आहे. विद्युतच्या कंमाडो आणि कंमाडो 2 मधील अॅक्शनची जादू अनेकांवर चालली होती. वन मॅन आर्मी असलेला कंमाडो 3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे विद्युतचे दोन अॅक्शनपट चाहत्यांना पाहता येणार आहेत.जंगलीमध्ये मराठमोठ्या कलाकारांची टीम


जंगली चित्रपटात विद्युत सोबत काही मराठी कलाकार देखील या  चित्रपटात दिसणार आहेत. अतुल कुलकर्णी, मकरंद देशपांडे, आशा भट यांच्यासह पहिल्यांदाच पुजा सावंत ही मराठमोळी अभिनेत्री जंगलीमध्ये झळकणार आहे. पुजा सावंत या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच हिंदी चित्रपटात पदार्पण करत आहे. या चित्रपटात पुजाची 'शंकरा' या नावाची भूमिका असणार आहे. अभिनेता अतुल कुलकर्णी एका शिकारीच्या भूमिकेत दिसत आहे.

‘एक होतं पाणी’ असं म्हणण्याची वेळ आली तर


2019 मध्ये आलियाची जोरदार घौडदौड सुरू


#StrengthOfAWoman : ‘या’ आहेत बॉलीवूडच्या सुपरवुमन ज्यांनी स्वबळावर केले चित्रपट सुपरहिट


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम