कार्तिक आणि सारानं केलं लिप लॉक, व्हायरल झाला व्हिडिओ

कार्तिक आणि सारानं केलं लिप लॉक, व्हायरल झाला व्हिडिओ

बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि सारा अली खान दोघांचंही करिअर सध्या खूपच चांगलं चालू आहे. ‘कॉफी विथ करण’ मध्ये साराने कार्तिकला डेट करायचं आहे सांगितल्यापासून कार्तिक आणि साराला एकत्र आणण्यासाठी बऱ्याच जणांचे प्रयत्न सुरु आहेत. सध्या लाखों दिलो की धडकन बनलेल्या कार्तिकचा नुकताच ‘लुका छुपी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला असून चांगली कमाई करत आहे. तर कार्तिक आणि सारा आपल्या पुढच्या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त झाले आहेत. पण एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये कार्तिक आणि सारा एकमेकांबरोबर अगदी क्लोज असलेले दिसत असून यामध्ये सारा आणि कार्तिकने लिप लॉक केलेलं दिसून येत आहे.


साराचं स्वप्न पूर्ण


viral-video-of-kartik-aaryan-sara-ali-khan-lip-kiss
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानची मुलगी रा अली खान (Sara Ali Khan) ने आपल्या करिअरची सुरुवात सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) सारख्या मातब्बर अभिनेत्यांपासून केली. तिच्या अभिनयाने तिने स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं आहे. सुरुवातीला दोन वेगळ्या प्रोजेक्टवर काम करून आपण बॉलीवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करायला आलो आहोत हे दाखवून दिलं आहे. पण असं असतानाही रणवीर सिंह आणि सुशांत सिंह राजपूतच्या अनेक मुली चाहत्या असताना साराला मात्र अन्य कोणत्या अभिनेत्याची ओढ लागून राहिली होती. तिने ही गोष्ट आपल्या वडिलांसमोरच करण जोहरच्या शो मध्ये कबूल केली होती. तिला कार्तिक आर्यनला डेट करायचं होतं. तिचं स्वप्न आता पूर्ण होत असल्याचं दिसत आहे. इम्तियाज अलीच्या ‘लव आज कल 2’ मध्ये कार्तिक आणि सारा ही जोडी काम करत आहे. त्यामुळे सध्या हे दोघंही या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहेत. इतकंच नाही तर या चित्रपटामध्ये सारा आणि कार्तिकने एकमेकांबरोबर लिप लॉक केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.


कार्तिक आणि साराने केलं किस
नुकतंच बॉलीवूडच्या चाहत्यांना कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि क्रिती सॅनन (Kriti Sanon) ची जोडी चित्रपट ‘लुका छुप्पी’ मध्ये आवडली आहे. आता कार्तिक आपल्या पुढच्या चित्रटाच्या चित्रीकरणात व्यस्त झाला असून बॉलीवूडमधून आलेल्या बातमीनुसार, दोन्ही तरूण आणि जबरदस्त टॅलेंटेड स्टार्स आता एकत्र मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. कार्तिक आर्यनच्या फॅनपेजवरून एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यामध्ये कार्तिक आणि सारा एकमेकांना किस घेताना दिसत आहेत. हे नुसतंच किस नाही तर लिप लॉकचा हा सीन हे दोन्ही कलाकार देत असल्याचं नुकतंच लीक झालं आहे.


खास असेल यांची केमिस्ट्री


kartik-aryan-in-a-new-look-for-pati-patni-aur-woh-2
जेव्हा सारा अली खानने आपल्या क्रशची घोषणा केली होती. तेव्हापासूनच अनेक निर्माते आणि दिग्दर्शक या दोघांना घेऊन एक चित्रपट करण्यासाठी प्रयत्नात होते. कार्तिक आणि सारा आता इम्तियाज अलीच्या ‘लव आज कल 2’ मध्ये एकत्र दिसणार असल्याचं म्हटलं जात असून याचं चित्रीकरणही सुरु झालं आहे. याआधीच्या पहिल्या भागामध्ये साराचे वडील सैफ अली खान यांनी काम केलं होतं आणि हा चित्रपट हिटदेखील होता. आता पुन्हा एकदा येणाऱ्या या चित्रपटामध्ये सारा आणि कार्तिकची केमिस्ट्री खास असणार यात काहीच वाद नाही. त्यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्रीदेखील उत्तम दिसावी यासाठी इम्तियाज सध्या प्रयत्न करत असल्याचं सांगण्यात येत आहे. कार्तिक या चित्रपटाबरोबरच सध्या अनन्या पांडे (Ananya Panday) आणि भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) बरोबर चित्रपट ‘पति, पत्नी और वो’ च्या चित्रीकरणामध्येदेखील व्यस्त आहे.


फोटो सौजन्य - Instagram


हेदेखील वाचा -


2019 मध्ये आलियाची जोरदार घौडदौड सुरू


जंगलातील अद्भूत विश्व उलगडणाऱ्या ‘जंगली’ चित्रपटाचं ट्रेलर प्रदर्शित


मार्च महिन्यात जन्म घेणाऱ्या व्यक्ती कशा असतात, जाणून घ्या