नेहा कक्करविषयी आदित्यच्या मनात आहेत या भावना, आदित्य म्हणाला…

नेहा कक्करविषयी आदित्यच्या मनात आहेत या भावना, आदित्य म्हणाला…

नेहा कक्कर आणि आदित्य नारायण यांच्या लग्नांच्या चर्चांना आता फुलस्टॉप मिळाला असला तरी देखील अधूनमधून त्यांच्या या नात्याची चर्चा होतच असते. उदित नारायण यांनी देखील नेहा आणि आदित्य यांचे लग्न झाले तर आनंदच आहे असे म्हटले होते. पण एका रिअॅलिटी शो पुरता हा सगळा बनाव रचण्यात आल्याचे कळल्यानंतर सगळ्यांनी या विषयाकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. पण नेहा आणि आदित्यच्या चाहत्यांना अजूनही त्यांच्यामध्ये काही नाही या गोष्टीवर विश्वास बसत नाही. पण आता आदित्यने नेहाविषयी असलेल्या भावना बोलून दाखवल्या आहेत.

‘लव्ह आज कल 2’ फेम ही अभिनेत्री लवकरच दिसणार मुख्य भूमिकेत

 

नेहा माझ्या खूप जवळ

Instagram

नेहाविषयी बोलताना आदित्यने अनेकवेळा त्यांच्या मैत्रीबद्दल सांगितले आहे. आदित्य आणि नेहा खूप चांगले मित्र आहेत. पण त्यापलीकडे जाऊन त्यांनी कधीच याचा विचार केला नाही. त्यामुळे नेहा आणि आदित्यमध्ये फक्त घनिष्ठ मैत्री असल्याचे सिद्ध झाले आहे. हे आदित्यनेच नाही तर नेहानेसुद्धा सांगितले आहे. गायक हिमांश कोहलीसोबत ब्रेकअप केल्यानंतर तिचे नाव आदित्यशी जोडले गेले पण  त्या दोघांमध्ये काहीही नव्हते हे आता सिद्ध झाले आहे. 

मेंटलहुड'मधून करिश्मा कपूर करत आहे कमबॅक

नेहाने सांगितली खुशखबर

Instagram

एकीकडे नेहाने तिच्या आणि आदित्यच्या लग्नाचा खुलासा करुन त्यांच्या चाहत्यांची निराशा केली असली तरी त्याने आदित्यच्या आयुष्यात असलेली एक आनंदाची बातमीसुद्धा दिली आहे. आदित्य लवकरच  विवाहबंधनात अडकणार असल्याचे तिने सांगितले आहे. तिने दिलेल्या माहितीनुसार आदित्यचे गेल्या कित्येक वर्षांपासून एका मुलीवर प्रेम आहे. याच मुलीसोबत तो लग्न करणार असल्याचे कळले आहे. तो 2020 मध्ये तिच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. 

आदित्य खूप चांगला मुलगा

आदित्यविषयी नेहा फारच भरभरुन बोलते तिने अनेक ठिकाणी मुलाखत दिली आहे.  ती आदित्यविषयी नेहमीच चांगल बोलते.आदित्य चांगला मुलगा असल्याचेदेखील तिने या आधी खूप वेळा सांगितले आहे. त्यामुळे रिअॅलिटी शो दरम्यान तिला कितीही आदित्यच्या नावाने चिडवले तरी तिच्या त्याच्या प्रतीच्या भावना अजिबात दुखावल्या गेल्या नव्हत्या.त्यांना सेटवरही एकमेकांच्या नावाने चिडवले जात होते. पण यावर त्यांनी कधीच कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. 

उदित नारायण यांनाही सून म्हणून नेहा होती पसंत

आदित्य नारायणच्या लग्नाविषयी ज्यावेळी त्याचे वडील उदित नारायण यांना विचारण्यात आले त्यावेळी त्यांनी नेहा सून म्हणून पसंद असल्याचे सांगितले. नेहा आम्हाला आवडते. ती या घराची सून बनायला तयार असेल तर आमची काहीच हरकत नाही. पण यात काही तथ्य नाही हे आम्हाला माहीत आहेत. आम्हीही त्याला कधीकधी नेहाच्या नावाने चिडवतो. पण मला सांगायला फार आनंद होतो की ते दोघे खूप चांगले मित्र आहेत. 


त्यामुळे आदित्य आणि नेहा  #justfriends आहेत बरं का. आणि आता हा सगळा विषय इथेच कायमचा फुलस्टॉप घेणार आहेत. कारण आदित्य लवकरच लग्न करणार आहे.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे  20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.