#brokenbutbeautiful: विक्रांत मेस्सीने साखरपुडा झाल्याची गोड बातमी केली शेअर

#brokenbutbeautiful: विक्रांत मेस्सीने साखरपुडा झाल्याची गोड बातमी केली शेअर

विक्रांत मेस्सी हे नाव सध्या खूपच गाजत आहे. दीपिका पादुकोणबरोबर लवकरच मोठ्या पडद्यावर स्क्रिन शेअर करणारा विक्रांत वेब विश्वामध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. आपल्या आयुष्याची नवी इनिंग खेळायला तयार झालेल्या विक्रांतने आपल्या चाहत्यांसह एक गोड बातमी शेअर केली आहे. अनेक तरूणींच्या गळ्यातील ताईत असलेल्या विक्रांतने #brokenbutbeautiful अशी बातमी दिली आहे आणि ती म्हणजे आपली अनेक वर्षांंपासून असलेली गर्लफ्रेंड शीतल ठाकूर हिच्याशी त्याने साखरपुडा केला आहे. विक्रांतने स्वतः ही बातमी शेअर केली आहे. त्यामुळे बऱ्याच तरूणींचं मन नक्कीच दुखावलं असणार. पण त्याचे चाहते मात्र आनंदी झाले आहेत. 

प्रियांका चोप्रा जगभरात गुगल सर्चवर सर्वात पुढे

मालिका आणि वेबसिरीजमधील बादशाह विक्रांत

View this post on Instagram

Welcome home baby 🙏♥️

A post shared by Sheetal Thakur (@sheetalthakur) on

विक्रांत मेस्सी हे नाव सर्वात जास्त प्रसिद्ध आहे ते तरूणींमध्ये. विक्रांतचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. विक्रांतने स्वतः आपल्या साखरपुड्याची बातमी शेअर केली आहे. बऱ्याच काळापासून त्याची प्रेयसी असणारी अभिनेत्री शीतल ठाकूरशी विक्रांतने साखरपुडा केला आहे. एका वेबसाईटला त्याने ही माहिती दिली. तसंच विक्रांत सोशल मीडियावरदेखील सक्रिय असतो. अगदी लहानशा समारंभात घरच्या माणसांच्या उपस्थितीत हा साखरपुडा झाल्याचंही त्याने या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. तसंच लग्नाविषयी सविस्तर बोलू असंही विक्रांतने सांगतिलंं आहे. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मी स्वतः याबद्दल सांगने असंही विक्रांतने स्पष्ट केलं आहे. साखरपुडा आणि लग्न या खासगी गोष्टी असल्याने अगदी घरच्यांच्या उपस्थितीत साखरपुडा पार पडला असल्याचं म्हटलं जात आहे. विक्रांत हा खासगी आयुष्यात सोशल नाही असंही म्हटलं जात आहे. 

तापसी पन्नूने मिळवली अजून एक लक्षवेधी भूमिका

चाहत्यांना लागली लग्नाची उत्सुकता

विक्रांत आणि शीतलच्या साखरपुड्याची बातमी कळताच अनेक चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तर काही चाहत्यांना त्याच्या लग्नाचीही उत्सुकता लागली आहे. आता नक्की लग्नाची कोणती तारीख विक्रांत जाहीर करणार याकडेही चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान शीतलनेही विक्रांतबरोबरच्या साखरपुड्याचे काही फोटो शेअर करत आपण विक्रांतबरोबर नात्यात असल्याचं स्पष्ट केलं आहे. विक्रांतने काही दिवसांपूर्वीच शीतलच्या घरी जाऊन हिमाचलमधील धरमशाला येथे कुटुंबाची भेट घेतली होती. त्यावेळचे काही फोटोही शीतलने शेअर केले आहेत. विक्रांत आणि शीतल हे एकमेकांना बरीच वर्ष ओळखत असून 2015 पासून ते एकमेकांना डेट करत आहेत. 2017 मध्ये त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली. तर आता 2019 मध्ये साखरपुडा केला असून हे दोघंही लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं असून अजूनही लग्नाची तारीख मात्र घोषित केलेली नाही. तसंच हे लग्न नक्की कुठे होणार याचीही माहिती दिली नाही. त्यासाठी मात्र विक्रांतच्या चाहत्यांना वाट पाहावी लागणार आहे. तसंच विक्रांत आणि शीतल लवकरच लग्नाची तारीख जाहीर करतील अशीही चाहत्यांना अपेक्षा आहे. 

या कारणासाठी आशा पारेख यांनी केलं नाही लग्न

विक्रांत कामामध्ये व्यग्र

View this post on Instagram

#majormissing♥️

A post shared by Sheetal Thakur (@sheetalthakur) on

विक्रांत मेस्सी अनेक वेबसिरीजमध्ये दिसतो. तसंच वेबदुनियेत विक्रांत नाव प्रसिद्ध आहे. पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये विक्रांतचा दीपिका पादुकोणबरोबर चित्रपट येत असून याचं चित्रीकरणही पूर्ण झालं आहे. विक्रांतचं नाव जेव्हा या चित्रपटासाठी घोषित करण्यात आलं होतं तेव्हा त्याच्या चाहत्यांनाही प्रचंड आनंद झाला होता आणि या चित्रपटाची चाहतेदेखील आतुरतेने वाट पाहात आहेत. विक्रांत आपल्या अभिनयाने अनेकांची मनं जिंकून घेतली आहेत. विक्रांतची सध्या ब्रोकन बट ब्युटीफूल या वेबसिरीजचा दुसरा भागदेखील गाजत आहे. त्यामुळे सध्या विक्रांत यशाच्या शिखरावर आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.