फूड डिलीव्हरी करणारा विशाल ठरला 'डान्स दिवाने 2' चा विजेता

फूड डिलीव्हरी करणारा विशाल ठरला 'डान्स दिवाने 2' चा विजेता

कोणाचे नशीब कधी पालटेल हे कधीच सांगता येत नाही. विशेषत: तुमच्यामध्ये टँलेट असेल तर ते कधीच वाया जात नाही. फूड डिलीव्हरी करुन लोकांना तृप्त करणारा आणि स्वत:च्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या विशालने डान्स दिवाने 2 च्या ट्रॉफीवर नाव कोरले आहे. त्यामुळे टँलेट कधीच वाया जात नाही हे त्याने सिद्ध केले आहे. 28 सप्टेंबर रोजी हा दिमाखदार सोहळा रंगला. रात्री उशिरा डान्सर विशाल सोनकर याला दुसऱ्या पर्वाचा विजेता म्हणून घोषित करण्यात आले.

अभिनेत्री श्वेता तिवारी पुन्हा करणार लग्न, केला व्हिडिओ शेअर

जमशेदपुरचे नाव केले रोशन

‘डान्स दिवाने 2’ च्या नव्या सीझनमध्ये जमशेदपुरच्या विशाल सोनकरचे नाव आधीपासूनच पुढे होते. त्याचे परफॉर्मन्स पाहता त्याला यात यश मिळेल असे वाटत होते.फिनालेमधील लढत मेहुल मेहता आणि त्वीषा विहान यांच्यासोबत विशालचा अखेरचा सामना होता. पण विशाल या सगळ्यांना मागे टाकत या सीझनचा विनर बनला. 15 लाख रुपये आणि ट्रॉफी असे या सीझनच्या पुरस्काराचे स्वरुप होते. 

सगळ्यात आधी केला या व्यक्तीला फोन

विशालला लहानपणापासूनच डान्सची आवड आहे. तो लहानपणापासूनच उत्तम डान्स करतो. पण या रिअॅलिटी शोमध्ये पोहोचण्यासाठीही त्याने खूप स्ट्रगर केला आहे.या रिअॅलिटी शोमध्ये येण्याआधी तो एका हॉटेलमध्ये डिलीव्हरी बॉय म्हणून काम करत होता. या शोचा विजेता झाल्यानंतर त्याने लगेचच हॉटेलच्या मालकाला फोन लावत ही आनंदाची बातमी दिली. त्यावेळी त्याच्या मालकाने तू विजेता होणार हे माहीत असल्याचे त्याला सांगितले. 

सावनी रविंद्रचे नवरात्री स्पेशल गुजराती गाणे रिलीज

स्वप्न करणार पूर्ण

Instagram

विशालची परिस्थिती बेताची असून या कार्यक्रमात येण्यासाठी त्याने खूप स्ट्रगल केला असल्याचे अनेकदा या शोच्या माध्यामातून कळलेच आहे. पण आता त्याचे नशीब पालटले आहे. कारण त्याला  15 लाख रुपयांची रक्कम बक्षीस म्हणून मिळाली आहे. तो या रक्कमेचे काय करणार? असा प्रश्न त्याला केल्यानंतर त्याने या रकमेचा उपयोग करुन घर घेईन असे सांगितले आहे. शिवाय घराची जबाबदारी खूप लहान वयात घ्यावी लागल्यामुळे त्याचे आठवीनंतर शाळा सोडली त्यामुळे तो शिक्षण पूर्ण करणार आहे आणि बहिणीचे लग्नही तो या पैशांमधून करणार आहे.शिवाय त्याचे डान्सचे पॅशनही सुरुच ठेवणार आहे. 

प्रियांकाने केले प्रमोशन

Instagram

शनिवारी रंगलेल्या या ग्रँड फिनाले सोहळ्यासाी प्रियांका चोप्रा जोनस आली होती. The sky is pink या तिच्या चित्रपटाचे प्रमोशन तिने या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून केले. यावेळी या शोची जज माधुरी दीक्षित आणि प्रियांका चोप्रा यांचा धुव्वाधार परफॉर्मन्सही पाहायला मिळाला.  शंशाक खैतान आणि तुषार कालिया हे देखील या शोचे जज आहेत. 

विशालच्या यशानंतर एक गोष्ट नक्की आहे की, तुमच्याकडे टँलेट असेल तर त्याचा मागोवा घ्यायला विसरु नका. यश वयाच्या कोणत्याही वर्षी तुमचे दार ठोठावू शकते. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.