ADVERTISEMENT
home / मनोरंजन
या वीकेंडला आनंद घ्या ‘मुंबई संस्कृती’चा

या वीकेंडला आनंद घ्या ‘मुंबई संस्कृती’चा

कधीही न थांबणारी आपली मुंबई. मुंबईची वेगवान संस्कृती आणि त्याचे विविध पैलू जाणून घेण्याची संधी तुम्हाला या वीकेंडला मिळणार आहे. इंडियन हेरिटेज सोसायटी आणि महाराष्ट्र पर्यटन यांच्या सहकार्याने ‘मुंबई संस्कृती’ या शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. येत्या 11 आणि 12 जानेवारीला मुंबईतल्या एशियाटिक सोसायटीमध्ये खास संगीताचा मेळा म्हणजेच मुंबई संस्कृती फेस्टिव्हल (Mumbai Sanskruti Festival) रंगणार आहे.

सांगितिक मेजवानीचा वीकेंड

या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी उस्ताद अमजद अली खान यांच्यासह अयान अली बांगेश व अमान अली बांगेश यांच्या सरोद वादनाच्या सुरेल जुगलबंदीची जादू अनुभवता येणार आहे. तर दुसऱ्या दिवशी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील नामांकित कलाकार पं. संजीव अभ्यंकर (गायन) आणि कला रामनाथ (व्हायोलिन) यांचा सुरेल मेळ संगीतप्रेमींना अनुभवता येणार आहे.

फेस्टिव्हलच्या आयोजनाचा खरा हेतू

यंदा या महोत्सवाचं हे 28 वं वर्ष आहे. ‘यूज लाईव्ह म्युझिक टू सेव्ह हेरिटेज’ या संकल्पनेअंतर्गत वार्षिक महोत्सवाचे आयोजन इंडियन हेरीटेज सोसायटी, मुंबईतर्फे करण्यात येतं. दरवर्षीप्रमाणे यंदाही महोत्सवाला महाराष्ट्र पर्यटनाचे विशेष सहकार्य लाभले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून आपल्या अभिजात कला आणि संस्कृतीचे जतन करणं, मुंबईतील पुरातन ऐतिहासिक आणि उत्कृष्ट वास्तूकलेचा नमुना असलेल्या वारसा वास्तूची ओळख करुन देणं, तसंच मुंबई शहराला पर्यटनात्मक प्रसिद्धी देणं हा या महोत्सवाच्या आयोजनामागील मुख्य उद्देश असतो.

ADVERTISEMENT

आपल्या संस्कृती आणि परंपरेची ओळख कायम निर्माण करुन ठेवण्यासाठी इंडियन हेरीटेज सोसायटी सतत प्रयत्नशील असते. 1992 सालापासून हा महोत्सव वाळकेश्वर येथील ऐतिहासिक बाणगंगा तलाव येथे ‘बाणगंगा महोत्सव’ या नावाने आयोजित करण्यात येत असे. मात्र हायकोर्टाच्या ध्वनी प्रदूषण प्रतिबंधात्मक निर्णयानंतर सदर हायकोर्टाच्या आदेशानुसार तो एशियाटिक लायब्ररीत ‘मुंबई संस्कृती’ (Mumbai Sanskruti Festival) या नावाने आयोजित करण्यात येतो. या महोत्सवाचा शासनाच्या वार्षिक पर्यटक कार्यक्रम सूचीमध्ये समावेश करण्यात आला आहे. हा महोत्सव संगीत प्रेमींमध्ये एक प्रतिष्ठित महोत्सव म्हणून परिचित आहे.

अभिनयाचे धडे गिरवण्यासाठी मुंबईतील बेस्ट अॅक्टींग स्कूल्स

प्रवेशिकांसाठी द्या इथे भेट

मुख्य म्हणजे संगीतप्रेमींसाठी हा दोन दिवसीय महोत्सव पर्वणी तर आहेच, पण त्यासोबतच निशुल्कही आहे. कार्यक्रमाची निशुल्क प्रवेशिका महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची माहिती आणि आरक्षण केंद्रं, प्रितम हॉटेलजवळ, दादर, पूर्व-(24143200), गेट वे ऑफ इंडिया (22841877) आणि महाराष्ट्र वॉच कंपनी, दादर पूर्व (24223011) तसेच चेतना बूक स्टॉल, काळा घोडा, फोर्ट, मुंबई (22851243) येथे उपलब्ध आहेत. तर श्यामल इव्हेंट्स-9082146894 यांच्याजवळदेखील प्रवेशिका उपलब्ध आहेत. सर्व संगीतप्रेमींनी मुंबई संस्कृती या संगीत महोत्सवास मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांद्वारे करण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

लग्नाच्या दिवशी तुमच्या सौंदर्याला बहारदार बनवतील मुंबईतील

मग या वीकेंडला नक्की द्या फेस्टिव्हलमचा आनंद आणि पुन्हा एकदा जगा मुंबईची संस्कृती. 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

 

ADVERTISEMENT

हेही वाचा –

मुंबईतील बेस्ट एनजीओज

मुंबईत इथे करा प्री-वेडिंग फोटोशूट

मुंबईतील बेस्ट डान्स क्लासेस

ADVERTISEMENT
09 Jan 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT