परवानगी शिवाय फोटो काढल्यामुळे जया बच्चन रागवल्या, चाहत्याला दिले हे उत्तर

परवानगी शिवाय फोटो काढल्यामुळे जया बच्चन रागवल्या, चाहत्याला दिले हे उत्तर

बॉलीवड अभिनेत्री जया बच्चन त्यांच्या बेधडक वागण्यासाठी प्रसिद्ध आहेत. चित्रपटसृष्टी असो वा राजकारण, संसद भवन असो वा सावर्जनिक ठिकाण त्या कोणाची भीड न बाळगता सडेतोड उत्तर देतात. जर एखादी गोष्ट त्यांना आवडली नाही तर त्या लगेच रागावतात. अनेक वेळा त्या मीडियासमोर कठोर वागण्यामुळे चर्चेचा विषय ठरल्या आहेत. नुकतच जया बच्चन एका चाहत्यावर रागवल्या आहेत. त्यांच्या एका चाहत्याने त्यांचा फोटो काढल्यामुळे जया बच्चन त्याच्यावर भडकल्याची चर्चा आहे. या चाहत्याने जया बच्चन यांची परवागनी न घेता त्यांचा फोटो काढला होता. जया बच्चन यांना फोटो काढलेले मुळीच आवडत नाही. त्यात या चाहत्याने त्यांची परवानगी न घेता फोटो काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जया बच्चन याचा पारा फारच चढला होता. झालं असे की जया बच्चन करन जोहरची आई हीरू जोहर यांच्या बर्थ डे पार्टीसाठी एका रेस्टॉरंटमध्ये गेल्या होत्या. रेस्टॉरंटमधून बाहेर येताना एका चाहत्याने मोबाईलमधून फोटो काढण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे जया बच्चन यांना राग आला आणि त्या फॅन्सवर चिडल्या. एवढंच नाहीतर त्यांनी त्या चाहत्याला जवळ बोलावून त्याला फोटो काढण्यावरून बोल सुनावले. त्या म्हणाला की तू माझ्या परवानगीशिवाय माझा फोटो कसा काढलास? तूला काही संस्कार आहेत की नाही. जया बच्चन यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्यामुळे त्यावर अनेक कंमेट्सदेखील येत आहेत. काही लोकांनी या व्हिडीओवर त्यांना रागावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला आहे. तर काहींनी अभिताभ बच्चन यांच्याकडून जया बच्चन यांना सहनशिलता शिकुन घेण्याची गरज आहे असंही म्हटंलं आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

#jayabachchan at #hiroojohar birthday lunch @viralbhayani


A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on


जया बच्चन यांना राग का येतो


करण जोहरने त्याच्या चॅट शोमध्ये जया बच्चन यांच्या मुलांना म्हणजेच अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन यांना जया बच्चन यांना राग का येतो हे विचारलं होतं. तेव्हा त्यांनी त्यांची आई ही क्लोस्ट्रोफोबिक (claustrophobic) आहे असं सांगितलं होतं. ही एक मानसिक अवस्था असू यामध्ये अचानक गर्दी पाहिल्यामुळे ती अस्वस्थ होते आणि चिडते असं सांगिलतं होतं. शिवाय जया बच्चन यांना मुळातच फोटो काढलेले आवडत नाहीत. जेव्हा आईची परवानगी न घेता कोणी तिचे फोटो काढतं तेव्हा ती रागवते असंही अभिषेक बच्चन यांनी सांगितलं होतं. या चॅट शोमध्ये अभिषेक बच्चन म्हणाला होता की जेव्हा त्यांचा संपूर्ण परिवार बाहेर फिरायला जातो तेव्हा आई प्रार्थना करते की कोणीही तिचा फोटो काढू नये.


Jaya-Bachchan


अमिताभ बच्चन यांनी विकली त्यांची आलिशान कार


जेव्हा सारा अली खानने केला अमिताभ बच्चन यांना ‘आदाब’ पहा हा क्युट व्हिडिओ


आलिया भटने तिच्या ड्रायव्हर्सचे घराचे स्वप्न केले पूर्ण 


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम