विवेक ओबेरॉयचं ट्विट हे घृणास्पद आणि वर्गहीन, सोनम कपूरचं स्पष्ट मत

विवेक ओबेरॉयचं ट्विट हे घृणास्पद आणि वर्गहीन, सोनम कपूरचं स्पष्ट मत

विवेक ओबेरॉय पुन्हा एकदा आपल्या वाईट कृत्यामुळे चर्चेत आला आहे. एक्झिट पोलच्या अंदाजावर तयार करण्यात आलेलं एक मीम विवेकने आपल्या अकाऊंटवरून ट्विट केल्यानंतर सोशल मीडियाच नाही तर अगदी बॉलीवूडपासून ते राजकारणी नेत्यांपर्यंत सर्वांनीच विवेकला ट्रोल केलं आहे. ट्विटरवर विवेकने जे मीम्स शेअर केलं, त्यामध्ये त्याची पूर्वाश्रमीची तथाकथित प्रेयसी ऐश्वर्या राय बच्चनला त्याने ट्रोल तर केलंच आहे, पण एक्झिट पोलचीही खिल्ली उडवल्याचा प्रकार घडला आहे. पण या त्याच्या वागण्यानंतर आता सोनम कपूरने त्याला ‘घृणास्पद आणि वर्गहीन’ ठरवलं आहे. या घडलेल्या प्रकाराला सोनमनेही सणसणीत चपराक दिली आहे. केवळ सोनमच नाही तर यावेळी विवेकला सर्वांनीच ट्रोल करत त्याची चूक त्याला दाखवून दिली आहे. सोनम कपूर सध्या कान फेस्टिव्हलमध्ये असून ऐश्वर्या राय बच्चनदेखील आपल्या मुलीसह कानमध्ये सहभागी झाली आहे.


नक्की काय घडलं?लोकसभा निवडणूक 2019 चे एक्झिट पोलचे निकाल नुकतेच सर्वांसमोर आले आहेत. यावेळी विवेक ओबेरॉयने आपल्या सोशल मीडियावर असा मीम रिशेअर केला, ज्यामुळे पुन्हा एकदा ऐश्वर्या आणि सलमानच्या नात्यावर त्याने भाष्य तर केलंच पण यावेळी त्याने अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्यावरही भाष्य केलं आहे. मीममध्ये ऐश्वर्याचं या तिघांबरोबर असलेलं नातं यामध्ये अतिशय वाईटरित्या दर्शवण्यात आलं आहे. त्यावर विवेक ओबेरॉयनं रिशेअर करत कमेंट केली, ‘हाहा, क्रिएटिव्ह! इथे कुठलंच राजकारण नाही, फक्त आयुष्य आहे. क्रेडिट @pavansingh1985’ इतकंच लिहून विवेक थांबला नाही तर, त्याने त्यावर एक स्माईलीचं इमोजीदेखील पोस्ट केलं आहे. या फोटोमध्ये सर्वात पहिले सलमानबरोर ऐश्वर्या दिसत असून ‘ओपिनियन पोल’ असं लिहिण्यात आलं आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये विवेक आणि ऐश्वर्या असून त्यावर ‘एक्झिट पोल’ असं लिहिलं आहे, तर तिसऱ्या फोटोमध्ये अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्याचा फोटो असून यामध्ये ‘रिझल्ट’ असं नमूद करण्यात आलं आहे.


सोनमचं सणसणीत उत्तरया रिशेअरिंगनंतर विवेकला नेटकऱ्यांनी ट्रोल करायला सुरवात केली. इतकंच नाही तर ज्या पंतप्रधानांची विवेक सध्या भूमिका करत आहे, त्याचाही विवेकने आदर न ठेवता असं वक्तव्य केल्याचंही काही जणांनी म्हटलं आहे. सोनम कपूर नेहमीच आपलं म्हणणं स्पष्टपणे मांडते. तिने या विषयावर कोणतंही बोलणं न टाळता विवेकच्या या वागण्यावर ‘घृणास्पद आणि वर्गहीन’ अशी प्रतिक्रिया ट्विटरच्याच माध्यमातून दिलं आहे.


सलमान, ऐश्वर्या आणि अभिषेकची प्रतिक्रिया नाही


यापूर्वी विवेक ओबेरॉयने सलमानचा राग कित्येक वर्षांपूर्वी ओढवून घेतला होता. आता पुन्हा एकदा सलमानला यात ओढून विवेकचं संपूर्ण करिअरच संपण्याच्या मार्गावर असल्याचंही काही लोकांचं म्हणणं आहे. तर या सगळ्या गोष्टीवर अजूनही सलमान, ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी अजूनही कोणतीही प्रतिक्रिया यावर दिली नसली तरीही विवेक ओबेरॉयचं बोलणं यापुढे सहन केलं जाणार नाही हे सध्याच्या नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेवरून जाणवत आहे. इतकंच नाही आता विवेकचं पुढे नक्की भवितव्य काय याचीही त्याला चिंता करायची या ट्विटनंतर गरज भासेल असंही म्हटलं जात आहे.


विवेकचा चित्रपट मार्गदर्शच्या वाटेवर

विवेक ओबेरॉयचा सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिक प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. निवडणूक होण्यापूर्वी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. पण त्याच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. या चित्रपटासाठीच हा विवेकचा स्टंट तर नाही ना? असंही आता म्हटलं जात आहे.


फोटो सौजन्य - Twitter, Instagram


हेदेखील वाचा - 


आराध्या बच्चनचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल


‘मिस्टर इंडिया 2’ येणार परत, पुन्हा मोगँम्बो खुश होणार


Good news: कपिल शर्मा लवकरच बनणार ‘बाबा’