‘सोनमने ओव्हर अॅक्टिंग आणि ओव्हर रिअॅक्ट करणं बंद करावं’ - विवेक ओबेरॉयचा सोनमवर पलटवार

‘सोनमने ओव्हर अॅक्टिंग आणि ओव्हर रिअॅक्ट करणं बंद करावं’ - विवेक ओबेरॉयचा सोनमवर पलटवार

विवेक ओबेरॉयने ऐश्वर्या रायची खिल्ली उडवणारे आणि एक्झिट पोलसंबंधी एक मीम शेअर केल्यानंतर आता नवा वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर सोनम कपूरने विवेकला ‘घृणास्पद आणि वर्गहीन’ असं म्हटलं होतं. यावर आता विवेकने पलटवार करत ‘सोनमने चित्रपटांमध्ये ओव्हरअॅक्टिंग कमी करावी आणि सोशल मीडियावर ओव्हर रिअॅक्ट होणं कमी करावं’ असं म्हटलं आहे. सोनम नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते आणि मनात येईल ते स्पष्ट बोलते. यावेळी विवेकने ऐश्वर्याविषयी ट्विट केल्यानंतर सोनमने त्याला ‘क्लासलेस’ म्हटलं आणि यावरून पुन्हा नवा वाद निर्माण झाला आहे.


vivek FB
विवेकने ANI ला दिलेल्या मुलाखतीत केला सोनमवर शाब्दिक हल्ला
विवेकने आपल्या ट्विटबद्दल प्रसिद्ध एजन्सी ANI ला मुलाखत दिली. त्यामध्ये त्याने आपली बाजू मांडली. यावेळी विवेकनेही सोनमवर शाब्दिक हल्ला केला आहे.  ‘सोनमने आपल्या चित्रपटांमध्ये ओव्हर अॅक्टिंग कमी करावी आणि सोशल मीडियावर ओव्हर रिअॅक्ट करणं बंद करावं’ असा सल्ला यावेळी विवेकने दिला. तसंच विवेक पुढे म्हणाला की, ‘लोकं स्वतःला कूल आणि वेगळं सिद्ध करण्यासाठी अशा तऱ्हेच्या कमेंट्स करत असतात. सोनम नेहमी महिला सबलीकरणासंबंधी बोलते. पण मला तिला एक लहानसा प्रश्न विचारायचा आहे, तिने आतापर्यंत महिलांसाठी नक्की काय केलं आहे? गेल्या दहा वर्षांमध्ये आम्ही अनेक कामं केली आहेत. 2200 वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना यातून सोडवलं आहे. तर बऱ्याच मुलींना पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळवून द्यायची कामंही केली आहेत. पुढेही करत राहू. या सगळ्या गोष्टींचे माझ्याकडे पुरावेदेखील आहेत. फोर्ब्स आणि इतर आंतरराष्ट्रीय पातळीवरील मासिकांमध्ये आमच्या कामाविषयी लिहूनदेखील आले आहे. पण यापैकी तू नक्की काय करतेस? तुझा वेळ मेकओव्हरमध्ये घालवत होतीस,  तेव्हापासून मी सामाजिक काम करत आहे. मी माफी मागतो. पण मी नक्की काय चूक केली आहे. ज्या लोकांवर मीम आहे त्यांना काहीच अडचण नाही आणि इतर लोकांनाच त्रास आहे.’ असंही विवेकने म्हटलं आहे.


दरम्यान विवेकने सोनमला उद्देशून पुढे असंही सांगितलं की, ‘सोनम तू एक चांगली मुलगी असून मी तुझ्या वडिलांचा नेहमीच आदर केला आहे.’ याचवेळी त्याने सोनमला ओव्हर अॅक्टिंग आणि ओव्हर रिअॅक्ट होणं बंद कर असाही सल्ला दिला आहे.


सोनमने विवेकला मीमबद्दल फटकारले होते


विवेकने शेअर केलेल्या मीमबद्दल सोनमने त्याला फटकारले होते. त्यावर विवेकने पलटवार करत सोनमलाच फटकारलं आहे. विवेकला त्याने शेअर केलेल्या मीमबद्दल इतर काही कलाकारांनीही फटकारले आहे. तर नेटकऱ्यांनीही विवेकच्या या वागण्याबद्दल टीका केली आहे.  इतकं सर्व असूनही विवेकने मात्र यामध्ये आपण काहीही चूक केली नसल्याचं सांगितलं आहे. मीम हे मनोरंजन असून ते त्याप्रमाणेच घ्यायला हवं असं विवेकने म्हटलं आहे. पण या सर्वामध्ये सलमान, ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी मात्र शांत राहणंच पसंत केलं आहे. सोनम आणि ऐश्वर्या दोघीही सध्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालेल्या आहेत. आता विवेकच्या या वक्तव्यानंतर सोनम पुन्हा विवेकवर आपला राग काढणार का? याकडे सर्वांचं लक्ष केंद्रीत झालं आहे.


फोटो सौजन्य - ANI, Instagram


हेदेखील वाचा - 


विवेक ओबेरॉयचं ट्विट हे घृणास्पद आणि वर्गहीन, सोनम कपूरचं स्पष्ट मत


MeToo मध्ये अडकलेल्या राजकुमार हिरानीच्या मदतीला सोनम कपूर


विवेक ओबेरॉयला मिळाली सर्वात मोठी भूमिका, साकारणार पंतप्रधान नरेंद्र मोदी