आला रे आला गणेश गायतोंडे परत आला. Sacred games चा पहिला सीझन ज्यांनी पाहिला असेल त्यांना या वेबसिरीजची उत्सुकता असणे अगदी स्वाभाविक होते. कभी कभी तो साला लगता है अपुनीच भगवान है, असे म्हणणारा गणेश गायतोंडे तुमच्या अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे द्यायला लवकरच येणार आहे. सोमवारी या बेवसिरीजच्या सीझन 2 चा टीझर आला आहे. जो तुम्ही नक्कीच पाहायला हवा. कारण या सगळ्या मागचा सुत्रधार कोण आहे? ते या नव्या भागातून कळणार आहे.
कलंकच्या अपयशानंतर आदित्य रॉय कपूर दिसणार हटके रुपात
सगळ्या सोशल प्लॅटफॉर्मवर या वेबसिरीजचा टीझर रिलीज करण्यात आला. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी एक टॅग लाईन लिहिली आहे ती म्हणजे Iss khel ka asli baap kaun? आता पाहा याचा टीझर
आता टीझर पाहून तुम्हाला काही कळाले नाही, असे अजिबात म्हणू नका. पहिल्या भागात या सगळ्याचा सुत्रधार कोण होता ते आपल्याला कळले नव्हते ते सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. या टीझरच्या शेवटी एका बाबावर येऊन फ्रेम थांबत आहे.आता तरी सरताज सिंह ( सैफ अली खान) मुंबईला वाचवू शकेल का? हा सगळा गुंता सुटू शकेल का? यासाठी आता वेबसिरीज रिलीज होण्याची वाट पाहावी लागणार आहे.
कॉमेडी क्वीन भारती सिंहच्या घरी येणार नवा पाहुणा
आता तुम्ही sacred games चा पहिला सीझन पाहिला असेल तर तुम्हाला त्यामध्ये राधिका आपटे दिसली होती. पण तिचा त्यात मृत्यू होतो. तर ज्या कुक्कुचा गणेश गायतोंडे दिवाना असतो ती देखील मरते. आता नव्या चेहऱ्यामध्ये कल्की कोकेला आणि रणवीर शौरे दिसत आहेत. हे नवे दोन चेहरे ही अनेकांना आश्चर्यचकीत करणारे आहेत. आता या दोघांचे यामध्ये काय काम असणार आहे हे देखील पाहावे लागणार आहे. पण लोकांनी टीझरनंतर या दोघांचेही या वेबसिरीजमध्ये स्वागतच केले आहे.या शिवाय या टीझरमध्ये सैफ अली खान, नवाझुद्दीन सिद्दकी, पंकज त्रिपाठी हे जुने चेहरे दिसत आहे. आता तुमची या वेबसिरीजची उत्सुकता वाढली असली तरी अद्याप या सिरीजच्या रिलीजची तारीख अद्याप सांगण्यात आली नाही.
सविता भाभीला टक्कर देणार का ही कविता भाभी
जे सिनेमात पाहायला मिळत नाही ते वेबसिरीजमध्ये पाहायला मिळते. म्हणूनच या वेबसिरीजमधील अनेक गोष्टींनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. बोल्ड सीन असो किंवा मारामारी सगळे काही लोकांना भिडणारे होते. म्हणूनच नेटफ्लिक्सवरील या मालिकेने भरपूर कमाई केली. पहिला सीझन संपल्यानंतरच दुसऱ्या सीझनची उत्सुकता लोकांमध्ये वाढली होती. पहिला सीझनचे अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी निर्माता होते. अनुरागने ही सिरीज डिरेक्ट केली होती. त्यामुळे वेबसिरीज चाहत्यांमध्ये या वेबसिरीज बाबत फारच उत्सुकता होती. तुम्ही अजूनही या वेबसिरीजचा पहिला सीझन पाहिला नसेल तर आजच जाऊन पाहा. मग तुम्हाला गणेश गायतोंडे, कुक्कु आणि सरताज सिंह याबद्दल जरा माहिती मिळू शकेल.
(फोटो सौजन्य- Instagram)