अंबानींच्या घरात पुन्हा लगीनघाई, आकाश चढणार बोहल्यावर

अंबानींच्या घरात पुन्हा लगीनघाई, आकाश चढणार बोहल्यावर

८ हे वर्ष लक्षात राहिले असेल तर बी टाऊनमधील सेलिब्रिटीजच्या लग्नांमुळे..एकापेक्षा एक सरस अशा लग्नसोळ्याचे आयोजन सगळ्यांनीच केले होेते. त्यात सर्वाधिक चर्चा रंगली ती मुकेश अंबानींची मुलगी ईशाच्या लग्नाची. कारण या सोहळ्यासाठी देश-परदेशातून पाहुणे आले होते. हा सगळा सोहळा अक्षरश: डोळे दिपवणारा होता. आता अंबानींचे लग्न म्हटल्यावर इतका थाट तर आलाच नाही का?  पण आता अंबांनीच्या घरात पुन्हा एकदा सनई-चौघडे वाजणार आहेत. पै-पाहुण्यांची अशीच रेलचेल पाहायला मिळणार आहे. कारण आकाश अंबानीच्या लग्नाची तारीख निश्चित झाली आहे. ९ मार्च रोजी आकाश बोहल्यावर चढणार असून तीन दिवस हा शाही सोहळा चालणार आहे.


 akash ambani shloka mehta


पाहा अंबानीच्या लग्नसोहळ्यातील खास क्षण


९ मार्चला चढणार बोहल्यावर


आकाश अंबानीचा जून २०१८ रोजी व्यावसायिक रसेल मेहता यांची मुलगी श्लोका मेहतासोबत साखरपुडा झाला. त्यानंतर ते लवकरच विवाहबंधनात अडकतील अशी चर्चा होती. पण त्या आधी आकाशची बहीण ईशाचे लग्न झाले. त्यामुळे आकाश आणि श्लोकाच्या लग्नाची उत्सुकता वाढली होती. अखेर आकाशच्या लग्नाची तारीख निश्चित झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आकाश आणि श्लोका ९ मार्च रोजी विवाहबंधनात अडकतील. मुंबईतील जिओ सेंटरमध्ये तीन दिवस हा सोहळा रंगणार आहे. १० मार्च रोजी ग्रँड वेडिंग सेलिब्रेशन असणार आहे. तर ११ मार्च रोजी लग्नाचे ग्रँड रिसेप्शन असणार आहे, असे कळत आहे. या लग्नाची तयारी अंतिम टप्प्यावर आली असल्याचेदेखील कळत आहे.


 akash shloka


Also Read How to Host Your Wedding At Home In Marathi


कशी असेल पत्रिका? 


तुम्हाला आठवत असेल तर आकाशची बहीण ईशा. तिच्या लग्नाची पत्रिकाही खूप खास होती. त्या पत्रिकेची बरीच चर्चा झाली. आता आकाशच्या लग्नाचा शाही थाटही काही कमी नसणार. त्यामुळे आकाश आणि श्लोका मेहताच्या लग्नाची पत्रिका कशी असेल अशी उत्सुकता देखील आहे. ईशाच्या लग्नासाठी मुंबईतील अंबानींच्या घराचे रुपडे पालटण्यात आले होते. आता अंबांनीच्या कुटुंबात आणखी एक व्यक्तिची भर पडणार आहे. त्यामुळे तिच्या स्वागताची काय तयारी केली असेल तेही थोड्या दिवसाने समजेलच.  


ईशाच्या लग्नासाठी खर्च केले तब्बल ७०० कोटी 


इथे रंगणार बॅचलर्स पार्टी


लग्नाआधी आकाश अंबानी एक मोठी बॅचलर्स पार्टी करणार आहे.ही पार्टी स्वित्झर्लंड येथे होणार आहे. २३ ते २५ या काळात ही बॅचलर्स पार्टी होणार असून थोड्याच दिवसांनी तो स्वित्झर्लंडसाठी रवाना होणार आहे. या पार्टीसाठी रणबीर कपूर, करण जोहर हमखास जाणार आहेत. शिवाय ५०० लोकांची यादी तयार करण्यात आली आहे.आता ईशाच्या लग्नाला बियॉन्से, हिलरी क्लिंटन आणि संबंध बॉलीवूड आले होते. आता या बॅचलर्स पार्टीलाच ५०० लोकांना आमंत्रण आहे. म्हटल्यावर विवाहसोहळा हा शाही असणार यात काही शंका नाही. मिळालेल्या माहितीनुसार सेंट मोरटीज या हॉटेलमध्ये या पार्टीची सगळी व्यवस्था करण्यात आली आहे.


अनंत अंबानीचेही लवकरच लग्न


अशी जमली जोडी


आकाश आणि श्लोका यांची लव्हस्टोरी अगदी फार जुनी आहे असे म्हणायला हवे. कारण आकाश आणि श्वोका एकाच शाळेत शिकत होते. उच्च शिक्षणासाठी दोघेही परदेशात निघून गेले. पण ते कायम एकमेकांच्या संपर्कात होते. श्लोकाला आकाशने प्रपोझ केले. त्यानंतर ही लव्हस्टोर सगळ्यांना कळली. लहानपणापासून एकमेकांचे मित्र आणि आता जीवनसाथी असा त्यांचा हा प्रवास आहे. 


(सौजन्य- Instagram)