ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
जेव्हा बाजीराव पेशवा आणि सदाशिवराव भेटतात तेव्हा…

जेव्हा बाजीराव पेशवा आणि सदाशिवराव भेटतात तेव्हा…

पिरियॉडीक चित्रपटांना सध्या चांगले दिवस सुरु आहे. दरवर्षी किमान दोन ते तीन तरी चित्रपट रिलीज होतातच. आता ‘पानिपत’ हा चित्रपटसुद्धा फ्लोअरवर येण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहेच. या चित्रपटाला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरुन शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. बॉलीवूडचा बाबा रणवीर सिंह याने देखील त्याच्या स्टाईलमध्ये या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने दिलेल्या शुभेच्छांमध्ये बाजीराव पेशवा आणि सदाशिवराव यांची भेट असे म्हटले आहे.

Year Ender ‘या’ बॉलीवूड स्टार्सचं झालं यंदा ब्रेकअप

रणवीरने केला फोटो शेअर

रणवीर सिंहने त्याच्या इन्स्टाग्रामवर अर्जुन कपूरसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्याने चक्क अर्जुन कपूरला मिठी मारली आहे. सोबत रणवीरने एक छान कॅप्शनसुद्धा लिहिले आहे. बाजीराव आणि सदाशिवराव यांची भेट. काही वर्षांपूर्वी आलेल्या बाजीराव मस्तानी या चित्रपटात बाजीराव पेशव्यांची भूमिका रणवीर सिंहने साकारली होती. तर त्यांच्यात घराण्यातील सदाशिवराव एक महत्वाची व्यक्ती. पानिपतच्या तिसऱ्या लढाईचे नेतृत्व सदाशिवराव यांनी केले. सदाशिवरावांची ही भूमिका अर्जुन कपूर साकारत आहे. त्याला शुभेच्छा देण्यासाठीच अर्जुनने हा फोटो शेअर करत अर्जुनला टॅग केले आहे. त्यामुळे या फोटोने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अनेकांनी अर्जुनला त्याच्या चित्रपटासाठी शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत.

फक्त एका चित्रपटासाठी राजकुमारने खाल्ले नॉनव्हेज

ADVERTISEMENT

अर्जुनवर झाली बरीच टीका

Instagram

मलायका अरोरासोबत असलेल्या complicated रिलेशनशीपमुळे अर्जुन कपूर नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या चित्रपटांपेक्षाही त्याच्या गॉसिप हल्ली जास्त चालतात. अर्जुन मलयाकासोबत दिसल्यानंतर त्यांच्या लग्नाच्या गॉसिपने जोरदेखील धरला होता.  पण आता सदाशिवराव आणि पानिपत लढाई म्हणजे मराठ्यांसाठी, देशांसाठी सन्मानाची गोष्ट. चित्रपटाचा ट्रेलर आल्यानंतर अर्जुन कपूरला सदाशिवरावांच्या भूमिकेत पाहून अनेकांना नाकं मुरडली होती. अनेकांना त्यांचा अभिनय आणि डायलॉग डिलीव्हरी ही फारशी आवडली नाही त्यामुळे हा सदाशिवरावांचा अपमान आहे असे म्हणत अनेकांना त्याला ट्रोल केले होते. पण ट्रोलर्सच्या या कमेंटकडे अर्जुन कपूर आणि चित्रपटाचे निर्माते अशुतोष गोवारीकर यांनीही दुर्लक्ष केले असेच म्हणायला हवे.

मोस्ट वॉटेंडमध्ये दिसला अर्जुन कपूर

ADVERTISEMENT

Instagram

नुकताच अर्जुन कपूर मोस्ट वाँटेड या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात अर्जुनने अंडर कव्हर एजंटची भूमिका साकारली होती. त्याच्या या चित्रपटाने फारशी कमाई केली नाही. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटलाच होता. या चित्रपटाच्या बजेट इतकाही पैसा कमावला नाही. 

‘तान्हाजी’ होणार रिलीज

तर नवीन वर्षात फेब्रुवारी महिन्यात तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारीत ‘तान्हाजी’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटात अजय देवगण प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटातील सगळी स्टारकास्ट रिव्हील करण्यात आले असून शरद केळकर या चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात झीनत अमान, काजोल देखील आहेत. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

ADVERTISEMENT
05 Dec 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT