ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
‘Wedding चा शिनेमा’ चं टीझर प्रदर्शित

‘Wedding चा शिनेमा’ चं टीझर प्रदर्शित

डॉ.सलील कुलकर्णी यांच्या ‘Wedding चा शिनेमा’ चं टीझर नुकतंच प्रदर्शित झालं आहे. हा चित्रपट लग्न या विषयावर आधारित असून टीझरमधूनच चित्रपटात खूपच धमाल होणार असल्याचं दिसत आहे. सध्या प्री- वेडिंग फोटोशूट, पोस्ट-वेडिंग फोटोशूट याचं फॅड आलं आहे. त्यामुळे लग्नाआधी फोटो शूट, चित्रीकरण करण्याची पद्धत रुजत आहे.  या चित्रपटामध्येदेखील असेच काही प्रसंग पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे हा धमाल विवाहसोहळा आणि त्या आधीची धमालमस्ती या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. हा चित्रपट 12 एप्रिल 2019 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या टीझरमधून एका ग्रॅंड वेडिंगचं आमंत्रण निर्मात्यांनी प्रेक्षकांना दिलं आहे. प्रतिभावान कलाकार आणि त्यांच्या सक्षम आणि विनोदी अभियनामुळे हा चित्रपट पोट धरून हसायला लावणार हे मात्र नक्की.

Wedding चा शिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘Wedding चा शिनेमा’ या चित्रपटात अभिनेत्री मुक्ता बर्वे एका वेगळया भूमिकेत दिसणार आहे. शिवाय शिवाजी साटम, अलका कुबल, अश्विनी काळसेकर, भाऊ कदम, रिचा  इनामदार, प्रविण तरडे, सुनिल बर्वे, संकर्षण कऱ्हाडे, त्यागराज खाडीलकर, प्राजक्ता हनमगर, योगिनी पोफळे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. महत्वाचं म्हणजे या चित्रपटातून शिवराज वायचळ, ऋचा इनामदार ही फ्रेश जोडीही या चित्रपटातून झळकणार आहे. एव्हरेस्ट इंटरटेंन्टमेंटची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती गेरूआ प्रॉडक्शन आणि पीइएसबी यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील एक हलकं- फुलकं आणि निखळ मनोरंजन करणारं पहिल्या गाणं प्रदर्शित करण्यात आलं.या चित्रपटातील हे पहिलंच गाणं प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. ‘बोल पक्या’ असे बोल असलेलं हे गाणं अत्यंत मजेशीर असून त्यामुळे चाहत्यांचं भरपूर मनोरंजन होणार आहे. विशेष म्हणजे या गाण्यासाठी पुन्हा एकदा सलील कुलकर्णी, संदीप खरे आणि अवधूत गुप्ते एकत्र आले आहेत. यापूर्वी यात्रिकूटाने गायलेल्या ‘डीबाडी डीपांग’ या गाण्याने प्रेक्षकांच्या मनात धूडघूस घातला होता. आता ‘पक्या बोल’ हे गाणंही ‘डीबाडी डीपांग’प्रमाणेच चाहत्याच्या मनात उतरत आहे.

सलील नव्या भूमिकेसाठी सज्ज

ADVERTISEMENT

अनेक वर्षे नवनवीन गाणी चाहत्यांना दिल्यावर डॉ. सलील कुलकर्णी प्रथमच ‘Wedding चा शिनेमा’ साठी दिग्दर्शकाची धूरा सांभाळत आहे. शिवाय या चित्रपटाची कथालेखन, पटकथा, संवाद,संगीत आणि दिर्ग्दशन अशा विविध जबाबदाऱ्या सलीलने लीलया सांभाळल्या आहेत. आयुष्यावर बोलू काहीच्या माध्यमातून सलील आणि संदीप ही जोडी चाहत्यांच्या मनामनात आजही अधिराज्य गाजवत आहे. आता सलीलच्या या नव्या भूमिकेचेही स्वागत करण्यासाठी प्रेक्षक नक्कीच सज्ज आहेत.

पुलवामा हल्ल्यानंतर सलमान खानने घेतला मोठा निर्णय

छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT

 

 

19 Feb 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT