हिवाळ्यात ट्रॅव्हल करताना कॅरी करा हे सेलिब्रेटी स्टाईल पफर जॅकेट

हिवाळ्यात ट्रॅव्हल करताना कॅरी करा हे सेलिब्रेटी स्टाईल पफर जॅकेट

हिवाळा सुरू झाला की अनेकींना वाटतं आता काही दिवस कोणतीच स्टाईल करता येता येणार नाही. कारण प्रवासात अथवा घराबाहेर पडताना थंडीपासून बचाव करण्यासाठी जाड जॅकेट घालावे लागतात. मात्र जर थोडं स्मार्टली या जॅकेटचं सिलेक्शन केलं तर या जॅकेटमध्येही तुम्ही स्टायलिश आणि फॅशनेबल दिसू शकता. यासाठी आम्ही तुमच्यासोबत पफर जॅकेटचे हे काही लुक शेअर करत आहोत. जे हिवाळ्यात काही सेलिब्रेटीजनी केले होते. 

बऱ्याचदा बॉलीवूड अथवा हॉलीवूड अभिनेत्री ट्रॅव्हल करताना पफर जॅकेट कॅरी करताना दिसतात. सहाजिकच त्यांच्याप्रमाणे स्टायलिश दिसण्यासाठी तुम्ही तुमच्या वॉर्डरोबमध्ये या जॅकेटचा समावेश नक्कीच करू शकता. 

प्रियांका चोप्रा-

प्रियांका चोप्रा लग्नानंतर तिचा पती निक जोनाससोबत अमेरिकेत सेटल झाली आहे. अमेरिकेतील थंडीचा सामना करण्यासाठी नेहमीच चांगले जॅकेट घराबाहेर फिरताना कॅरी करावे लागतात. त्यामुळे प्रियांका नेहमी निरनिराळ्या पफर जॅकेटमध्ये दिसत असते. आम्ही शेअर केलेल्या या फोजोमध्ये प्रियांका खूपच क्युट आणि स्टायलिश दिसत आहे. विशेष म्हणजे अशा जॅकेटसोबत जास्त मेकअपचीदेखील गरज लागत नाही. एखादी स्टायलिश बॅग आणि सिंपल लिपस्टिक लावूनही तुम्ही सर्वात उठून दिसू शकता.

Instagram

आलिया भट -

अभिनेत्री आलिया भटला पफर जॅकेट खूपच आवडतात. कारण बऱ्याचदा ट्रॅव्हल करताना ती हेच जॅकेट कॅरी करते. एकतर हे जॅकेट खूपच उबदार असतात. ज्यामुळे कडक थंडीपासून तुमचे चांगले संरक्षण होते. शिवाय अशा जॅकेटमध्ये तुमचा लुक अगदी छान दिसतो. डेनिम जीन्स अथवा पेन्सिल स्कर्ट सारख्या कोणत्याही आऊटफिटवर हे पफर जॅकेट खुलून दिसतात.

Instagram

सारा अली खान -

बॉलीवूडमध्ये सारा अली खानने तिच्या लुक्स आणि अभिनयातून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. एखादा प्रोजेक्ट संपला की सारा त्याचा आनंद साजरा करण्यासाठी वेकेशन प्लॅन करते. अशाच एका वेकेशनमध्ये तिने हे पिंक रंगाचं पफर जॅकेट घातलं होतं. त्यामुळे सारा अली खान प्रमाणे हे गर्लीश रंगाचं पफर जॅकेट आणि फरची क्रॉस बॅग कॅरी करून तुम्ही तुमचं ट्रॅव्हल फोटोसेशन नक्कीच करू शकता. सोबत साराप्रमाणे मस्त जीन्स आणि गॉगल कॅरी करा ज्यामुळे तुमचा लुक नक्कीच परफेक्ट होईल.

Instagram

क्रिती सेनॉन -

ट्रॅव्हल करताना काढलेल्या कॅंडिड फोटोजनां सर्वात जास्त लाईक्स मिळतात. तेव्हा प्रवासातून आल्यावर तुम्हालाही तुमच्या सोशल मीडियावर अशा लाईक्स हव्या असतील तर क्रितीप्रमाणे पफर जॅकेट सोबत कॅरी करा. कारण  या जॅकेटमुळे तुमचा लुक अगदी नॅचरल वाटेल. परदेशात अथवा भारतात हिमाचल सारख्या प्रदेशात फिरताना अशा जॅकेटमुळे तुमचा थंडीपासून बचावदेखील होईल. 

Instagram

श्रद्धा कपूर -

बॉलीवूडची श्रद्धा कपूरही तिच्या स्टायलिश आणि दिलखेचक अदांनी चाहत्यांना भूरळ पाडत असते. आता श्रद्धाचा हा लुक पाहा ज्यातून तुम्हाला तुमचा ट्रॅव्हल लुक करणं नक्कीच सोपं जाईल. श्रद्धाने मस्टर्ड रंगाचं पफर जॅकेट कॅरी केलं आहे. थंडीच्या दिवसात कोवळ्या ऊन्हातून फिरताना असा लुक अगदी  मस्तच दिसेल.

Instagram

आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेले हे लुक तुम्हाला कसे वाटले आणि फिरताना तुम्ही यातील कोणता लुक कॅरी केला हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये अवश्य कळवा. 

Beauty

Molten Matte Metallic Liquid Lipstick- Aphrodite

INR 645 AT MyGlamm